Maharashtra ST Department: राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफ लाइन असलेल्या एसटीसंदर्भात मोठा निर्णय
Maharashtra ST Department: राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफ लाइन असलेल्या एसटीसंदर्भात मोठा निर्णयमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय मुंबई एसटी महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांत 25 हजार बसेस घेणार आहे.
यापैकी चालू आर्थिक वर्षापासून पुढील चार वर्षांत 20 हजार बसेस खरेदी केल्या जाणार असून या सर्व बसेस पर्यावरणपूरक अशा सीएनजी आणि एलएनजीसारख्या इंधनाबरोबरच डिझेल इंधन हायब्रिड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत करण्याचं नियोजन आहे. पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात एसटी अधिकारी आणि संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या प्रतिनिधींसोबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली. यावेळी इंधन वापराचा आढावा घेण्यात आला.परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये एसटीच्या बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत अशी माहिती समोर आली. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34 टक्के खर्च हा इंधनावर होतो. महामंडळाला दररोज सुमारे 10 लाख 70 हजार लिटर इतके डिझेल लागते. परिणामी वर्षाला सुमारे 34 हजार कोटी रुपयांचा खर्च इंधनावर होतो, अशी माहिती यावेळी परिहवमंत्र्यांना अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता आणि त्याच्या दरात वारंवार होणारा बदल लक्षात घेता पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सीएनजी आणि एलएनजी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेलपेक्षा स्वस्त असून पर्यावरणपूरकदेखील आहेत, या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली.डिझेलपेक्षा सीएनजी, एलएनजी इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रतिलिटर पाच ते साडेपाच किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एलएनजी आणि सीएनजी इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याने पुढील वर्षीपासून नव्या 20 हजार बसेसच्या खरेदीला सुरुवात होणार आहे.दरम्यान, राज्यभरात 90 ठिकाणी एलएनजीचे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सीएनजीचे 20 पंप उभारण्यात येणार आहेत. सर्व नव्या बसेस या हायब्रिड इंधनावर चालणाऱ्या असतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत केलेल्या करारानुसार एलएनजी इंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या 20 टक्के कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी 235 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
Maharashtra State Transport Maharashtra State Transport Department CNG LNG Diesel 235 Crore St
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
AI ची मदत, 100 CCTV, फिल्मी पाठलाग अन्..; 36 लाख चोरणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून 12 तासात अटकCrime News Mumbai Police Sucess: पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली.
Read more »
...म्हणून अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या! 'अजित पवार मुर्दाबाद'ची घोषणाबाजीAjit Pawar Convoy: अजित पवार परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना हा प्रकार घडला.
Read more »
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा! 1 मे 1960 रोजी असा साजरा झाला पहिला महाराष्ट्र दिन; शिवनेरी, मुंबई अन्...Maharashtra Din 2025: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिन कसा साजरा करण्यात आला? याची एक झलक पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून
Read more »
'एक ऐवजी दोन चपटी प्या पण...', परिवहन मंत्र्यांसमोर ST कर्मचाऱ्यांना गोगावलेंचा अजब सल्लाBharat Gogawale On ST Driver Drink And Drive Case: एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये जाहीर भाषणात केलं हे विधान
Read more »
मोदींचा सल्ला, डोभालांचा फोन कॉल अन् 1.20 AM ला पहिला हल्ला... Operation Sindoor ची TimelineOperation Sindoor Full Timeline: भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याच्या वृत्ताला संरक्षण मंत्रालयाने रात्री 1 वाजून 44 मिनिटांनी दुजोरा दिला.
Read more »
मोदींचा सल्ला, डोभालांचा फोन कॉल अन् 1.20 AM ला पहिला हल्ला... Operation Sindoor ची TimelineOperation Sindoor Latest News in Marathi: भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम हल्ल्याचा सूड घेतला आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या करण्यात आल्यानंतर मागील काही दिवसांपासून भारत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देईल अशी शक्यता वारंवार व्यक्त केली जात होती.
Read more »
