MI Qualification Scenarios: मुंबईसाठी Playoff ची दारं बंद? किती सामने जिंकावे लागणार? 5 महत्त्वाचे Factors

IPL 2025 News

MI Qualification Scenarios: मुंबईसाठी Playoff ची दारं बंद? किती सामने जिंकावे लागणार? 5 महत्त्वाचे Factors
Mumbai IndiansMI QualifyIPL 2025 Playoffs
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 140 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 90%
  • Publisher: 63%

Can Mumbai Indians still qualify for Playoffs: मुंबई इंडियन्सच्या संघाला चार सामन्यांमध्ये पराभावचा चेहरा पाहावा लागला असून चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

MI Qualification Scenarios: मुंबईसाठी Playoff ची दारं बंद? किती सामने जिंकावे लागणार? 5 महत्त्वाचे Factors Can Mumbai Indians still qualify for Playoffs: मुंबई इंडियन्सच्या संघाला चार सामन्यांमध्ये पराभावचा चेहरा पाहावा लागला असून चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Can Mumbai Indians still qualify for Playoffs: इंडियन प्रिमिअर लीगची स्पर्धा पाच वेळा जिंकणारे दोन संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज! मात्र 2025 च्या पर्वात हे दोन्ही संघांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. पाच सामन्यानंतर मुंबईच्या संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबईचा संघ मागील पर्वात पॉइण्ट्स टेबलमध्ये ताळाशी राहिला होता. तशीच परिस्थिती सध्या दिसत आहे. केवळ दोन पॉइण्ट्ससहीत मुंबई सध्या पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी असलेल्या चार संघांमध्ये आहे. अजूनही मुंबईचे अनेक सामने बाकी असले तरी चाहत्यांना,"मुंबई प्ले ऑफ्ससाठी क्वॉलिफाय होईल का?" असा प्रश्न पडला आहे. मुंबईची सध्याची परिस्थिती पाहता खरोखरच ते 14 सामन्यानंतर पात्र ठरु शकतात की नाही हे पाहूयात...मुंबईच्या संघासमोर कामगिरीबरोबरच दुखापती आणि कामगिरीत सातत्य राखण्यात अभाव अशा दोन मुख्य अडचणी दिसत आहेत. अजून बराच मोठा पल्ला शिल्लक असला तरी सध्या मुंबईच्या संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचं दिसत आहे. काही अगदी अटीतटीचे सामने मुंबई गमावले. असं असलं तरी मुंबईचा संघ कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच काही लागोपाठ विजय मिळल्यास मुंबईचा संघ पुन्हा दमदार पुनरागमन करु शकतो याबद्दल आयपीएलचा इतिहास ठाऊक असलेल्या कोणालाही काहीही शंका नाही.अर्थात सध्या तरी मुंबईची पुढील वाटचाल थोडी खडतर दिसत आहे. मुंबई प्ले ऑफ खेळणार की नाही हे पुढील सामन्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे खेळाडू कसे खेळतात यावर अवलंबून आहे. तसेच मुंबईला काही महत्त्वाचे सामनेही जिंकावे लागणार आहेत.मुंबईचा संघ मागील बऱ्याच काळापासून पॉइण्ट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. मुंबईच्या संघाचं नेट रन रेटही उणे आहे. 10 तारखेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, स्पर्धेतील 23 सामन्यानंतर पाच पैकी चार सामने गमावून मुंबईचा संघ आठव्या स्थानी आहे. कोणत्याही संघाला प्ले ऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर किमान आठ विजय आवश्यक आहेत. किमान विजयानंतर महत्त्वाचा ठरतो तो नेट रनरेटचा आकडा. मुंबईचा सध्याचा म्हणजेच 10 एप्रिलचा नेट रन रेट हा उणे 0.010 इतका आहे.मुंबईला आता सातत्यपूर्ण विजय आवश्यक आहेत. त्यांना पुढील काही सामन्यामध्ये दिल्ली, गुजरात, पंजाबसारख्या तगड्या संघांचा सामना करायचा आहे. या सामन्यामध्ये त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं आहे. कारण असं झालं तर किमान सहा सामने जिंकणारे पात्र ठरतील अशा स्थितीत त्यांना नेट रन रेटच्या जोरावर पात्र ठरता येईल.मुंबईच्या विजयामध्ये उत्तम योगदान देऊ शकतात किंवा मुंबई पात्र ठरणार की नाही हे ज्या खेळाडूंवर अवलंबून आहे त्यांची नावं खालीलाप्रमाणे :बुमराह कशी कामगिरी करतो?परदेशी फलंदाज संथ खेळपट्टीवर कशी कामगिरी करतील?मुंबईला प्ले ऑफमध्ये पात्र होण्यासाठी किमान 16 गुणांची म्हणजे आठ विजयांची आवश्यकता आहे. म्हणजेच आता मुंबईला उर्वरित 9 सामन्यांपैकी 7 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. अर्थात इतर संघांची कामगिरी आणि नेट रन रेटचा विचार करता अगदी 14 पॉइण्ट्स म्हणजे एकूण 7 विजयांसहीतही मुंबईचा संघ क्वालिफाय करु शकतो. मात्र हे सारं जर-तरवर अवलंबून आहे. मुंबईने सध्या तरी किमान 7 सामने जिंकून 16 गुणांची अट पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. मुंबईच्या संघाने मरगळ झटकून सामन्यांमध्ये सातत्याने विजय मिळवणं आवश्यक आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Indians MI Qualify IPL 2025 Playoffs Points MI Jasprit Bumrah Suryakumar Yadav Hardik Pandya Rohit Sharma

