Crime News Mumbai Police Sucess: पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली.
Crime News Mumbai Police Sucess: पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली.पोलिसांनी तपासाच्या जोरावर आरोपीला यशस्वीपणे केली अटक मालाडमध्ये घरफोडी करुन सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरणाऱ्याला चोराला पोलिसांनी 12 तासांच्या आत अटक केली आहे.
मालाड परिसरात रात्रीच्या वेळेस एका इमारतीमध्ये पाईपच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावर चढून एका घरातील कपाट फोडलं. या कपाटामधून चोराने सोने व हिऱ्यांचे दागिने अशी एकूण 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज पळवला. घरफोड्या करुन चोऱ्या करणाऱ्या या सराईत आरोपीला अवघ्या 12 तासांत अटक करुन पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली आहे.10 एप्रिलला रात्रीच्या वेळेस मालाड पश्चिम परिसरातील एका इमारतीमधील व्यावसायिकाच्या घरात पाईपवरुन चौथ्या मजल्यावर चढून हा चोर खिडीकीतून आत शिरला. घरातील लोक झोपले असताना कपाट तोडून त्याने कपाटातील सोने व हिऱ्याचे दागीने अशी एकूण 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. यासंदर्भात मालाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मालाड पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीच्या येण्याजाण्याच्या मार्गाचा पाठपुरावा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा इसम हा अस्पष्ट दिसत होता. त्यामुळे रेकॉर्डवरील इतर गुन्हेगारांची नोंद तपासण्यात आली. पोलिसांनी केलेला तांत्रिक तपास आणि इतर चौकशीबरोबर ए.आय.च्या मदतीने सीसीटीव्हीमधील अस्पष्ट फुटेज स्पष्ट करुन तपासलं असता चोरट्याची ओळख पटली.36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज पळवणारा हा चोरटा पोलीस रेकॉर्डमधील सराईत गुन्हेगार संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एकूण चार पथकं तयार करुन आरोपीताच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून पोलिसांनी तांत्रिक तपास केला. खास खबऱ्यांच्या सतत संपर्कात राहून पोलीस पथकाने अवघ्या 12 तासामध्ये मेहनतीने व कौशल्याचा वापर करत आरोपीला अटक केली.आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी कामाठीपूरा, जोगेश्वरी, अंबोली, अंधेरी, बांद्रा इत्यादी ठिकाणी जवळपास 100 सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करत त्याचा शोध घेतला. शोध घेत असताना आरोपी हा जोगेश्वरी पटरीजवळ, एका कच्च्या झोपडयापाशी दिसून आला. पोलीस पथकाने आरोपीचा जवळपास एक ते दीड किलोमीटर रेल्वे मार्गाच्या बाजूने फिल्मी स्टाइल धावत पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली.अटक आरोपी संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द मालाड, खार, जुहू, कांदीवली, बोरीवली, चारकोप, सांताक्रूझ, अंबोली, वर्सोवा, गोरेगांव, ओशिवरा इत्यादी पोलीस ठाण्यात एकूण 30 गुन्ह्यांची नोंद आहेत. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतूकडून चोरी केलेली सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने अशी एकूण 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करम्यात आल्याची माहिती गोरेगाव विभागाचे पोलीस निरिक्षक हेमंत सावंत यांनी दिली.महाराष्ट्र बातम्या
Man Held Theft 36 Lakh Gold Jewellery Mumbai Police Solve Case Less Than 12 Hours
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
कुटुंबाचा विरोध झुगारून लव्ह मॅरेज करणाऱ्या लेकीला लग्नानंतर 24 तासात संपवलं अन्...Crime News : पुन्हा एकदा सैराट.... प्रेम करून लग्न करणाऱ्या पोटच्या लेकिचा बापानं घेतला जीव. मृतदेहाची विल्हेवाट लावत त्यानं केलेलं कृत्य पायाखालची जमीन सरकवणारं...
Read more »
मुंबई विमानतळावर 36700000 लाखांचं सोनं जप्त; 3 विमानतळ कर्मचा-यांचा समावेशमुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात सोने पकडले असून या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आले आहे. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा समावेश देखील आहे.
Read more »
चलती बाइक से मारी थी गोली, सामने आया फिल्मी स्टाइल में मर्डर का CCTV फुटेजCCTV footage of the murder in filmy style varanasi चलती बाइक से मारी थी गोली, सामने आया फिल्मी स्टाइल में मर्डर का CCTV फुटेज राज्य | उत्तर प्रदेश
Read more »
‘सागरमाला 2.0’ से 12 लाख करोड़ रुपये के निवेश को मिलेगा बढ़ावा : केंद्रीय मंत्री‘सागरमाला 2.0’ से 12 लाख करोड़ रुपये के निवेश को मिलेगा बढ़ावा : केंद्रीय मंत्री
Read more »
काळी बाहुली, रांगेत मांडलेले लिंबू अन् हळदी-कुंकवाचा सडा; मुंबई हाय कोर्टासमोरच काळ्या जादूचा प्रकारMaharashtra News: पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात काळ्या जादूचे भूत उतरायचे नाव घेत नाही. कायदा करूनही लोकाना त्याचा धाक बसलेला नाही. याउलट चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेरच काळ्या जादूचा प्रकार समोर आलाय
Read more »
'त्या' लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळणLadki Bahin Yojana: राज्यात सत्ताधाऱ्यांना मोठी मदत करून गेलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. आता प्रतिनिधी थेट दारात येऊन....
Read more »
