Rohit Arya Latest Update: रोहित आर्या याने केलेल्या आरोपांवर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हटलं शिक्षण विभागाने जाणून घेऊयात.
Rohit Arya Latest Update : मुंबई तल्या पवई त पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये रोहित आर्य नावाच्या माथेफिरुचा खात्मा करण्यात आलाय. रोहित आर्यनं ऑडिशनसाठी आलेल्या जवळपास 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. माथेफिरुनं सरकारकडं चर्चा करण्याची मागणी केली होती.
तसं न झाल्यास मुलांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी अतिशय कौशल्यानं या माथेफिरुच्या तावडीतून मुलांची सुटका केलीय. दरम्यान रोहित आर्याने राज्याच्या शिक्षण विभागावर आरोप केले होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गंत दोन कोटी थकवल्याचा आरोप त्याने केला होता. त्याच्या या आरोपांवर आता शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.रोहित आर्या यांच्या अप्सरा मीडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क प्रोजेक्ट धील लेट्स चेंज या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मॉनिटर या उपक्रमाला सीएसआरच्या माध्यमातून सप्टेंबर 2022 आणि जून 2023 अशा दोन वेळा मान्यता देण्यात आल्या होत्या. यासाठी सुरुवातीला या कार्यक्रमासाठी या संस्थेला विभागाने नऊ कोटी 90 लाख इतकी रक्कम दिली होती. मात्र त्यानंतर तिसऱ्यांदा 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत दोन कोटी इतका निधी स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन हे अभियान राबविण्यासाठी शासनमान्यता देण्यात आली होती; मात्र त्यात रोहित आर्या यांनी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल्याने स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन उपक्रम राबविता आले नाहीत, असा स्पष्ट खुलासा विभागाकडून करण्यात आला आहे.टप्पा दोनसाठी रोहित आर्या यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये जाहिरात, व्यवस्थापन खर्च, खर्चाच्या अंदाजाचे निकष तांत्रिक संचालनालयाचे मार्गदर्शक तत्त्वे किमान नियम आदींबाबत कुठलाही ऊहापोह केलेला नव्हता. तसेच योजनेची परिणामकारकता कितपत होणार आहे, याची स्पष्टता नव्हती, यामुळे टप्पा दोन उपक्रम राबविता आला नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. कोण होता रोहित आर्य?पुण्यातील रहिवासी रोहित आर्य हा शिक्षण विभागाचा कंत्राटदार आहे. तो युट्यूबवर सक्रिय असून, सामाजिक जागृतीचे व्हिडिओ तयार करतो. पोलिस सूत्रांनुसार, तो मानसिक ताणाखाली असल्याचे दिसते. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून मी रोहित आर्य आहे, काही लोकांशी बोलायचे आहे असे सांगितले आणि चुकीच्या पावलाने परिसर जाळण्याची धमकी दिली. ‘स्वच्छता मॉनिटर अभियान’काय आहे?हे अभियान शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी सुरू झाले. स्वच्छता नसून, चुकीच्या पार्किंग, छेडछाडासारख्या समस्या ओळखून विरोध करण्याची सवय लावणे हा मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांना गुण मिळवण्यासाठी सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारा हा शैक्षणिक उपक्रम होता. मात्र, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय बदलांमुळे प्रकल्प प्रमुख रोहित आर्य व शिक्षण विभाग यांच्यात संघर्ष बराच झाला.
Acting Studio Kidnapping Mumbai Kids Held Hostage Mumbai Acting Class Rohit Arya Case Maharashtra Crime News रोहित आर्या Mumbai Kidnapping News Rohit Arya Kidnapping RA Studios Children Hostage पवई मुंबई पोलीस Rohit Arya Latest Update Rohit Arya Breaking News Rohit Arya Marathi News Mumbai Children Hostages Incident News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महिला कार खरीदारों के लिए खुशखबरी, 0.8% तक ब्याज और 90% तक लोन का फायदाCar Loan: फायदा सिर्फ ब्याज दर तक सीमित नहीं है. बैंक प्रोसेसिंग फीस में भी कटौती कर रहे हैं और सबसे महत्वपूर्ण-लोन-टू-वैल्यू (LTV) अनुपात बढ़ा रहे हैं.
Read more »
90% घाव 4 घंटे में हो जाएगा ठीक, वैज्ञानिकों ने तैयार किया चमत्कारी जेलHydrogel Technology: इस तकनीक का इस्तेमाल करके गहरे जानलेवा घावों से जूझ रहे मरीजों का इलाज तेजी से किया जा सकेगा और उनकी जान भी बचाई जा सकेगी.
Read more »
चिप कंपनी एनवीडिया की वैल्यू 5 ट्रिलियन डॉलर पार: भारत की GDP से ₹90 लाख करोड़ ज्यादा; कंपनी मोबाइल-ड्रोन्स...सेमीकंडक्टर चिप बनाने वाली अमेरिकी कंपनी एनवीडिया का मार्केट कैप पहली बार 5 ट्रिलियन डॉलर यानी 453 लाख करोड़ रुपए के पार पहुंच गया है। एनवीडिया यह आंकड़ा पार करने वाली दुनिया की पहली कंपनी भी बन गई है। Nvidia's market value surpasses $5 trillion for the first...
Read more »
5 एकड़ का पंडाल, 150 गांव को न्योता, 90 हजार मेहमान... हरियाणा में कांग्रेस विधायक के बेटे की ग्रैंड शादीहरियाणा के भिवानी जिले के लोहारू में कांग्रेस विधायक राजबीर फरटिया के बेटे योगेश फरटिया की शादी चर्चा में है। 30 अक्टूबर को लोहारू मंडी में 5 एकड़ में प्रीतिभोज आयोजित होगा, जिसमें 80 से 90 हजार मेहमानों के आने की उम्मीद है। समारोह में राहुल गांधी सहित कई नेता आमंत्रित...
Read more »
70 से 90 दिन में तैयार होती है ये आलू की किस्म, किसान उठा रहे हैं जबरदस्त मुनाफा, जानिए पूरा प्रोसेसअगर आप किसान हैं और इस बार आलू की खेती करने की सोच रहे हैं, तो कुफरी ख्याति किस्म आपके लिए बेहतरीन विकल्प साबित हो सकती है. यह एक अगेती-मध्यम अवधि वाली किस्म है, जो 70 से 90 दिनों में तैयार हो जाती है और कम समय में बंपर पैदावार देती है. इसकी बुवाई का सबसे सही समय अक्टूबर से नवंबर के पहले सप्ताह तक माना जाता है.
Read more »
दिखावा भारी पड़ेगा जनाब! 1.7 लाख सैलरी, 90 हजार EMI, 0 बचत, आप भी ऐसा कर रहे?Investment Tips: ये दिखावा भारी पड़ेगा जनाब! 1.7 लाख सैलरी, 90 हजार EMI, 0 बचत, क्या आप भी ऐसा कर रहे हैं?
Read more »
