पत्नी राजकीय पक्षाशी निगडित पती सायबर भामटा. पुण्यात घडलेल्या प्रकारामुळे राज्यातील मोठा राजकीय पक्ष पुन्हा अडचणीत येणार आहे.
पत्नी राजकीय पक्षाशी निगडित पती सायबर भामटा. पुण्यात घडलेल्या प्रकारामुळे राज्यातील मोठा राजकीय पक्ष पुन्हा अडचणीत येणार आहे.महाराष्ट्रात याबर गुन्हेगाराची प्रमाण वाढत आहे. पुण्यात घडलेल्या सायबर क्राईमुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष मोठ्या अडचणीत येणार आहे.
कारण, या प्रकरणातील सायबर भामट्याची पत्नी सरपंच आहे. 6 कोटी 29 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी आणि त्याची पत्नी दोघेही मोठ्या पक्षाशी निगडीत असल्याने या प्रकरणाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली आहे. जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं काय आहे. देशभरात सायबर फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज नवीन क्लूप्ती लढवून हे सायबर भामटे सामान्यांना गंडा घालत असतात. सर्वसाधारणपणे हे भामटे परराज्यातले किंवा परदेशातील असतात. मात्र पुण्यातील एका अशाच सायबर चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यामध्ये एका राजकीय पक्षाशी निगडित असणारा भामटा पुणे पोलिसांनी जेरबंद केला आहे तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असे आरोपीचे नाव आहे. आरोपी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याचा राहणारा आहे. आरोपीने मनी लॉड्रिग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची याने सहा कोटी 29 लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या वाजंत्रीने फक्त हा एकच नाही तर डिजिटल अटकेची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याच तपासात निष्पत्र झाले आहे. आरोपी बांधकाम व्यवसायिक आहे. इतकंच नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा खास माणूस आहे. त्याची पत्नी राष्ट्रवादीची कार्यकता असून ती गावची सरपंच देखील आहे वाजंत्रीने पुण्यातील एका ज्यष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली. मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाईचीभीती दाखवून ज्येष्ठाला तातडीनेपैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान फसवणूक झालेल्या जेष्ठ व्यक्तीने वाजंत्री याच्या बँक खात्यात सहा कोटी २९ लाख रुपये जमा केले. मात्र, आपली झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांना ती रक्कम वाजंत्रीच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले.सायबर चोरीतून मिळालेल्या पैशांपैकी त्याने त्यातील 90 लाख आणि 20 लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते. ज्या खात्यात हे पैसे ठेवण्यात आले होते ते बँक खाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहचले पण राजकीय संबंध असलेल्या वाजंत्री याला पोलीस चाहूल लगेच लागली. पोलीस येत आहेत हे कळताच तो तिथून फरार झाला. पुढे पोलिसांना तुषार वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती एका खबऱ्याने दिली. त्यातूनच पुणे पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर सायबर चोरीच्या गुन्ह्यामध्ये केरळ पोलीस सुद्धा या वाजंत्रीच्या मागावर होते. पुणे पोलिसांनी केरळ पोलिसांची संपर्क साधला आहे. या वाजंत्री च्या विरोधात नॅशनल सायबर पोर्टलवर वेगवेगळ्या राज्यातून पाच तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी निगडित असलेला आणखी एक नेता हा गुन्हेगारी कृत्यात अडकल्याने आणि त्यातही तो प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मर्जीतील असल्याने राष्ट्रवादी समोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.भारत
NCP Activist Arrested Pune News Pune Cyber Crime Case पुणे क्राईम न्यूज पुणे सायबर क्राईम न्यूज
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'या' राज्यांमध्ये रात्रीच्या वेळी रेल्वे धावणार नाही; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Indian Railway चा मोठा निर्णय!Operation Sindoor : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर Indian Railway चा मोठा निर्णय घेतला आहे.
Read more »
'देशातील छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा; तौक्ते, फयानपेक्षा मोठ्या वादळांचा नाही होणार परिणाम'Chhatrapati Shivaji Maharaj statue: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं..
Read more »
महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा जिथून सर्वाधिक महिला पुण्यात येतात; महिलांचे येण्याचे कारण आणि जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हालमहाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यतून सर्वाधिक लोक पुण्यात येतात. मात्र, यापैकी एक जिल्हा असा आहे जिथून पुरुषांपेक्षा महिला मोठ्या संख्येने पुण्यात येतात.
Read more »
महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव पुन्हा चर्चेतयेत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारमात आणकी एक मोठा ट्विस्ट येणार आहे. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Read more »
...तर पैसा, इच्छा असूनही कार खरेदी करता येणार नाही, कारण...; महाराष्ट्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीतNO Parking NO Car Policy: महाराष्ट्र सरकार देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात (एमएमआर) नो पार्किंग नो कार धोरण लागू करू शकते.
Read more »
33990000000 रुपयांचा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प; महाराष्ट्रासह भारतातील हजारो लोकांना 74 लाख दिवस रोजगार मिळणारएकाचवेळी भारतातील हजारो लोकांना 74 लाख दिवस रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे.
Read more »
