Sharad Pawar on Modi: 'मला मोदींना सांगण्याचा नैतिक अधिकार नाही,' शरद पवार असं का म्हणाले?

NCP News

Sharad Pawar on Modi: 'मला मोदींना सांगण्याचा नैतिक अधिकार नाही,' शरद पवार असं का म्हणाले?
Sharad PawarNarendra Modiनरेंद्र मोदी
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 154 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 79%
  • Publisher: 63%

Sharad Pawar on Modi: नरेंद्र मोदींच्या पंच्च्याहत्तीनंतर भाजपच्या अलिखित नियमाप्रमाणे मोदी थांबणार का अशी चर्चा सुरू आहे

Sharad Pawar on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल 75 वा वाढदिवस झाला. भाजपकडून देशभरात मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजराही करण्यात आला. मोदींच्या पंच्च्याहत्तीनंतर भाजपच्या अलिखित नियमाप्रमाणे मोदी थांबणार का अशी चर्चा सुरू आहे.

यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी मला तो नैतिक अधिकार नसल्याचं उत्तर दिलं आहे. पवारांनी असं उत्तर का दिलं? नेमकं पवार काय म्हणाले?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 वा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंच्चाहत्तरीनंतर संविधानिक पदावर राहू नये या भाजपच्या अलिखित नियमावर नेहमीच चर्चा होत असते. मोदींच्या 75 व्या वाढदिवसानंतर ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी यावर मी मोदींना याबद्दल सांगू शकत नाही असं म्हणत या विषयावर पडदा पाडला आहे. मी 75 वर्षानंतर थांबलो नाही, त्यामुळे मोदींना मी सांगू शकत नाही. मला तो नैतिक अधिकार नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या या वक्तव्याचं भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलं आहे. तर देशाच्या जनतेचं मोदींवर प्रेम असेपर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. भाजपमध्ये 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त व्हावं हा नियम मोदींनी केलाय.. तो मी सोडून सर्वांनी पाळावा असा मोदींचा अट्टाहास असल्याचं टीकास्त्र संजय राऊतांनी डागलं आहे. तर लोकशाहीमध्ये कोण कुणाला निवृत्ता व्हा असं सांगू शकत नाही. मात्र अग्निवीर तरूणांना निवृत्त करणाऱ्या सरकारने स्वतःबाबत विचार करायला हवा असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. एकीकडे विरोधक पंतप्रधानांच्या निवृत्तीवर चर्चा करत असताना शरद पवारांनी मात्र आपण मोदींना असं सांगू शकत नसल्याचं म्हटलंय... मोदींच्या निवृत्तीच्या प्रश्नाला पवारांनी थेट आपल्या वयाशी जोडून हा प्रश्नच निकाली काढला आहे.FAQ1) नरेंद्र मोदी निवृत्ती घेणार आहेत का?नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे झाले असले तरी ते निवृत्ती घेणार नाहीत. भाजप नेते, विशेषतः गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, मोदी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाचे नेतृत्व करतील आणि पंतप्रधानपदासाठी चेहरा असतील. RSS प्रमुख मोहन भागवत यांनीही म्हटले आहे, मी कधीही कुणाला ७५ व्या वर्षी निवृत्त व्हा असे सांगितले नाही.2) ७५ वर्षांच्या निवृत्तीचा नियम काय आहे?भाजपमध्ये २०१४ नंतर असा अघोषित नियम होता की, ७५ वर्षांनंतर नेते सक्रिय राजकारणातून बाजूला होतील. हा नियम लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावर लागू झाला होता. तथापि, हा नियम पंतप्रधानपदासाठी बंधनकारक नाही, आणि भारतीय संविधानात पंतप्रधानांसाठी निवृत्तीचे वय नमूद नाही. भाजपने हा नियम बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे, आणि जितन राम मांझी यांच्यासारखे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत.3) निवृत्तीच्या चर्चेची सुरुवात कशी झाली?RSS प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्य: जुलै २०२५ मध्ये भागवत यांनी नागपुरात एका कार्यक्रमात म्हटले की, नेत्यांनी वयानुसार नव्या पिढीला संधी द्यावी. यामुळे मोदींच्या निवृत्तीच्या अटकळांना बळ मिळाले. तथापि, भागवत यांनी २८ ऑगस्ट २०२५ रोजी स्पष्ट केले की, ते स्वतः किंवा इतर कुणालाही निवृत्तीचे सांगणार नाहीत.विरोधकांचे दावे: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मार्च आणि एप्रिल २०२५ मध्ये दावा केला की, मोदी नागपुरात RSS मुख्यालयात निवृत्तीची घोषणा करण्यासाठी गेले होते. काँग्रेस नेते माणिकम टागोर यांनीही अडवाणी आणि जोशी यांच्यावर लागू झालेल्या नियमाचा उल्लेख करत मोदींवर टीका केली.विरोधकांचा प्रचार: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप नेते अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, मोदी ७५ व्या वर्षी निवृत्त होतील आणि अमित शहा पंतप्रधान होतील

