Navi Mumbai Innovation City: नवी मुंबईत लवकरच इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे.
Navi Mumbai Innovation City: नवी मुंबई त लवकरच इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. नवी मुंबई चा झपाट्याने विकास होत आहे. मुंबईतील वाढती गर्दी आणि लोकसंख्या लक्षात घेता.
नवी मुंबई हे नवे शहर वसवण्यात आले. आता नवी मुंबईतदेखील मोठ्याप्रमाणात विकासकामे होताना दिसत आहे. काहीच दिवसांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील खुले होणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतील व्यापाऱ्यात व आर्थिक उलाढालदेखील अधिक वाढ होणार आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी महाराष्ट्र नवी मुंबईत ३०० एकरचे 'इनोव्हेशन सिटी' उभारत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नवी मुंबईत एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे आणि राज्य या सुविधेजवळ एक पूर्णपणे नवीन शहर विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. राज्य नवी मुंबईत एक जागतिक क्षमता केंद्र 'पार्क' देखील उभारत आहे. अलीकडेच डेटा सेंटरवर २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणारे अनेक सामंजस्य करार केले आहेत आणि नवी मुंबईत एक नवीन डेटा सेंटर पार्कही उभारले जात आहे. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार असून ती जगभराशी जोडलेली असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर पुढील काळात वाढणार असून राज्य सरकारने 'गुगल' शी शासकीय पातळीवर तंत्रज्ञान वापरण्याबाबत करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोक-यांचे स्वरुपही बदलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. टेक जायंट मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत राज्यातील १०,००० हून अधिक महिलांना एआयमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे, असंही त्यांनी नमूद केले आहे.नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. नवी मुंबईत हे विमानतळ मुंबईपासून 40 किमी अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ बांधण्यात आलं आहे. 1,160 हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आलं आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल. तसंच, मुंबईवरुन नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी वॉटर टॅक्सीचा विचारही करण्यात येत आहे.महाराष्ट्र बातम्या
Navi Mumbai Development Chief Minister Devendra Fadnavis Tata Sons Data Centres Investment Microsoft AI Initiative Nasscom Event Maharashtra Government Navi Mumbai नवी मुंबई नवी मुंबई विमानतळ तिसरी मुंबई तिसरी मुंबई कशी असेल
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दिल्ली में नए मुख्यमंत्री की घोषणा के साथ मौसम में बदलाव, IMD ने चेतावनी जारी कीभारतीय मौसम विभाग (IMD) ने दिल्ली के मौसम को लेकर बड़ी चेतावनी जारी की है. दिल्ली में नए मुख्यमंत्री की घोषणा के साथ मौसम में उथल-पुथल देखने को मिल रही है.
Read more »
भाजपा के नए मुख्यमंत्री की घोषणा आज, दिल्ली में विकास की नई ऊंचाइयों के लिए तैयारदिल्ली विधानसभा चुनाव में भाजपा के ऐतिहासिक जीत के बाद, नए मुख्यमंत्री का नाम आज तय होगा। भाजपा के विधायक दल की बैठक के बाद, मुख्यमंत्री पद की घोषणा की जाएगी। गुरुवार को रामलीला मैदान में शपथ ग्रहण समारोह होगा।
Read more »
दिल्लीची मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ताला नियुक्त करण्यात आल्याची घोषणारेखा गुप्ताला दिल्लीची मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आल्याची घोषणा झाली आहे. यासोबतच प्रवेश वर्मा, रविंद्र इंद्रराज सिंह यांच्यासह 6 नेत्यांना मंत्री म्हणून शपथ घेण्यात आली आहे. यात रविंद्र इंद्रराज सिंह हे बवाना मतदार संस्थेतून आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला 31 हजार वोटांनी पराभूत करून विजय मिळविले आहेत.
Read more »
नवी मुंबईत घडणार डिस्नेलँडची सफर, मुलांना पाहता येणार मिकी अन् मिनी माऊस!Disneyland In Navi Mumbai: मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब च्या अंतिम आराखड्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. देशाच्या आर्थिक विकासवाढीसाठी निती आयोगाच्या शिफारशीनुसार, एमएमआर ग्रोथ हब प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
Read more »
Maharashtra Weather News: मुंबई तापली! दिवसभर असह्य उकाडा, राज्यातही काही ठिकाणी उन्हाच्या झळाMaharashtra Weather News : मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णता वाढली असून राज्यातीलही काही शहरात सूर्याचं कोपणं सुरुच आहे. पाहा हवामान वृत्त...
Read more »
म्हाडाकडून लवकरच पुन्हा जाहीर होणार लॉटरी; 'या' मोक्याच्या ठिकाणी असणार 1173 घरेMhada Lottery 2025: आता तुमच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. लवकरच म्हाडा कोकण मंडळाकडून लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे.
Read more »