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Breaking News LIVE Updates: देशमुख हत्या प्रकरणाचा न्यायालयीन खटला सुरू आज पहिली सुनावणीMaharashtra Breaking News LIVE Updates: देशमुख हत्या प्रकरणाचा न्यायालयीन खटला सुरू आज पहिली सुनावणीMaharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी
Read more »

रोहित शर्माने फिटनेससाठी बनवला मास्टर प्लॅन, 'मिशन वर्ल्ड कप 2027' ला करणार सुरुवात!रोहित शर्माने फिटनेससाठी बनवला मास्टर प्लॅन, 'मिशन वर्ल्ड कप 2027' ला करणार सुरुवात!ODI World Cup 2027 : रोहितने आयसीसीच्या तीन पैकी दोन टूर्नामेंटच्या ट्रॉफी त्याच्या नेतृत्वात भारताला जिंकवून दिल्या आहेत, तेव्हा आता वनडे वर्ल्ड कप सुद्धा नावावर करण्यासाठी रोहित तयारीला लागणार असल्याची माहिती मिळतेय.
Read more »

महाराष्ट्रासह दक्षिण भारतात तापमानवाढीचे संकेत; उत्तरेकडील राज्यांवर मात्र पावसाची वक्रदृष्टी, IMD चा इशारा पाहाचमहाराष्ट्रासह दक्षिण भारतात तापमानवाढीचे संकेत; उत्तरेकडील राज्यांवर मात्र पावसाची वक्रदृष्टी, IMD चा इशारा पाहाचMaharashtra Weather News : राज्याच्या हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता या बदलांचे परिणाम आणखी किती दिवस कायम राहणार हाच चिंतातूर करणारा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Read more »

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?8th Pay Commission: वेतन आयोग भारतातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी पगार, पेन्शन आणि मिळणाऱ्या लाभांमध्ये सुधारणांचा आढावा घेतो आणि शिफारस करतं.
Read more »

...म्हणून मुंबईत येणार 2500000 किलो वजनाचं अवाढव्य मशीन; 150 ट्रक वापरावे लागणार...म्हणून मुंबईत येणार 2500000 किलो वजनाचं अवाढव्य मशीन; 150 ट्रक वापरावे लागणार2500 Ton Machine In Mumbai: तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या मशीनची जुळवणी करण्यासाठी तब्बल 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
Read more »

Gold Rate : गुढीपाडव्याआधीच सराफा बाजारात सोनं महागलं, 24 कॅरेट सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?Gold Rate : गुढीपाडव्याआधीच सराफा बाजारात सोनं महागलं, 24 कॅरेट सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?Gold Silver Rate Today : दोन दिवसांवर गुढी पाडव्याचा शुभ दिवस येऊन ठेपला आहे. अशातच मात्र सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. कारण गुढी पाडव्याआधीच सोनं महागलं आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 11:55:05