Sarfaraz Khan : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाच्या ए संघाची घोषणा झाली. मात्र यात स्टार फलंदाज सरफराज खानचा समावेश करण्यात आलेला नाही. या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी सुद्धा उडी घेतली आहे.
Sarfaraz Khan : दक्षिण आफ्रिका ए सीरिजसाठी टीम इंडियाच्या ए संघाची घोषणा झाली आहे. मात्र या घोषणेनंतर मोठा गोंधळ उडालेला दिसतोय. राजकारणात सुद्धा या संघाची चर्चा होत असून खासदार असदुद्दीन ओवैसीनंतर आता काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मदने सुद्धा बीसीसीआयविषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एवढंच नाही तर त्यांनी याप्रकरणात हेड कोच गौतम गंभीरला सुद्धा ओढलं आहे. शमीने गौतम गंभीरवर धार्मिक पक्षपाताचा आरोप केला आहे.भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन टेस्ट सामन्यांची सीरिज खेळवली जात असून यात टीम इंडियाचं नेतृत्व ऋषभ पंतवर सोपवण्यात आलं आहे. तसंच साई-सुदर्शनला उप कर्णधार कऱण्यात आलं आहे. दोन्ही सामन्यांसाठी वेगवेगळा संघ निवडण्यात आला आहे. पण दोन्ही सामन्यांमध्ये ऋषभ पंत कर्णधार आणि साई सुदर्शन उप कर्णधार असेल. मात्र दोन्ही संघामध्ये स्टार फलंदाज सरफराज खानला स्थान देण्यात आलं नाहीये. सरफराज खानने 2024 मध्ये भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत, इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध त्याने चांगली खेळी सुद्धा केली होती. त्यानंतर सरफराज खानने दोन महिन्यात तब्बल 17 किलो वजन कमी केलं. तो आधीपेक्षा अजून फिट झाला मात्र तरीही त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघात स्थान देण्यात आलं नाही. काँग्रेस नेत्या शमा मोहम्मदने ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला की सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे भारतीय संघात निवडलं जात नाहीये. शमा मोहम्मद यांनी गंभीरच्या भारतीय जनता पक्षातील कार्यकाळाचा उल्लेख करत म्हटले की, सरफराज खानची निवड त्याच्या आडनावामुळे झाली नाही का? मी फक्त विचारत आहे. या मुद्द्यावर गौतम गंभीरची भूमिका आपल्याला माहिती आहे.हेही वाचा : गोल्डन बॉय नीरज चोप्राला मिळालं लष्करात मोठं पद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहकडून सन्मान Is Sarfaraz Khan not selected because of his surname ! We know where Gautam Gambhir stands on that matter Dr. Shama Mohamed October 22, 2025ओवैसीने विचारला प्रश्न : सरफराज हा टेस्ट फॉरमॅटमधील सर्वात सातत्यपूर्ण फलंदाजांपैकी एक आहे, त्याने 56 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये प्रति डाव सरासरी 65.19 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा काढणाऱ्या आणि गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सरफराजने या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या फिटनेसमध्ये आणखी सुधारणा केली. मात्र तरीही सरफराजला भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन चे प्रेसिडेंट असदुद्दीन ओवैसी यांनी पोस्ट शेअर करत प्रश्न उपस्थित केला. त्याने एक्सवर लिहिलं की, सर्फराज खानची इंडिया ए साठीही निवड का झाली नाही?. FAQ : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत ए संघाची घोषणा कशी झाली?उत्तर: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दोन अनौपचारिक टेस्ट सामन्यांसाठी भारत ए संघाची घोषणा बीसीसीआयने मंगळवारी केली. दोन्ही सामन्यांसाठी वेगवेगळे संघ निवडण्यात आले आहेत, पण दोन्ही संघात ऋषभ पंत कर्णधार आणि साई सुदर्शन उपकर्णधार असतील. ही सीरीज १९ नोव्हेंबरपासून सुरू होईल.सरफराज खानची क्रिकेट कारकीर्द काय आहे?उत्तर: सरफराज खान हा टेस्ट फॉरमॅटमधील सातत्यपूर्ण फलंदाज आहे. त्याने ५६ फर्स्ट क्लास सामन्यांत सरासरी ६५.१९ धावांची कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट पदार्पण करून त्याने चांगल्या खेळ्या केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो भरपूर धावा काढणारा खेळाडू आहे, पण भारत ए संघात त्याला नाकारण्यात आले.काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी काय म्हटले?उत्तर: काँग्रेस नेत्य शमा मोहम्मद यांनी एक्सवर पोस्ट करून सरफराज खानच्या वगळण्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले, सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे भारत ए संघात निवडले गेले नाही का? मी फक्त विचारत आहे. गौतम गंभीरच्या भाजप कार्यकाळाची भूमिका आपल्याला माहिती आहे. यामुळे धार्मिक पक्षपाताचा आरोप झाला आणि त्यांना सोशल मीडियावर टीका झाली.
