पुण्यातील सर्वात महागडा घटस्फोटाची महाराष्ट्रात चर्चा! 45 दिवसात लग्न मोडलं; 45 लाखांची पोटगी दिली

Most Expensive Divorce In Pune News

पुण्यातील सर्वात महागडा घटस्फोटाची महाराष्ट्रात चर्चा! 45 दिवसात लग्न मोडलं; 45 लाखांची पोटगी दिली
The Marriage Broke Up In 45 Days 45 Lakhs AlimonyPune Newsपुणे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 138 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

45 दिवसात संसार मोडला. यानंतर भरपाई म्हणून 45 लाख पोटगी मिळाली.

Pune Couple Divorce : पुण्यातील सर्वात महागड्या घटस्फोटाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. हा कोणत्या सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा घटस्फोट नाही तर एका सामान्य जोडप्याचा आहे. पण, हा घटस्फोट चर्चेत आलाय तो महिलेला मिळालेल्या पोटगीमुळे.

महिलेला 45 लाखांची पोटगी देण्यात आली आहे. 45 दिवसात लग्न तुटलं आहे. अवघ्या 45 दिवसांच्या संसारानंतर पसंत नसल्याचे व हुंडा-मानपान न केल्याचे कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. त्यानंतर नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले. दाम्पत्याने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात एकरकमी तोडगा निघाला अन् वर्षभरापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईला पूर्णविराम मिळाला. प्रीती आणि प्रणय यांचा विवाह जानेवारी 2022 मध्ये मोठ्या थाटामाटात झाला. त्यानंतर प्रीती सासरी नांदण्यासाठी गेली. मात्र, लग्नात हुंडा व मानपान केले नाही, अशी तक्रार सासरच्या मंडळींनी सुरू केली; तर तू मला पसंत नाहीस, मात्र घरच्यांनी जबरदस्ती केल्याने मी तुझ्याशी लग्न केले, असे प्रणय तिला बोलायचा. भांडणे टोकाला गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी मला घराबाहेर काढले, असा आरोप करून प्रीतीने पतीसह सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली. त्याची दखल घेऊन पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात आरोपपत्रही दाखल केले. मात्र, न्यायालयात वकिलांनी केलेल्या समुपदेशनानंतर हा वाद तडजोडीने मिटविण्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी घेतला. पत्नीची बाजू मांडणाऱ्या अॅड. प्रियांका काटकर व अॅड. रेश्मा सोनार यांनी दाम्पत्याचे समुपदेशन केले. त्यानंतर पतीने ४५ लाख रुपये एकरकमी पोटगी देण्यास तयारी दर्शवली. त्याला पत्नीने सकारात्मक प्रतिसाद देऊन न्यायालयीन सुनावणीत कौटुंबिक हिंसाचार झाला नसल्याचे सांगून तक्रार मागे घेतली. आरोपींच्या मुक्ततेची कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तो न्यायालयाने मंजूर केला.कौटुंबिक हिंसाचार व घटस्फोटाचे दावे लढणाऱ्या पक्षकारांना मोठा आर्थिक-मानसिक ताण सहन करावा लागतो. अशा दाव्यांत समुपदेशनाची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. समुपदेशक दोन्ही पक्षांची समजूत घालतात; तसेच महिलांचे हक्क अबाधित राखून तडजोडीने वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात. पक्षकारांचा वेळ, पैसा व भावनिक ऊर्जेची बचत करणाऱ्या समुपदेशनाला न्यायालय प्रोत्साहन देते. संवाद व कायदेशीर मार्गदर्शनातून कौटुंबिक वाद तणावमुक्त पद्धतीने निकाली निघू शकतात असे पत्नीच्या वकील अॅड. रेश्मा सोनार म्हणाल्या. FAQ1 हा घटस्फोट कोणाचा आहे आणि तो का चर्चेत आला? हा पुण्यातील एका सामान्य जोडप्याचा घटस्फोट आहे. तो महिलेला मिळालेल्या ४५ लाख रुपयांच्या पोटगीमुळे महाराष्ट्रात चर्चेत आला आहे. हे सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा घटस्फोट नाही.2 लग्न कधी आणि कसे झाले?प्रीती आणि प्रणय यांचे लग्न जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात झाले. लग्नानंतर प्रीती सासरी नांदण्यासाठी गेली.3 घटस्फोटाला किती वेळ लागला आणि कारण काय होते?अवघ्या ४५ दिवसांत लग्न तुटले. कारण म्हणजे हुंडा-मानपान न केल्याचे आणि पसंत नसल्याचे. प्रणयने प्रीतीला तू मला पसंत नाहीस, घरच्यांनी जबरदस्ती केली असे सांगितले. भांडणांनंतर सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

