Sadavarte On Raj Thackeray: 'उद्याचा मोर्चा लबाडांचा, राज ठाकरेंना मोर्चाआधीच अटक करा', गुणरत्न सदावर्ते आक्रमक!

Gunaratna Sadavrte News

Sadavarte On Raj Thackeray: 'उद्याचा मोर्चा लबाडांचा, राज ठाकरेंना मोर्चाआधीच अटक करा', गुणरत्न सदावर्ते आक्रमक!
Political AttackedMNS Chief Raj ThackeryPolitical News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 150 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Gunaratna Sadavrte On Raj Thackeray: मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बॉसला कानशिलात लगावा असे मिश्किल विधान यावेळी राज ठाकरेंनी केले होते.

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray: मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बॉसला कानशिलात लगावा असे मिश्किल विधान यावेळी राज ठाकरे ंनी केले होते.

यावर गुणरत्न सदावर्ते यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय. नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?EVM मधून होणाऱ्या घोटाळ्याच्या विरोधात 1 तारखेचा मोर्चा दणदणीत मोर्चा झाला पाहिजे. दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे.महाराष्ट्रात काय प्रकारचा राग आहे ते तुम्ही या मोर्चातून दाखवा. तो व्यक्त करण्यासाठी तुम्हाला तिकडे यावं लागेल. आज नोकरी होती. बॉसने नाही सांगितलं. बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. मला असं वाटतं तुमचा बॉसदेखील मतदारच आहे. त्यालाही मोर्चात घेऊन या, अशी मिश्किल टीपणी राज ठाकरेंनी केली होती. मतदारांचा अपमान महाराष्ट्रासह देशात मतदाराचा अपमान सुरुय. मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहतो. त्याच्या मताचा तो अपमान आहे. हे सर्व वेळीच सुधारलं पाहिजे. हे सगळं नीट झालं पाहिजे. देशातील निवडणुका पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत, अशी मागणी यावेळी राज ठाकरेंनी केली. सर्व पुढारलेल्या देशात आजही बॅलेट पेपरवर मतदान होतात. 3-4 देशात वोटींग मशीन वापरलं जातं. तेही आफ्रिकेत. पण सगळ्या देशांत बॅलेट पेपर वापरला जातो, असे राज ठाकरे म्हणाले. काय म्हणाले सदावर्ते?उद्याचा मोर्चा लबाडांचा मोर्चा आहे. नोकरीसाठी मोर्चा नाहीय. गुलाबी मोर्चा आहे. राजकारण तापवण्यासाठी तुम्ही लोकांना तसेच तिन्ही यंत्रणांना वेठीस धरु शकत नाही. हिंसक वृत्ती दाखवा, व्यापाऱ्यांना कशाप्रकारे मारा हे त्यांनी सांकेतिक भाषेत सांगितले. व्यापाऱ्यांना मारहाण झाली, कर्मचाऱ्यांची नोकरी गेली तर कोण जबाबदारी घेणार? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी केला. आपण राजकीयदृष्ट्या पराभूत होणार, आपली माती होणार आहे, हे राज ठाकरेंना माहिती आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. जरांगेच्यावेळी मुंबईने भोगलं. ही दुसरी आवृत्ती आहे का? असा प्रश्न सदावर्तेंनी विचारला. सुप्रीम कोर्टानेही अशा कृत्यांवर बंदी आणलीय. राज आणि उद्धव ठाकरे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. ते मुंबईच्या लाईफलाईनला धोका पोहोचवताय, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.FAQ १. राज ठाकरेंनी १ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत नेमके काय आवाहन केले आणि त्यांची मिश्कील टीपणी काय होती?राज ठाकरेंनी ईव्हीएममधील घोटाळ्याविरोधात १ नोव्हेंबरला मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन केले. दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास सांगितले. मिश्कील टीपणीत ते म्हणाले, आज नोकरी होती. बॉसने नाही सांगितलं. बॉसला मारा. शनिवारपर्यंत एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसदेखील मतदारच आहे, त्यालाही मोर्चात घेऊन या.२. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चा आणि विधानांवर काय तीखी प्रतिक्रिया दिली?गुणरत्न सदावर्ते यांनी मोर्चाला लबाडांचा मोर्चा आणि गुलाबी मोर्चा म्हणून हिणवले. ते म्हणाले, हा राजकारण तापवण्यासाठी आहे आणि हिंसक वृत्ती दाखवून व्यापाऱ्यांना मारण्याचे सिग्नल देत आहेत. व्यापाऱ्यांना मारहाण झाली किंवा कर्मचाऱ्यांची नोकरी गेली तर जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, राज ठाकरे यांना राजकीय पराभवाची जाणीव आहे आणि सुप्रीम कोर्टाने अशा कृत्यांवर बंदी घातली आहे.३. राज ठाकरे यांनी मतदारांच्या अपमानाबाबत काय मत मांडले आणि बॅलेट पेपरची मागणी का केली?राज ठाकरेंनी ईव्हीएममुळे मतदारांचा अपमान होत असल्याचे सांगितले. मतदार रांगेत उभे राहतात, पण त्यांचे मत चोरणे हे अपमान आहे. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. विकसित देशांत बॅलेट पेपर वापरले जातात, फक्त आफ्रिकेतील ३-४ देशांत व्होटिंग मशीन, असे म्हणत ते बॅलेट पेपरवर परत जाण्याची मागणी करत आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Political Attacked MNS Chief Raj Thackery Political News Marathi News राज ठाकरे गुणरत्न सदावर्ते Zee 24 Taas मराठी बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

