2500 Ton Machine In Mumbai: तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या मशीनची जुळवणी करण्यासाठी तब्बल 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
2500 Ton Machine In Mumbai: तुमचा विश्वास बसणार नाही मात्र या मशीनची जुळवणी करण्यासाठी तब्बल 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 2500 Ton Machine In Mumbai: ठाणे-बोरीवली बोगद्याचं काम अत्यंत वेगाने सुरु असून या प्रकल्पामधील सर्वात आव्हानात्मक टप्पा पूर्ण करण्यासाठी विशेष मशीन मागवलं जाणार आहे.
ठाणे आणि बोरीवलीदरम्यानचा बोगदा खोदण्यासाठी सर्वात मोठे टनेल बोरिंग मशीन मुंबईत जून महिन्यात दाखल होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत पावसाळ्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी आणले जाणारे सदर टीबीएम मशीन 2500 टन वजनाचे आहे. एवढं अवाढव्य मशीन आणण्यासाठी सुमारे 150 ट्रकची मदत घेतली जाणार आहे. या ट्रक्समधून मशीन मुंबईत आणले जाणार आहे. या यंत्रामध्ये 13.2 मीटर व्यासाचा बोगदा पाडण्याची क्षमता असून, भारतात वापरले जाणारे हे सर्वात मोठे मशीन आहे.मुंबईत सागरी किनारा मार्गासाठी आणि मेट्रो 3 प्रकल्पातही टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला होता. मात्र या मशीनची क्षमता 12 मीटर व्यासाचा बोगदा खोदण्याची होती. तर आता ठाणे-बोरिवली मार्गासाठी याहून अधिक मोठी मशीन वापरली जाणार आहे. या प्रकल्पात दोन जुळे बोगदे उभारण्यासाठी एकाचवेळी चार टीबीएम वापरले जाणार आहे. त्यातील पहिले टीबीएम जूनमध्ये मुंबईत दाखल होणार असून, त्यातून प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.या मशीनचे बहुतांश सुट्टे भाग मेघा इंजिनिअरिंगने तयार केले असून, काही विशेष भाग मूळ जर्मन कंपनीतून आयात करण्यात आले आहेत. या मशीनचे वजन तब्बल 2500 टन इतके आहे. मशीनची चेन्नईतील कारखान्यात फॅक्टरी एक्सेप्टन्स चाचणी पूर्ण झाली आहे. आता मशीनचे सुट्टे भाग जूनपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत.या टीबीएम मशीनचा पहिला भाग एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत येईल. सर्व भाग जूनपर्यंत दाखल झाल्यानंतर त्याच्या जोडणीचे काम ऑगस्टअखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर हे टीबीएम शाफ्टमध्ये उतरविले जाईल. त्यामुळे प्रत्यक्षात भुयारीकरणाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.एकूण बोगदे - प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी दोन जुळे बोगदेप्रकल्प खर्च - 18,838 कोटी रुपये
TBM Used Tunnel Boring Thane Borivali Project
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
नवी मुंबईत 300 एकरात वसवण्यात येणार 'इनोव्हेशन सिटी', मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणाNavi Mumbai Innovation City: नवी मुंबईत लवकरच इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे.
Read more »
मुंबईत धावली पहिली Underwater Metro! थक्क करणारा Video पाहाच, थेट दादर गाठता येणारMumbai Metro Aqua Line Video: हा व्हिडीओ मेट्रो प्रशासनानेच सोशल मीडियावरुन शेअर केला असून यामध्ये मिठी नदीखालून मेट्रो धावाताना दिसतेय.
Read more »
दोषी राजकीय नेत्यांवर आयुष्यभराची बंदी नको, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात विनंती, म्हणाले 'इतकं निष्ठूर...'दोषी व्यक्तींना खासदार किंवा आमदार म्हणून निवडून देण्यास आव्हान देणाऱ्या याचिकेला उत्तर देताना केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल केलं
Read more »
'भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं', संतापलेल्या राज ठाकरेंचं थेट आव्हानRaj Thackeray on Bhaiyaji Joshi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संताप व्यक्त केला आहे.
Read more »
3 तासांचं वेटिंग तरीही मुंबईकर रांगेत, नेमकं कारण काय जाणून घ्यामुंबईत धुळवडीच्या सणानिमित्त मटण खरेदीसाठी दुकानांबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
Read more »
रेल्वेने ज्योतिर्लिंगांचे दर्शन; तिकीटाचे पैसे EMI ने भरा; भारतीय रेल्वेची आजपर्यंतची सर्वात जबरदस्त योजनाआता रेल्वे ने ज्योतिर्लिंगांचे दर्शन करता येणार आहे. विशेष म्हणजे EMI ने याचे पैसे भरता येणार आहेत.
Read more »
