महाराष्ट्रात रिअल लाइफ 'दुष्यम'! अनोखळी व्यक्तीला स्वत:च्या कारमध्ये जिवंत जाळलं; कारण ऐकून पोलिसही थक्क

Latur News

महाराष्ट्रात रिअल लाइफ 'दुष्यम'! अनोखळी व्यक्तीला स्वत:च्या कारमध्ये जिवंत जाळलं; कारण ऐकून पोलिसही थक्क
Crime NewsTerm Insurance
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 110 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Crime News: एका चुकीमुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये आरोपीला अटक केली आहे. एकाद्या चित्रपटाला शोभेल असा हा घटनाक्रम आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...

Crime News : पैशाच्या हव्यासापोटी केलेल्या थरकाप उडवणाऱ्या हत्येचा बनाव लातूरमधील औसा तालुक्यात उघडकीस आला आहे. कारमध्ये एका जिवंत व्यक्तीला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हा प्रकार केवळ पैशांसाठी केल्याचं समोर आलंय.

गोविंद यादव असं यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एक कोटींच्या टर्म इन्शुरन्ससाठी स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी गणेश चव्हाणने हा कट रचला होता. मात्र एका फोन कॉलमुळे त्याचा डाव फसला आणि हे भयंकर षडयंत्र पोलिसांनी उघडकीस आणलं. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.त्या व्यक्तीला पोत्यात भरलं अन्...लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात ही एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी घटना घडली आहे. अभिनेता अजय देवगनच्या दृश्यम चित्रपटाची आठवण करुन देणाऱ्या या घटनेमध्ये वानवडा रस्त्यावर वयोवृद्ध व्यक्ती लिफ्ट मागत उभी होती. या व्यक्तीला गणेश चव्हाणने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. नंतर त्याच्यावर हल्ला करुन त्याला पोत्यात भरलं. त्या पोत्याचं तोंड बांधून आरोपीने गोविंद यादव यांना कारमध्ये कोंबलं आणि ते जिवंत असतानाच कारला आग लावली. या घटनेत व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.आपलाच मृतदेह असल्याचं भासवण्याचा पुरेपूर प्रयत्नमृतदेह जळून राख झाला.तिथेच पडलेल्या हातातील कड्यावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पण पोलिसांच्या तपासाची चक्रं फिरलं आणि हादरवणाऱ्या या हत्याकांडात नवा ट्विस्ट आला. गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण नसून गोविंद यादव नावाच्या एका निष्पाप व्यक्तीचा असल्याचं पोलिसांचा तपासात समोर आलं. गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा भासवण्याचा पुरेपर प्रयत्न केला गेला. पण पोलिसांच्या तपासात हा हत्येचा बनाव असल्याचं उघड झालं. हा बनाव गणेश चव्हाण यानेच केला होता.सिंधुदुर्गात लपला पण...आपला अपघाती मृत्यू झाल्याचं त्याला दाखवायचं होतं. गणेशने एक कोटींचा टर्म इन्शुअरन्स काढला होता. पैसे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्याच हत्येचा बनाव केल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर आरोपी हा कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्गात जाऊन लपला. मात्र पोलिसांनी आरोपीला 24 तासांमध्ये आरोपी गणेशला अटक केल्याची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबेंनी दिली. मैत्रिणीशी चॅटींग भोवलंआरोपी गणेश चव्हाणने पोलिसांनी आपला माग काढू नये म्हणून दोन्ही सिम कार्ड बंद केले होते. मात्र मैत्रिणीशी चॅटिंग करण्याचा मोह गणेशला आवरला नाही आणि त्याने तिसऱ्या सिमवरून मैत्रिणीशी चॅटिंग केल्यामुळे त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश मिळाले. कर्जात बुडालेला असल्याने पैशांची गरज होती म्हणून गणेशने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे. आरोपीला कोणी मदत केली का? नेमका घटनाक्रम काय याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Crime News Term Insurance

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Kotputli News: 12वीं कक्षा की छात्रा से टीचर ने की छेड़छाड़! धरने पर बैठे परिजन और ग्रामिणKotputli News: 12वीं कक्षा की छात्रा से टीचर ने की छेड़छाड़! धरने पर बैठे परिजन और ग्रामिणKotputli News, Rajasthan Crime, teacher molested class 12 student, Kotputli Crime, today Crime News Watch video on ZeeNews Hindi
Read more »

2 साल लगातार दरिंदगी का शिकार हुई महिला,अश्लील वीडियो और फोटो बना युवक शादी करता रहा रेप2 साल लगातार दरिंदगी का शिकार हुई महिला,अश्लील वीडियो और फोटो बना युवक शादी करता रहा रेपRajasthan Crime News: राजस्थान के सरदारशहर पुलिस थाने में 24 वर्षीय विवाहिता ने फोटो वायरल करने की धमकी देकर कई बार जबरन दुष्कर्म करने के आरोप में मामला दर्ज करवाया है.
Read more »

Moradabad: नोटों से भरे बैग लूटकांड में पुलिस ने पांच दबोचे, ई-कॉमर्स वेबसाइट कंपनी के कर्मचारी ने कराई थी वारदातMoradabad: नोटों से भरे बैग लूटकांड में पुलिस ने पांच दबोचे, ई-कॉमर्स वेबसाइट कंपनी के कर्मचारी ने कराई थी वारदातMoradabad Crime News Update एसओजी व पाकबड़ा पुलिस ने 24 घंटे में लूट का पर्दाफाश किया है। पकड़े गए आरोपितों के पास से 3.
Read more »

Moradabad: नोटों से भरे बैग लूटकांड में पुलिस ने पांच दबोचे, ई-कॉमर्स वेबसाइट कंपनी के कर्मचारी ने कराई थी वारदातMoradabad: नोटों से भरे बैग लूटकांड में पुलिस ने पांच दबोचे, ई-कॉमर्स वेबसाइट कंपनी के कर्मचारी ने कराई थी वारदातMoradabad Crime News Update एसओजी व पाकबड़ा पुलिस ने 24 घंटे में लूट का पर्दाफाश किया है। पकड़े गए आरोपितों के पास से 3.
Read more »

टैक्सी चालक ने पत्नी को ईंट से कूचकर मार डाला: शराब पीने को लेकर रहता था पति-पत्नी में विवाद, आरोपी की तलाश...टैक्सी चालक ने पत्नी को ईंट से कूचकर मार डाला: शराब पीने को लेकर रहता था पति-पत्नी में विवाद, आरोपी की तलाश...meerut news meerut crime meerut crime news meerut police meerut ssp ssp meerut
Read more »

कुशीनगर में शादी विवाद को लेकर युवक की हत्या, पड़ोसियों ने घर में घुसकर चाकू से गोद डाला, तीन आरोपी हिरासत मेंकुशीनगर में शादी विवाद को लेकर युवक की हत्या, पड़ोसियों ने घर में घुसकर चाकू से गोद डाला, तीन आरोपी हिरासत मेंKushinagar Crime News: कुशीनगर के कप्तानगंज में एक युवक की निर्मम हत्या से सनसनी फैल गई। पड़ोसियों ने घर में घुसकर 24 वर्षीय राहुल उर्फ काजू पर चाकू से कई वार किए।
Read more »



Render Time: 2026-04-01 21:57:06