Santosh Deshmukh Murder Case Daughter Statement: संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी ते घरातून बाहेर पडण्यापूर्वी काय काय झालं हे त्यांच्या मुलीने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात सांगितलं आहे.
Santosh Deshmukh Murder Case Daughter Statement : संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी ते घरातून बाहेर पडण्यापूर्वी काय काय झालं हे त्यांच्या मुलीने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात सांगितलं आहे.बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांची मुलगी वैभवी देशमुखने नोंदवलेला धक्कादायक जबाब 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे.
9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अमानुष छळ करुन संतोष देशमुख यांची वाल्मिक कराडच्या गुंडांनी हत्या केल्याचं तपासात हळूहळू समोर येत आहे. मात्र संतोष देशमुख या गुंडांना भेटायला जाण्याआधी घरी काय घडलं होतं हे त्यांची मुलगी वैभवी देशमुखने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामधून समोर आलं आहे.संतोष देशमुख यांनी 9 डिसेंबर रोजी घरातून निघण्याआधी वैभवीशी संवाद साधला होता. यावेळेस संतोष देशमुख यांनी मुलीला,"माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे," असं सांगितलं होतं. यासंदर्भातील उल्लेख वैभवीच्या जबाबामध्ये आहे. मात्र हा संवाद होण्याआधी संतोष देशमुख फोनवर कोणाशी तरी बोलत होते. या फोन कॉलवर संतोष देशमुख काय म्हणालेले याची माहितीही वैभवीने दिली आहे."भाऊ एवढं काय झालं नाही. कशाला एवढं ताणता भाऊ? एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का? असं ते म्हणत होते. पप्पाचा हा फोन दहा ते 12 मिनिटे सुरू होता," असं वैभवी देशमुख यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटलं आहे. तसेच हा कॉल विष्णू चाटेचाच होता असं संतोष देशमुख यांनी मुलीला सांगितलं होतं. तिनेच हा खुलासा जबाब नोंदवताना केला आहे.सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे समोर आले आहे. आरोपींच्या मारहाणीत देशमुखांचे शरीर काळे-निळे पडले होते. त्यांच्या डोळ्याखालील देखील काळे व्रण होते, असं धक्कादायक वास्तव शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. असंख्य जखमा आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळं देशमुखांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. संतोष देशमुख यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. देशमुखांच्या हनुवटी, कपाळ आणि दोन्हा गालांवर जखमा आहेत. तसंच, छाती-गळ्यावरदेखील जबर मारहाण करण्यात आली होती. जवळपास दीड-दोन तास मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.नाना पाटेकरांना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! मागील सात वर्ष...
Santosh Deshmukh Murder Case Statement Daughter Police Santosh Deshmukh Statement
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'येत्या काही दिवसांत...', ठाकरेंच्या सेनेचा 'लाडक्या बहिणीं'ना इशारा; म्हणाले, 'सरकारची ‘भाईगिरी’...'Ladki Bahin Yojana: नऊ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढल्यानंतर सरकारचे तब्बल 945 कोटी रुपये वाचले आहेत.
Read more »
महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढणार तर इथं पावसाची शक्यता!Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही भागांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे तर काही ठिकाणी पावसाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read more »
'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?Dombivali News Today: वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान वेहलोली फाटकाजवळ लोकल ट्रेन मधून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Read more »
देशमुखांच्या हत्येचा कट, विष्णु चाटे व सुदर्शन घुलेतील 'तो' संवाद; साक्षीदाराचा जबाब झी 24 तासच्या हातीBeed News: देशमुख हत्या प्रकरणी 5 गोपनीय साक्षीदरांचे जबाब हाती आले आहेत. देशमुखांच्या हत्येचा कट कसा, कुठे रचला हे उघड.
Read more »
... नाहीतर घुले तुम्हाला सोडणार नाही; संतोष देशमुखांना दिलेला इशारा! वाचा पाचही साक्षीदारांचा जबाबBeed News Today: संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्या पाच गोपनीय साक्षीदारांचे जवाब समोर आले आहेत. वाचा सर्वच्या सर्व साक्षीदारांचे जबाब
Read more »
Horoscope : कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना होईल आर्थि लाभ; कसा असेल आजचा दिवस08 मार्च 2025, शनिवार हा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे.
Read more »
