प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये खिचडी वाटप करण्यात येते, मात्र सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
महाराष्ट्रातील 'या' महानगरपालिकेच्या 8 शाळांचा प्रताप, सुट्टीच्या दिवशी खिचडी शिजवल्याचं दाखवून लाटला अनुदान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये खिचडी वाटप करण्यात येते, मात्र सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांचा प्रताप समोर आलाय. सुट्टीच्या दिवशी खिचडी शिजवल्याचं दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न या शाळांकडून करण्यात आला. दरम्यान यानंतर या शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलीय. अमरावती महानगरपालिकेच्या आठ शाळांमध्ये खिचडी घोटाळा झाल्याचं समोर आलंय. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये खिचडी वाटप करण्यात येते, मात्र सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे त्या दिवशी विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचं दाखवून पैशांवर डल्ला मारायचा होता असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. संबंधित पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या माहितीतून या घोटाळ्याचा भांडाफोड झालाय.मात्र, पालिकेच्या 8 शाळांमध्येदरम्यान सुट्टीच्या दिवशी खिचडी शिवजणाऱ्या शाळांमध्ये महापालिका मराठी शाळा बेनोडा, महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर 3 महापालिका, मराठी शाळा अकोली संत गाडगे बाबा प्रायमरी स्कूल, शिवाजीनगर महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नंबर 20, नवाथे नगर असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल चांदनी चौक, अमरावती महापालिका उर्दू प्रायमरी, स्कूल नंबर 5 फ्रेजरपुरा अमरावती याचा समावेश आहे. खिचडी घोटाळा समोर आल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी मुख्यध्यापकांना खुलासा देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. फक्त अमरावतीच नव्हे तर इतर जिल्ह्यात देखील अशेच प्रकार निदर्शनास आल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांची हक्काची खिचडी डल्ला मारणं कितपत योग्य आहे, असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत..मुंबई बातम्या
Amravati Municipal Corporation School Students Mid Day Meal Holidays
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहासMaharashtra Din 2025 : या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक असायलाच हवं. जाणून घ्या 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन?
Read more »
Monsoon 2025 : तणावग्रस्त परिस्थितीत सुखावणारी बातमी; मान्सून ‘या’ दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी?Monsoon 2025 : यंदाच्या वर्षी उकाड्यानं देशाच्या बहुतांश भागांमध्ये नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पाडली. मात्र आता काही हा उकाडा फार दिवस तग धरणार नाही, कारण आता चाहूल लागलीये मान्सूनची...
Read more »
महाराष्ट्रातील 'या' तालुक्याला मिळाला नवीन RTO क्रमांक; 'या' जिल्ह्यात आहे हा तालुका1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले. यानंतर आता महाराष्ट्रातील एका तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे.
Read more »
महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा जिथून सर्वाधिक महिला पुण्यात येतात; महिलांचे येण्याचे कारण आणि जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हालमहाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यतून सर्वाधिक लोक पुण्यात येतात. मात्र, यापैकी एक जिल्हा असा आहे जिथून पुरुषांपेक्षा महिला मोठ्या संख्येने पुण्यात येतात.
Read more »
Maharashtra Breaking News LIVE: पावसामुळे हर्बर मार्गावरील वाहतूक ठप्पमहाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा.
Read more »
500 फूट खोल दरीत चौघे बसलेली कार खचली अन्...; महाराष्ट्रातील 'या' किल्ल्याजवळचा थरार कॅमेरात कैदMaharashtra Landslide Car Shocking Photo: महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवशी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Read more »
