महाकुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांचा इनोव्हाला भीषण अपघात; रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू

खबर News

महाकुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांचा इनोव्हाला भीषण अपघात; रत्नागिरीतील तिघांचा मृत्यू
कुंभमेळाअपघातमृत्यू
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

नाशिक जवळील सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील भाविकांचा इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे.

कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या इनोव्हा ला नाशिक मध्ये भीषण अपघात झाला आहे. नाशिक जवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघात ात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघात ात मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे तर चालक भगवान उर्फ बाबू झगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यवसायिक अक्षय निकम यांचाही समावेश आहे. एकूण सातजण या गाडीमधून महाकुंभमेळ्यासाठी रत्नागिरी येथून निघाले होते.

मात्र वाटेतच त्यांचा अपघात झाला. सर्व मयत व्यक्ती रत्नागिरीमधील खेडशी येथील रहिवासी होते. महाकुंभमेळ्यासाठी गेलेले यातील काहीजण एकमेकांचे नातेवाईक आहेत, अशी माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त इनोव्हा कारमध्ये कोणकोण होतं याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी माळ नाका येथील डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, रत्नागिरी येथील मंदिराचे विश्‍वस्त संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहनचालक भगवान तथा बाबू झगडे असे 7 जण प्रवास करीत होते. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. किरण निकम यांची प्रकृती गंभीर आहे तर संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे.हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ पहाटे 4 वाजता झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या इनोव्हा गाडीचा चक्काचुर झाली. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप करू शकले नाही मात्र सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान सोहळ्यानंतर इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्‍या डंपरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्गावरुन प्रवास करणार्‍या वाहनचालकांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली. दरम्यान हा सगळा गंभीर अपघात झाल्याचे कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

कुंभमेळा अपघात मृत्यू रत्नागिरी नाशिक इनोव्हा प्राचार्य सामाजिक कार्य

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

रायगड-मुंबई महामार्गावर चार तरुणांचा अपघाती मृत्यू!रायगड-मुंबई महामार्गावर चार तरुणांचा अपघाती मृत्यू!रायगड-मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओ गाडीला टोइंग व्हॅनने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.
Read more »

मुंबईतील नववर्षाच्या पार्टीत मराठी आणि भोजपुरी गाण्यावरुन तुफान राडा, एकाचा मृत्यूमुंबईतील नववर्षाच्या पार्टीत मराठी आणि भोजपुरी गाण्यावरुन तुफान राडा, एकाचा मृत्यूमुंबईतील एका पार्टीत मराठी आणि भोजपुरी गाण्यावरुन झालेल्या वादामुळे एका मृत्यू झाला आहे. हाणामारी झाल्याने दोन तरुणांना गंभीर जखमी झाले आहेत.
Read more »

पुणे जिल्ह्यातील ट्रकच्या धडकीत तीन जणांची मृत्यूपुणे जिल्ह्यातील ट्रकच्या धडकीत तीन जणांची मृत्यूशिरूर तालुक्यातील शिक्रापुर येथे एका ट्रकने बाईकला धडकून तीन जणांची मृत्यू झाली.
Read more »

अमेरिकेत बर्ड फ्लूने पहिला बळीअमेरिकेत बर्ड फ्लूने पहिला बळीअमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिल्यांदा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Read more »

Tirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमीTirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू; अनेकजण जखमीTirupati Temple Stampede: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील विष्णू निवासमजवळ दर्शन तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read more »

पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीरपद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीरप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील तिघांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 14:21:47