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Narendra Modi नरेंद्र मोदी शरद पवार

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

PM Modi@75: दुनिया भर के नेता पीएम मोदी को दे रहे हैं बधाई, जानें किसने क्या कहाPM Modi@75: दुनिया भर के नेता पीएम मोदी को दे रहे हैं बधाई, जानें किसने क्या कहाPM Modi75: दुनिया भर के नेता पीएम मोदी को दे रहे हैं बधाई, जानें किसने क्या कहा Foreign Leaders Wish PM Modi know what they said
Read more »

अब से कुछ देर बाद धार आएंगे प्रधानमंत्री: भैंसोला गांव में पीएम मित्रा पार्क की आधारशिला रखेंगे; 3 लाख रोजग...अब से कुछ देर बाद धार आएंगे प्रधानमंत्री: भैंसोला गांव में पीएम मित्रा पार्क की आधारशिला रखेंगे; 3 लाख रोजग...PM Narendra Modi Dhar PM Mitra Park Live Photos Videos Update; Follow PM Modi Birthday, Mohan Yadav, Kailash Vijayvargiya, BJP Latest News On Dainik Bhaskar.
Read more »

प्रभासच्या मेहुण्याच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; शरद पवारांच्या पक्षातील नेत्याला अटकप्रभासच्या मेहुण्याच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; शरद पवारांच्या पक्षातील नेत्याला अटकNagpur Police Action Against Sharad Pawar Party Leader: मित्राचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली.
Read more »

BMC चुनाव से पहले शरद पवार हुए PM मोदी के साथ! उम्र को लेकर बोले- 75 के बाद मैं नहीं रुका, तो...BMC चुनाव से पहले शरद पवार हुए PM मोदी के साथ! उम्र को लेकर बोले- 75 के बाद मैं नहीं रुका, तो...Sharad Pawar With PM Modi: शरद पवार ने कोल्हापुर में पीएम मोदी की उम्र पर विपक्ष के तंज का जवाब दिया है. उन्होंने कहा कि राजनीति में उम्र नहीं योगदान मायने रखता है. मुंबई बीएमसी चुनाव में महाविकास अघाड़ी में सहमति नहीं बनी.
Read more »

Pakistan ने गलती से दिया PM Modi को जन्मदिन का तोहफा, सब हैरानPakistan ने गलती से दिया PM Modi को जन्मदिन का तोहफा, सब हैरानPM Modi on Jaish commander’s admission on Operation Sindoor: PM Modi ने अपने 75वें जन्मदिन पर Watch video on ZeeNews Hindi
Read more »

भारत पर 25% पेनल्टी टैरिफ हटा सकता है अमेरिका: मुख्य आर्थिक सलाहकार बोले- 30 नवंबर के बाद टोटल टैरिफ 10-15%...भारत पर 25% पेनल्टी टैरिफ हटा सकता है अमेरिका: मुख्य आर्थिक सलाहकार बोले- 30 नवंबर के बाद टोटल टैरिफ 10-15%...India US Tariff Controversy; Follow Narendra Modi Donald Trump Modi Friendship. US India Political Relations and Updates On Dainik Bhaskar
Read more »



Render Time: 2026-04-02 06:17:39