राज ठाकरे मोठ्या तयारीत! युतीच्या चर्चांमध्ये करणार गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षवेधी घडामोडराज ठाकरे मोठ्या तयारीत! युतीच्या चर्चांमध्ये करणार गौप्यस्फोट, महाराष्ट्राच्या राजकारणातील लक्षवेधी घडामोडRaj thackeray to make Big Revelations : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींचे वारे...
Read more »

Gun Culture, Cruelty, Misrule And Corruption Are Identities Of RJDs Jungle Raj In Bihar: Says PM Modi In MuzaffarpurGun Culture, Cruelty, Misrule And Corruption Are Identities Of RJDs Jungle Raj In Bihar: Says PM Modi In MuzaffarpurPrime Minister Modi also targeted the Congress-RJD alliance, accusing them of insulting Chhathi Maiya and disrespecting the devotion of women who observe Chhath Puja, one of Bihar’s most revered festivals.
Read more »

कानपुर में वकील ने दरोगा को थप्पड़ मारा: जानलेवा हमले के आरोपी को पकड़ा तो गाली देकर दौड़ाया, पुलिस वैन में ले...कानपुर में वकील ने दरोगा को थप्पड़ मारा: जानलेवा हमले के आरोपी को पकड़ा तो गाली देकर दौड़ाया, पुलिस वैन में ले...Police and lawyers clash during the arrest of Prince Raj, accused of assaulting a law student. Police and lawyers clash and abuse during the arrest of debarred lawyer Prince Raj from the court in Kanpur.
Read more »

EVM मधून वोट चोरी कशी होते? राज ठाकरेंनी महारााष्ट्राला दाखवले 'जादूचे प्रयोग'EVM मधून वोट चोरी कशी होते? राज ठाकरेंनी महारााष्ट्राला दाखवले 'जादूचे प्रयोग'Raj Thackeray: वोट चोरीच्या मुद्यावरुन देशभरात विरोधकांनी रान पेटवलंय. काँग्रेसन नेते राहूल गांधी यांनी कशाप्रकारे मतदान झाले याचे सादरीकरण केले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी मतदारसंघातील मतदानाबाबत धक्कादायक खुलासा केला.
Read more »

NaMo ટૂરિસ્ટ સેન્ટર બનશે તો તોડી નાખીશું... અચાનક કેમ આટલા ગુસ્સે થયા રાજ ઠાકરે? કોને આપી ખુલ્લેઆમ ચેતવણી?NaMo ટૂરિસ્ટ સેન્ટર બનશે તો તોડી નાખીશું... અચાનક કેમ આટલા ગુસ્સે થયા રાજ ઠાકરે? કોને આપી ખુલ્લેઆમ ચેતવણી?Raj Thackeray: મહારાષ્ટ્રમાં બીએમસી ચૂંટણી પહેલા ઠાકરે બ્રધર્સમાં ભાઈચારો વધતો જોવા મળી રહ્યો છે. આવી સ્થિતિમાં અચાનક રાજ ઠાકરેએ રાજ્યના નાયબ મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદેને ચેતવણી આપી છે. તેમણે કહ્યું કે, આત્મસન્માનને ગીરવે મૂકવાની પણ કોઈ સીમા હોય છે. કોઈ મુખ્યમંત્રી બનવા માટે કેટલા બેતાબ હોય શકે છે.
Read more »

Sadavrte On Raj Thackeray: 'उद्याचा मोर्चा लबाडांचा, राज ठाकरेंना मोर्चाआधीच अटक करा', गुणरत्न सदावर्ते आक्रमक!Sadavrte On Raj Thackeray: 'उद्याचा मोर्चा लबाडांचा, राज ठाकरेंना मोर्चाआधीच अटक करा', गुणरत्न सदावर्ते आक्रमक!Gunaratna Sadavrte On Raj Thackeray: मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. बॉसला कानशिलात लगावा असे मिश्किल विधान यावेळी राज ठाकरेंनी केले होते.
Read more »



Render Time: 2026-04-02 02:47:08