Marathi News Gautam Gambhir Team India
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
सरफराज खान को इंडिया ए के लिए भी नहीं चुना गया... BCCI के फैसले पर भड़के ओवैसी, पूछा तीखा सवालSarfaraz Khan News: एआईएमआईएम के चीफ असदुद्दीन ओवैसी ने सरफराज खान को इंडिया ए बनाम साउथ अफ्रीका ए सीरीज में जगह नहीं दिए जाने पर नाराजगी जाहिर की और इसे लेकर बीसीसीआई से सवाल भी पूछा.
Read more »
Sarfaraz Khan के साथ हुआ धोखा! होम टेस्ट सीरीज के लिए चुने जाने को कहा गया था, लेकिन सेलेक्टर्स ने नहीं दिया कोई भावSarfaraz Khan: शानदार घरेलू रिकॉर्ड के बावजूद सरफराज खान को लगातार भारतीय टीम से नजरअंदाज किया जा रहा है। हाल ही में उन्हें इंडिया-ए टीम और वेस्टइंडीज टेस्ट सीरीज से बाहर रखा गया। एक रिपोर्ट के अनुसार, वेस्टइंडीज सीरीज के लिए उन्हें फिटनेस टेस्ट समय पर पास न करने के कारण बाहर किया गया, जबकि उन्होंने बाद में इसे पास कर लिया था। फैंस इस फैसले से...
Read more »
Sarfaraz Khan: किस तरह भारतीय टीम के संयोजन में बने रह सकते हैं सरफराज खान? इस नंबर पर खेलें तो बन सकती है बातभारतीय टीम के बल्लेबाज सरफराज खान घरेलू क्रिकेट में अच्छे प्रदर्शन के बावजूद टीम में जगह नहीं बना पा रहे हैं। सरफराज को वेस्टइंडीज के खिलाफ दो मैचों की टेस्ट सीरीज में नहीं चुना
Read more »
सरनेम के कारण नहीं हुआ सरफराज का सेलेक्शन? ओवैसी के बाद शमा मोहम्मद के बयान पर मचा बवाल, निशाने पर गौतम गंभीरSarfaraz Khan Selection Controversy: साउथ अफ्रीका ए के खिलाफ सीरीज के लिए इंडिया ए टीम में सरफराज खान को नहीं चुने जाने बाद बवाल मच गया है.
Read more »
सरफराज खान का चयन न होने पर विवाद: कांग्रेस प्रवक्ता का गंभीर पर आरोप; सरफराज को ‘खान’ सरनेम के कारण नहीं च...साउथ अफ्रीका ए के खिलाफ दो चार दिवसीय मैचों की सीरीज के लिए भारत ए टीम में सरफराज खान को नहीं चुने जाने पर सवाल उठने लगे हैं। साउथ अफ्रीका ए के खिलाफ मंगलवार को भारत ए का ऐलान किया गया। दोनों मुकाबले बेंगलुरु स्थितIndia A Vs South Africa Team Selection Controversy Update; Follow Shama Mohammed Vs Gautam Gambhir, Sarfaraz Khan, Rishabh Pant Latest...
Read more »
சர்ஃபராஸ் கான் விஷயத்தில் நிர்வாகம் செய்த தவறு.. போட்டுடைத்த அஸ்வின்!Sarfaraz Khan: சர்ஃபராஸ் கான் இந்திய ஏ அணியிலும் தேர்வாக நிலையில், நிர்வாகம் கதவை முடிவிட்டதாக ரவிச்சந்திரன் அஸ்வின் விமர்சித்துள்ளார்.
Read more »
