Success Story: ASI वडिलांची लेक 'अशी' बनली IAS, रुपल यांची कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी!

Success Story News

Success Story: ASI वडिलांची लेक 'अशी' बनली IAS, रुपल यांची कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी!
IAS Rupal RanaUPSC Success Story In MarathiIAS UPSC Success Story
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 112 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Success Story: आपल्या लेकीने आयुष्यात मोठ्या पदावर काम करावं, खूप नाव कमवावं असं प्रत्येक वडिलांना वाटत असतं. समाज आपल्याला आपल्या लेकीमुळे ओळखतो, ही वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट असते. अशाच एक मेहनती वडिलांच्या जिद्दी लेकीची ही कहाणी आहे. या लेकीने आपल्या कर्तृत्वाने आपल्या वडिलांचे नाव रोशन केलं.

Success Story : आयएएस रुपल राणा यांची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत.आपल्या लेकीने आयुष्यात मोठ्या पदावर काम करावं, खूप नाव कमवावं असं प्रत्येक वडिलांना वाटत असतं. समाज आपल्याला आपल्या लेकीमुळे ओळखतो, ही वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट असते.

अशाच एक मेहनती वडिलांच्या जिद्दी लेकीची ही कहाणी आहे. या लेकीने आपल्या कर्तृत्वाने आपल्या वडिलांचे नाव रोशन केलं. आयएएस रुपल राणा यांची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांना न जुमानता त्यांनी आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. रुपल यांचे वडील दिल्ली पोलिसात असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत आहेत. ज्यांना त्यांच्या मुलीच्या यशाचा अभिमान वाटतो. रूपल राणा या मूळच्या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील आहेत. त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया 26 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला. काहीतरी चांगले करण्याची इच्छा असेल, त्याला प्रामाणिकपणा,मेहनतीची जोड असेल तर तुम्ही अडचणींवर मात करुन मोठे यश मिळवू शकता हे रुपल यांची कहाणी वाचून लक्षात येईल.रुपल यांनी बागपत येथील जेपी पब्लिक स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. हायस्कूलच्या परीक्षेत त्यांना 10 सीजीपीए गुण मिळाले. यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी बी.एस्सी केले. दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमधून. पदवी पूर्ण केली. जिथे रूपल विद्यापीठात टॉपर ठरल्या होत्या.रुपलं यांच्या लहानपणीच आईचे निधन झाले. त्यामुळे आयुष्यात त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. असे असले तरी वडिलांनी त्यांना ही कसर कधी जाणवू दिली नाही. त्यांचे वडील जसवीर राणा हे दिल्ली पोलिसात असिस्टंट सब-इन्स्पेक्टर म्हणजे एएसआय आहेत. त्यांनी रुपलला खूप आधार दिला. तसेच भाऊ-बहिणींनीही त्यांना पाठिंबा दिला. रुपल यांनी स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि यश मिळवले. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या दुःखाने त्या खचून गेल्या नाही. त्यांना त्याला स्वत: च्या शक्तीत रुपांतरीत केले.रुपल यांना यश सहजासहजी मिळाले नाही. रुपल यांना पहिल्या दोन प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत अपयश हाती आले. पण त्यांनी हार मानली नाही. चुकांमधून त्या शिकत गेल्या आणि त्यांनी स्वत:च्या धोरणात सुधारणा केली.अखेर रुपल यांना त्यांच्या दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी 2024 च्या यूपीएससी परीक्षेत 26 वा क्रमांक मिळवला.रुपल राणा यांच्या यशाची कहाणी जगभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कौटुंबिक मूल्ये, समर्पण आणि घरी सहाय्यक वातावरण असेल तर यश मिळते, ते या कहाणीतून कळते.सिडकोच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लॉटरीत सर्वात मोठा घोळ!...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IAS Rupal Rana UPSC Success Story In Marathi IAS UPSC Success Story UPSC IAS Toppers Success Story

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!Khatabook Success Story: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप्सविषयी खूप बोलंल जातंय. विशेष करुण तरुण पिढी स्टार्टअपच्या मागे जाताना दिसतेय, जे देशाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून चांगले लक्षण आहे. यामुळे नवोपक्रम आणि उद्योजकतेच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे.
Read more »

महिला दिनी राज ठाकरेंनी सांगितली पूर्णिमा देवी बर्मनची प्रेरणादायी कहाणी; एकदा वाचाचमहिला दिनी राज ठाकरेंनी सांगितली पूर्णिमा देवी बर्मनची प्रेरणादायी कहाणी; एकदा वाचाचWorld Women Day 2025 Raj Thackeray Facebook Post: राज ठाकरेंनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये एका महिलेचं उदाहरण दिलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या...
Read more »

दिन में जॉब और रात में पढ़ाई, बिना कोचिंग पहली ही कोशिश में क्रैक किया UPSC, पढ़ें सृष्टि डबास की Success Storyदिन में जॉब और रात में पढ़ाई, बिना कोचिंग पहली ही कोशिश में क्रैक किया UPSC, पढ़ें सृष्टि डबास की Success StoryIAS Success Story: पढ़िए IAS सृष्टि डबास की सफलता की कहानी, जिन्होंने बिना कोचिंग के पहली ही प्रयास में UPSC परीक्षा पास की.
Read more »

Success Story: वडिलांच रस्त्याच्याकडेला दुकान, लेकीने खो-खोमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, नसरीनची प्रेरणादायी कहाणीSuccess Story: वडिलांच रस्त्याच्याकडेला दुकान, लेकीने खो-खोमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, नसरीनची प्रेरणादायी कहाणीNasreen Shaikh inspirational Story: जगात अनेक ठिकाणी आजही महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी नाहीयत, त्यांच्याकडे चूल आणि मूल या दृष्टीकोनातूनच पाहिले जाते. असे असताना अनेक महिला संघर्षांच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत.
Read more »

Success Story: सहावीत नापास झालेली मुलगी कशी बनली IAS? रुक्मणी यांची कहाणी देईल प्रेरणा!Success Story: सहावीत नापास झालेली मुलगी कशी बनली IAS? रुक्मणी यांची कहाणी देईल प्रेरणा!UPSC Success Story: एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी शाळेत नापास झाला असेल तर त्यांच्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो. हा विद्यार्थी भविष्यात काहीच करणार नाही, असे त्याला काहीजण हिणवतात.
Read more »

IAS बनने के लिए तीन बार क्रैक किया UPSC! जानें सफलता के पीछे की कहानीIAS बनने के लिए तीन बार क्रैक किया UPSC! जानें सफलता के पीछे की कहानीIAS Success Story: पढ़ें आईएएस अधिकारी चारू की सफलता की कहानी, जिन्होंने IAS बनने के लिए तीन बार UPSC की परीक्षा को दिया.
Read more »



Render Time: 2026-04-02 11:53:23