हिंदू मुसलमान, पैशाचं वाटप याशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाहीत; राऊतांकडून भाजप, शिंदेंवर जळजळीत टीकास्त्र

BMC Election 2026 News

हिंदू मुसलमान, पैशाचं वाटप याशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाहीत; राऊतांकडून भाजप, शिंदेंवर जळजळीत टीकास्त्र
Shivsena UBTSanjay RautElection Commission
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

BMC Election 2026 Sanjay Raut : शिवसेना उब्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंकर संक्रांतिच्या दिवशी आणि मतदानाच्या काही तासांपूर्वी पत्रकार परिषजद घेत माध्यमांना संबोधित केलं.

BMC Election 2026 Sanjay Raut : महापालिका निवडणुकांचा प्रचार अधिकृतपणे संपला असला तरीही या प्रचारतोफा अद्यापही थंडावल्या नसून यामागे कारण ठरत आहे ते म्हणजे निवडणूक आयोगानं दिलेल्या एका मुभेचं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा करण्यासाठीच्या पत्रकार परिषदेदरम्यानच आयोगानं मनपा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असला तरीही घरोघरी जाऊन प्रचार करता येणार असल्याची मुभा दिली आणि यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह आयोगालाही निशाण्यावर घेतलं.

यामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊतसुद्धा मागे राहिले नाहीत. 14 जानेवारी 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राऊतांनी माध्यमांशी संवाद साधतानाच सुरुवात केली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तोंडात तिळगूळ पडो... असं म्हणत. निवडणुकीनंतर राजकीय किल्मिषं दूर ठेवून मुंबई, महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे असं म्हणत त्यांनी प्रचार संपता संपता आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला आहे हा खोचक टोला लगावला. प्रचार संपला तरीही प्रचार करता येण्याचा हा तिळगूळ... तोही कसा घराघरात जाऊन, असं म्हणत त्यांनी आयोगाच्या निर्णयावर निशाणा साधला. हिंदू मुसलमान आणि पैशांचा वापर...सध्या वातावरण असं आहे की घरोघरी पैशांचं वाटप सुरु. साडीतून, वृत्तपत्रातून पैशांची पाकिटं कार्यकर्ते घरोघरी पोहोचवत आहेत आणि आता तर त्यांना मुभा मिळाली आहे. म्हणून हा नियम मोडून हा तिळगूळच आयोगानं दिलाय का? असा प्रश्न उभा राहत आहे. आज दिवसभरामध्ये पैसे देणाऱ्यांना बदलडण्याचं नाट्य अधिक प्रमाणात घडू शकतं. कारण, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं आहे. हिंदू मुसलमान आणि पैशांचा वापर याशिवाय हे निवडणुका जिंकणार नाहीत. यांना कोणताही विचार नाही. फक्त पैशांचं वारेमाप वाटप, सत्तेचा गैरवापर याशिवाय यांच्याकडे कोणतीही मोठी ताकद दिसत नाही. असं राऊत म्हणाले. हेसुद्धा वाचा : Exclusive : राऊतांना नेमका कोणता आजार झालाय? स्वत:च पहिल्यांदा उल्लेख करत म्हणाले, उपचार अधिक...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Shivsena UBT Sanjay Raut Election Commission Voting Day Election Day BJP Shinde Money Distribution महापालिका निवडणूक 2026

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

नतीजों से पहले महाविकास अघाड़ी में तकरार: पटोले बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के नेतृत्व वाली सरकार बनेगी; स...नतीजों से पहले महाविकास अघाड़ी में तकरार: पटोले बोले- महाराष्ट्र में कांग्रेस के नेतृत्व वाली सरकार बनेगी; स...Maharashtra Assembly Election Result 2024; Congress chief Nana Patole | Sanjay Raut, MVA
Read more »

'कुंभमेळा नाशिककरांवर संकट बनून कोसळला', राऊतांचा BJP वर घणाघात; 'सिंहस्थाच्या नशेने...''कुंभमेळा नाशिककरांवर संकट बनून कोसळला', राऊतांचा BJP वर घणाघात; 'सिंहस्थाच्या नशेने...'Sanjay Raut Slams BJP Over Nashik Kumbh Mela 2026: लोकांना धर्माच्या गुंगीची भांग पाजून भाजप राजकारण करेल व जनता गरिबी सहन करून त्या धुंदीत आणि गुंगीत नाचत राहील, असा उल्लेख राऊतांनी केलाय.
Read more »

Thackeray Brothers Reunion Turns Official Ahead Of BMC Polls, Sanjay Raut Says Alliance...Thackeray Brothers Reunion Turns Official Ahead Of BMC Polls, Sanjay Raut Says Alliance...BMC Polls 2026: Sanjay Raut of Shiv Sena (UBT) also stated that the Thackeray brothers have reached an agreement, with a formal seat-sharing announcement expected imminently.
Read more »

BMC Election 2026: महायुति में सीट बंटवारा तय, इतने सीटों पर चुनाव लड़ेगी बीजेपी और शिवसेनाBMC Election 2026: महायुति में सीट बंटवारा तय, इतने सीटों पर चुनाव लड़ेगी बीजेपी और शिवसेनाMaharashtra News in Hindi | BMC Election 2026 | BMC Election | Mumbai BMC Election | BMC Election news | Seat-sharing finalized in Mahayuti alliance | BJP | Shiv Sena | Mumbai Municipal Corporation Elections | Maharashtra |
Read more »

BMC election 2026 : पुनर्विकासाची लाट धारावीतील रहिवाशांचं आयुष्य बदलणार? स्थानिकांची साथ कोणाला?BMC election 2026 : पुनर्विकासाची लाट धारावीतील रहिवाशांचं आयुष्य बदलणार? स्थानिकांची साथ कोणाला?BMC election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं झी 24तासच्या मुंबई कोणाची मालिकेत, थेट संवाद धारावीकरांशी...
Read more »

BMC Election 2026 : कुलाब्यातील उमेदवारी अर्जांच्या गोंधळावरून अहवाल सादर; राहुल नार्वेकरांनी...BMC Election 2026 : कुलाब्यातील उमेदवारी अर्जांच्या गोंधळावरून अहवाल सादर; राहुल नार्वेकरांनी...BMC Election 2026 : महाराष्ट्रात सध्या निवणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मुंबईतील निवडणुकांमध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली असून Election Commission पर्यंत पोहोचली खबरबात...
Read more »



Render Time: 2026-04-02 14:58:00