'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?

Dombivali News Today News

'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?
Thane NewsDombivaliAsangaon
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 81 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 85%
  • Publisher: 63%

Dombivali News Today: वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान वेहलोली फाटकाजवळ लोकल ट्रेन मधून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Dombivali News Today : वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान वेहलोली फाटकाजवळ लोकल ट्रेन मधून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.वासिंद- आसनगाव मार्गावर लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

मात्र आता या प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर येत आहे. वासिंद-आसनगाव मार्गावर मृत्यू झालेल्या आकांक्षा जगताप हिने लोकलमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणामुळं तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या तपासात ही बाब निष्पन्न झाल्याचे समोर येत आहे. आसनगाव- वासिंद दरम्यान वेहलोली फाट्याजवळ बुधवारी संध्याकाळच्या सुमारास आसनगाव लोकलमधून एक तरुणी खाली पडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर लगेचच तिला उपचारांसाठी आसनगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. मृत तरुणीच्या कुटुंबीयांकडून आणि मित्र-मैत्रिणींकडून चौकशी करण्यात आली. त्यात जी माहिती उघड झाली त्यानुसार आकांक्षाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्या मुलासोबत तरुणीचे प्रेमप्रकरण होते त्याचा शोध लागला नसून तो डोंबिवलीतील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तसंच, तोदेखील अल्पवयीन असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून तरुणीचे त्याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. तिच्या कुटुंबीयांनादेखील याबाबत माहिती होती. मात्र त्यांच्यात काय बिनसले आणि तिने इतक्या टोकाचे पाऊल का उचललं हे मात्र समोर आले नाहीये.मयत तरुणीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसंच, कुटुंबीयांकडूनही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मुलीच्या मृत्यूचा त्यांना धक्का बसला आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये गर्दी वाढत असताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेनमधून पडून एका तरुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.महाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Thane News Dombivali Asangaon Vashind Railway Station Mumbai Train Accident GRP Bhopar Village Dombivli Police Station Mumbai Local Train Update Mumbai Local Train News Mumbai Local News Update मुंबई लोकल ट्रेन मुंबई लोकल ट्रेन अपडेट

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'Sanjay Raut Salams Kangana Ranaut: कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
Read more »

महाकुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांचा इनोव्हाला भीषण अपघात; रत्नागिरीतील तिघांचा मृत्यूमहाकुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांचा इनोव्हाला भीषण अपघात; रत्नागिरीतील तिघांचा मृत्यूनाशिक जवळील सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील भाविकांचा इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे.
Read more »

काँगो संघर्षात १८ आफ्रिकन सैनिकांचा मृत्यूकाँगो संघर्षात १८ आफ्रिकन सैनिकांचा मृत्यूकाँगो गणराज्यच्या संघर्षादरम्यान अनेक आफ्रिकन देशांतील १८ सैनिकांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या सैनिकांचे शव युगांडा परत पाठवण्यात आले आहेत.
Read more »

महाकुंभ यात्रींच्या गर्दीत रेल्वे स्टेशनवर भगदड़, अनेक जणांचा मृत्यूमहाकुंभ यात्रींच्या गर्दीत रेल्वे स्टेशनवर भगदड़, अनेक जणांचा मृत्यूनवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शिव गंगा एक्सप्रेस ट्रेनला पकडण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. महाकुंभ यात्रींसाठी विशेष ट्रेनच्या घोषणेमुळे भगदड़ मचली आणि अनेक जणांचा मृत्यू झाला.
Read more »

बॉम्बे HC लेफ्टिनेंट करनला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाहीबॉम्बे HC लेफ्टिनेंट करनला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाहीमुंबईच्या बॉम्बे उच्च न्यायालयाने एका बर्खास्त लेफ्टिनेंट करनला एका 11 वर्षाच्या मुलीचा लैंगिक शोषण आणि दुर्व्यवहार करण्यास पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाही.
Read more »

75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरिय बैठक?75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरिय बैठक?India Pakistan Flag Meeting: LoC सारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात झाली उच्चस्तरीय बैठक. दोन्ही देशांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आंतरराष्ट्रीय विश्वात एकच चर्चा...
Read more »



Render Time: 2026-04-02 20:24:52