Rohit Arya प्रकरणाला वेगळं वळण? त्याने गोळी झाडलीच नव्हती? Encounter करणारा पोलीस म्हणाला, मुलांच्या...

Rohit Arya Encounter News

Rohit Arya प्रकरणाला वेगळं वळण? त्याने गोळी झाडलीच नव्हती? Encounter करणारा पोलीस म्हणाला, मुलांच्या...
Rohit AryaMumbai Children HostageMumbai Police
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 133 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

Rohit Arya Encounter Case: गुरुवारी पवईमध्ये झालेल्या ओलीस नाट्यामध्ये रोहित आर्याचा चकमकीमध्ये मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याचं दिसत आहे.

Rohit Arya Encounter Case: मुंबईतील पवईमध्ये गुरुवारी घडेलल्या ओलिस नाट्यप्रकरणानंतर आरोपी रोहित आर्याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. पोलिस फिर्यादीत आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा कोणताही उल्लेख नाही.

त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती का? तसेच आर्याच्या कटामागे इतर कोणी सहभागी होते का? याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोणाच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलाय गुन्हा?पवई पोलिसांनी एन्काउंटर करणारे अमोल वाघमारे यांच्या तक्रारीवरून आर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दाखल गुह्यात आर्याने गोळी झाडल्याचा उल्लेख नाही. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आर्याने वाघमारे यांच्या दिशेने बंदूक रोखताच त्यांनी गोळी झाडल्याचे म्हटले आहे.नेमके कोणते गुन्हे नोंदवण्यात आले?वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्याच्या मृत्यूबाबत पवई पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी, लहान मुलांना ओलिस ठेवणे, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न यांसह गंभीर कलमांखाली आर्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास गुन्हे शाखेकडे वर्गदोन्ही प्रकरणांचा तपास मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. हा तपास अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे आणि उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या देखरेखीखाली होणार आहे.दंडाधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशीमुंबई पोलिस अधिनियमानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार, पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यास दंडाधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची प्रक्रिया ठरलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक पत्रव्यवहार केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.आर्याने बंदूक रोखल्याने झाडली गोळीघटनेत सहभागी सहायक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या फिर्यादीवरून आर्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाघमारे यांच्या गोळीबारातच आर्याचा मृत्यू झाला होता. फिर्यादीत आर्याने पोलिसांवर गोळी झाडल्याचा उल्लेख नाही. पोलिसांनी नमूद केल्याप्रमाणे, ओलिस मुलांच्या सुटकेसाठी खिडकीतून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आर्याने बंदूक रोखल्याने मुलांची सुरक्षा आणि स्वसंरक्षणाच्या उद्देशाने गोळी झाडण्यात आली, असा दावा पोलिसांनी केला आहे.शॉर्ट फिल्मच्या बहाण्याने ओलीसनाट्याची आखणीपाळणाघरातील मुले कथानक भ्रष्टाचाराविरोधात क्रांती करतात, अशा स्वरूपाचे असलेल्या लघुपटाची निर्मिती रोहित आर्या करत होता. त्यासाठीचे कथानकही त्याने लिहिले होते. मात्र या काल्पनिक कथेचे वास्तवात रूपांतर झाले, जेव्हा त्याने ऑडिशनला आलेल्या 17 अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवले. एका सर्जनशील चित्रीकरणाचे रूपांतर हिंसक घटनेत कसे झाले याची धक्कादायक कहाणी रोहितचा सहकारी आणि या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या रोहन आहेरने शुक्रवारी सांगितली. रोहन आहेर हा 50 वर्षीय रोहित आर्याचा सहकारी आणि प्रॉडक्शन मॅनेजर होता. दोघे 2013 पासून एकत्र काम करत असल्यामुळे आहेरचा त्याच्यावर विश्वास होता. रोहितने एकट्यानेच या नाट्याची संहिता लिहिली. त्याच्या सहकाऱ्यांना याचा थांगपत्ताही लागू दिला नाही. आर्यानेच मुलांच्या मुलाखतीची व्यवस्था, स्टुडिओची निवड, लघुपटाचे कथानक तयार केले. आर्याने 23-24 मुलांची निवड करायला सांगितली होती, असं रोहनने सांगितलं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Arya Mumbai Children Hostage Mumbai Police RA Studios Mumbai News Powai

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ट्रम्प अन् 20 रुपयांमुळे अडकले रोहित पवार... थेट पोलिसात गुन्हा दाखल; 'आता पळता...'ट्रम्प अन् 20 रुपयांमुळे अडकले रोहित पवार... थेट पोलिसात गुन्हा दाखल; 'आता पळता...'Police Case Against Rohit Pawar: शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची दाट शक्यता असून हे प्रकरण थेट पोलिसांमध्ये पोहोचलं आहे.
Read more »

'9 कोटी 90 लाख दिले, पण...'; 'रोहित आर्याच्या आरोपांवर शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण'9 कोटी 90 लाख दिले, पण...'; 'रोहित आर्याच्या आरोपांवर शिक्षण विभागाचं स्पष्टीकरणRohit Arya Latest Update: रोहित आर्या याने केलेल्या आरोपांवर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हटलं शिक्षण विभागाने जाणून घेऊयात.
Read more »

'रोहितने माझ्या चेहऱ्यावर स्प्रे मारला...' ओलीस प्रकरणातला हिरो आला समोर; 'ग्रील तोडली आणि...''रोहितने माझ्या चेहऱ्यावर स्प्रे मारला...' ओलीस प्रकरणातला हिरो आला समोर; 'ग्रील तोडली आणि...'Rohit Arya Encounter Case: पवईत काल माथेफिरु रोहित आर्यचं एन्काऊंटर करण्यात आलं. 17 मुलांना ओलीस ठेवणा-या रोहित आर्यला पोलिसांनी चकमकीत संपवलं. याच मुलांसोबत रोहन आहेर नावाच्या व्यक्तीलाही ओलीस ठेवण्यात आलं होतं. रोहित आर्य ओलीस प्रकरणातला हिरो रोहन आहेर आहे समोर आलाय.
Read more »

The Secret Entry And The Split-Second Decision: How ASI Amol Waghmare Neutralised Hostage-Taker Rohit AryaThe Secret Entry And The Split-Second Decision: How ASI Amol Waghmare Neutralised Hostage-Taker Rohit AryaMumbai Police hero ASI Amol Waghmare ended the Powai theatre hostage crisis, safely rescuing 17 children by shooting accused Rohit Arya in a split-second decision.
Read more »

बच्चों को बंधक बनाने वाले आरोपी रोहित आर्य ने इस एक्ट्रेस को भी किया था मैसेज, हसीना ने शेयर किए स्क्रीनशॉटबच्चों को बंधक बनाने वाले आरोपी रोहित आर्य ने इस एक्ट्रेस को भी किया था मैसेज, हसीना ने शेयर किए स्क्रीनशॉटमनोरंजन Ruchita Jadhav on Rohit Arya: जानी मानी एक्ट्रेस रुचिता जाधव ने पवई में 17 बच्चों को बंधक बनाने के आरोपी रोहित आर्य को लेकर बड़ा खुलासा किया है.
Read more »

Mumbai Hostage Crisis: What Triggered It, Whos Rohit Arya? Explained In Five PointsMumbai Hostage Crisis: What Triggered It, Whos Rohit Arya? Explained In Five PointsAll hostages, including a 75-year-old woman, were rescued unharmed. Arya, who allegedly fired at police during the operation, sustained gunshot wounds and later died in the hospital.
Read more »



Render Time: 2026-04-02 04:59:15