The Marriage Broke Up In 45 Days 45 Lakhs Alimony Pune News पुणे पुण्यातील महागडा घटस्फोट

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

65 साल की महिला का 45 साल के मोहम्मद मुकर्रम ने किया रेप, बेगूसराय में हैवानियत65 साल की महिला का 45 साल के मोहम्मद मुकर्रम ने किया रेप, बेगूसराय में हैवानियतBegusarai Crime News: बेगूसराय में इंसानियत को शर्मसार कर देने वाली एक घिनौनी घटना सामने आई है. यहां मुफस्सिल थाना क्षेत्र के हरदिया गांव में एक 45 वर्षीय युवक पर 65 वर्षीय बुजुर्ग महिला के साथ रेप करने का आरोप लगा है.
Read more »

45 साल की एक्ट्रेस, PCOS से परेशान? 21 दिन इस चैलेंज को करेंगी फॉलो, पाएंगी छुटकारा45 साल की एक्ट्रेस, PCOS से परेशान? 21 दिन इस चैलेंज को करेंगी फॉलो, पाएंगी छुटकाराएक्ट्रेस नेहा धूपिया फिटनेस को लेकर काफी सतर्क रहती हैं. प्रेग्नेंसी और डिलीवरी के बाद नेहा का ट्रांसफॉर्मेशन चौंका देने वाला नजर भी आया है.
Read more »

Bihar Politics: अमित शाह ने प्रवासी सांसद-विधायकों संग रचा 'जीत का चक्रव्यूह', मीटिंग मे 45 MP और 45 MLABihar Politics: अमित शाह ने प्रवासी सांसद-विधायकों संग रचा 'जीत का चक्रव्यूह', मीटिंग मे 45 MP और 45 MLAबिहार विधानसभा चुनाव 2025 से पहले भाजपा ने रणनीति तेज कर दी है। अमित शाह ने प्रवासी सांसदों और विधायकों के साथ बैठक कर विपक्ष को घेरने की योजना बनाई है। उन्होंने कार्यकर्ताओं को एकजुट होकर एनडीए को जिताने का मंत्र दिया। शाह ने कहा कि सभी को समन्वय के साथ काम करना होगा ताकि चुनाव में सफलता मिल...
Read more »

Bihar Government: बिहार में अनुकंपा पर क्लर्क नियुक्ति में 45 फीसदी की अंकों की अनिवार्यता खत्म, पढ़ें डिटेलBihar Government: बिहार में अनुकंपा पर क्लर्क नियुक्ति में 45 फीसदी की अंकों की अनिवार्यता खत्म, पढ़ें डिटेलशिक्षा विभाग ने अनुकंपा नियुक्ति के नियमों में बदलाव किया है। विद्यालय लिपिक पद पर नियुक्ति के लिए इंटरमीडिएट में 45 अंक की अनिवार्यता अब समाप्त कर दी गई है। यह बदलाव अनुकंपा के आधार पर होने वाली नियुक्तियों के लिए किया गया है जिससे कई अभ्यर्थियों को राहत मिलेगी। सीधी भर्ती में यह नियम अभी भी लागू...
Read more »

स्टूडेंट्स के लिए बेस्ट हैं ये लैपटॉप, मिल रहे हैं आधे दाम पर, अमेज़न सेल में Dell, Asus सब शामिलस्टूडेंट्स के लिए बेस्ट हैं ये लैपटॉप, मिल रहे हैं आधे दाम पर, अमेज़न सेल में Dell, Asus सब शामिलAmazon Great Indian Festival Sale 2025 में छात्रों को लैपटॉप पर 45% तक की छूट मिल रही है. सेल में Dell, Lenovo और ASUS जैसे टॉप ब्रांड्स पर बैंक ऑफ़र, नो-कॉस्ट EMI और एक्सचेंज डील्स का फायदा उठाया जा सकता है.
Read more »

ट्रेन से रेलवे ट्रैक पर गिरे पाकिस्तानी नागरिक इरफान पर बड़ा अपडेट, बार-बार बदल रहा बयानट्रेन से रेलवे ट्रैक पर गिरे पाकिस्तानी नागरिक इरफान पर बड़ा अपडेट, बार-बार बदल रहा बयानKota News: दिल्ली-मुंबई रेलमार्ग पर ट्रेन से गिरकर घायल हुआ पाकिस्तानी नागरिक इरफान अब सुरक्षा एजेंसियों की गिरफ्त में है। उसके पास पासपोर्ट नहीं मिला लेकिन 1920 यूरो, 45 हजार रुपये नकद और 6 अलग-अलग ट्रेनों के टिकट बरामद हुए. इरफान खुद को पाकिस्तान के पंजाब प्रांत के अलमसा गांव का निवासी बता रहा है, मगर बार-बार बयान बदल रहा .
Read more »



Render Time: 2026-04-02 13:36:38