Santosh Deshmukh Murder Case: विशेष सरकारी वकील अॅडवोकेट उज्वल निकम यांनी न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Santosh Deshmukh Murder Case : विशेष सरकारी वकील अॅडवोकेट उज्वल निकम यांनी न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरण ाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.
सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून हे प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात युक्तीवाद केला आहे. त्यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब घेण्यात आले. हे सर्व जबाब गोपनीय आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केल आहे. घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले आहेत. यावेळी त्यांनीदेखील हत्येची कबुली दिल्याचे म्हटलं आहे. तर सुदर्शन घुले हाच या टोळीचा प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयातही असाच युक्तिवाद केला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष हत्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला. तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले. हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केली. आता पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे. केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावे, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीडच्या न्यायालयात पार पडली.8 डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदुर फाटा येथे विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडवे येत आहेत. अस विष्णू चाटे म्हणाले. त्यावेळी कायमचा धडा शिकवा अस सांगितलं. या संपुर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाईड केले. तस cdr मधुन समोर आलय. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तिन वेळा फोन केला. सुरवातीला आवादा कंपणीच्या वॉचमेनला सुदर्शन घुले यांनी मारहाण केली, असा युक्तीवाद उज्वल निकम यांनी केला.महाराष्ट्र बातम्या
Santosh Deshmukh Santosh Deshmukh Murder Case In Marathi Beed Case In Marathi Beed Live News बीड आजच्या बातम्या संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख Santosh Deshmukh Case & Walmik Karad
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेलीपुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी 20 जणांचे निवंबन करण्यात आले आहे.
Read more »
Breaking News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार!Santosh Deshmukh murder case:सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल करुन यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. आरोपी दोन क्रमांक वर विष्णू चाटे याच नाव आहे.
Read more »
सरपंच हत्याकांड- महाराष्ट्र के मंत्री धनंजय मुंडे का इस्तीफा: मर्डर का आरोपी उनका करीबी, हत्या के दौरान पीट...Maharashtra Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Update; Follow Devendra Fadnavis, NDA Ajit Pawar Latest News, Headlines On Dainik Bhaskar.
Read more »
Beed: 'आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा' म्हणणाऱ्या नामदेवशास्त्रींना अखेर उपरती; म्हणाले, 'अजाणतेपणातून...'Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाली असून यावर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Read more »
संतोष देशमुखांचा Postmortem Report समोर; तुटलेल्या बरगड्या, काळंनिळं पडलेले शरीर अन्...Beed Santosh Deshmukh Murder News: सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे समोर
Read more »
'फोन ठेवल्यावर पप्पा म्हणाले, माझे काही बरे वाईट झाले तर...'; संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाबSantosh Deshmukh Murder Case Daughter Statement: संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी ते घरातून बाहेर पडण्यापूर्वी काय काय झालं हे त्यांच्या मुलीने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात सांगितलं आहे.
Read more »
