Success Story: सहावीत नापास झालेली मुलगी कशी बनली IAS? रुक्मणी यांची कहाणी देईल प्रेरणा!

Success Story News

Success Story: सहावीत नापास झालेली मुलगी कशी बनली IAS? रुक्मणी यांची कहाणी देईल प्रेरणा!
Upsc Success StoryIAS Rukmani Riar Inspirational StoryIAS Rukmani Riar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 108 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

UPSC Success Story: एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी शाळेत नापास झाला असेल तर त्यांच्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो. हा विद्यार्थी भविष्यात काहीच करणार नाही, असे त्याला काहीजण हिणवतात.

UPSC Success Story : जर कोणी शाळेत नापास झाला तर तो आयुष्यातही नापास होईल, असा त्याचा अर्थ नाही, हे रुक्मणी यांच्या कहाणीतून कळते.एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी शाळेत नापास झाला असेल तर त्यांच्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो.

हा विद्यार्थी भविष्यात काहीच करणार नाही, असे त्याला काहीजण हिणवतात. पण असे विद्यार्थी पुढे जाऊन आयएएस विद्यार्थी आयएएस होईल, असे कोणी सांगितलं तर त्या भविष्यवाणीवर कोणी विश्वास ठेवेलं का? निश्चितच नाही. पण असं प्रत्यक्षात घडलंय. आजच्या यशोगाथेत आपण एका आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेऊया. जी अधिकारी सहावीत नापास झाली पण पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. ही कहाणी आहे आयएएस रुक्मिणी रियार यांची.जर कोणी शाळेत नापास झाला तर तो आयुष्यातही नापास होईल, असा त्याचा अर्थ नाही, हे रुक्मणी यांच्या कहाणीतून कळते. दरवर्षी सुमारे 10 लाख उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेला बसतात. परंतु त्यापैकी काहीजण पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होतात. भारतीय प्रशासकीय सेवा , भारतीय पोलिस सेवा , भारतीय परराष्ट्र सेवा आणि इतर पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. यूपीएससी उत्तीर्ण करुन उत्तीर्ण झालेल्या आयएएस रुक्मिणी रियार सहावीत नापास झाल्या होत्या. पण त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली.रुक्मिणी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गुरुदासपूर येथून पूर्ण केले. चौथी इयत्तेत डलहौसी येथील सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदवी पूर्ण केली. पुढे जाऊन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून सामाजिक शास्त्रांमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. रुक्मिणी यांनी मुंबईतील आशोधा, म्हैसूर आणि अन्नपूर्णा महिला मंडळात इंटर्नशिप केली. एनजीओमध्ये असताना त्यांना नागरी सेवांमध्ये रस निर्माण झाला. मग त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.2011 मध्ये रुक्मिणीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश मिळवले. एवढेच नव्हे तर ऑल इंडिया 2 रँक मिळवला. विशेष म्हणजे रुक्मणी यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर हे यश मिळवले. एनसीईआरटीची पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिकांच्या मदतीने आपण तयारी केल्याचे रुक्मणी सांगतात. सहावी ते बारावीपर्यंतची एनसीईआरटीची पुस्तके पूर्णपणे वाचली आणि नियमितपणे वर्तमानपत्रे आणि मासिके वाचून यूपीएससीची तयारी केल्याचे रुक्मणी सांगतात.विशेष म्हणजे रुक्मणी या अभ्यासात फार हुशार नव्हत्या. यामुळे त्या सहावीत असताना अनुत्तीर्ण झाल्या. पण यानंतर त्यांनी स्वत:वर खूप मेहनत घेतली आणि आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Upsc Success Story IAS Rukmani Riar Inspirational Story IAS Rukmani Riar UPSC Preparation Toppers In Marathi UPSC Rank And Year Of IAS Rukmani Riar How To Prepare For UPSC Civil Services

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!Khatabook Success Story: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप्सविषयी खूप बोलंल जातंय. विशेष करुण तरुण पिढी स्टार्टअपच्या मागे जाताना दिसतेय, जे देशाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून चांगले लक्षण आहे. यामुळे नवोपक्रम आणि उद्योजकतेच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे.
Read more »

VIDEO: 'माझ्या पप्पाला एक हात, एक पाय; आई दुसऱ्याच्या घरी काम करते', चिमुरडी ढसाढसा रडली; 'मी स्वत:ला चांगलं वळण लावणार'VIDEO: 'माझ्या पप्पाला एक हात, एक पाय; आई दुसऱ्याच्या घरी काम करते', चिमुरडी ढसाढसा रडली; 'मी स्वत:ला चांगलं वळण लावणार'Viral Video: सोशल मीडियावर एक मुलगी आपल्या वडिलांच्या व्यसनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सांगताना धायमोकळून रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Read more »

Success Story: एक कमरे का घर! 27 लाख का लोन, सर पर पिता सा साया भी नहीं, 12-12 घंटे पढ़ाई करके NEET किया क्रैकSuccess Story: एक कमरे का घर! 27 लाख का लोन, सर पर पिता सा साया भी नहीं, 12-12 घंटे पढ़ाई करके NEET किया क्रैकNEET Success Story in Hindi: जानिए साल 2023 में नीट क्वालीफाई करने वाली प्रेरणा की कहानी, जिसे हर एक युवा को पढ़ना चाहिए और सीखना चाहिए.
Read more »

दिन में जॉब और रात में पढ़ाई, बिना कोचिंग पहली ही कोशिश में क्रैक किया UPSC, पढ़ें सृष्टि डबास की Success Storyदिन में जॉब और रात में पढ़ाई, बिना कोचिंग पहली ही कोशिश में क्रैक किया UPSC, पढ़ें सृष्टि डबास की Success StoryIAS Success Story: पढ़िए IAS सृष्टि डबास की सफलता की कहानी, जिन्होंने बिना कोचिंग के पहली ही प्रयास में UPSC परीक्षा पास की.
Read more »

Success Story: वडिलांच रस्त्याच्याकडेला दुकान, लेकीने खो-खोमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, नसरीनची प्रेरणादायी कहाणीSuccess Story: वडिलांच रस्त्याच्याकडेला दुकान, लेकीने खो-खोमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, नसरीनची प्रेरणादायी कहाणीNasreen Shaikh inspirational Story: जगात अनेक ठिकाणी आजही महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी नाहीयत, त्यांच्याकडे चूल आणि मूल या दृष्टीकोनातूनच पाहिले जाते. असे असताना अनेक महिला संघर्षांच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत.
Read more »

UPSC Success Story: पहली बार में प्रीलिम्स भी नहीं हुआ क्लियर, फिर IPS से IAS बनीं अर्पिता थुबेUPSC Success Story: पहली बार में प्रीलिम्स भी नहीं हुआ क्लियर, फिर IPS से IAS बनीं अर्पिता थुबेIAS Arpita Thube Success Story: उनकी कहानी लाखों युवाओं के लिए प्रेरणा है, जो झटके लगने के बाद हार मानने के बजाय अपने सपनों की ओर प्रयास करते रहते हैं.
Read more »



Render Time: 2026-04-02 22:39:38