IND vs PAK Weather Report: दुबईच्या उकाड्यात होणार महामुकाबला, पिच कोणाला देणार साथ?

IND Vs Pak News

IND vs PAK Weather Report: दुबईच्या उकाड्यात होणार महामुकाबला, पिच कोणाला देणार साथ?
India Vs PakistanAsia CupAsia Cup 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 188 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 96%
  • Publisher: 63%

IND vs PAK Weather Report: 2025 आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सुपर फोर सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल तिकडचं तापमान असेल हे जाणून घेऊयात..

IND vs PAK Weather Report: आशिया कप 2025 सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना नेहमीच वेगळा ठरतो आणि यावेळीही त्याला अपवाद नाही. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे.

ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून दारुण पराभव केला होता. त्यामुळे आता पाकिस्तान बदला घेण्यासाठी उतरणार का आणि भारत पुन्हा वर्चस्व गाजवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र या सामन्याइतकंच हवामान आणि पिचचा अंदाजही चाहत्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.दुबईतील हवामान दुबई सध्या प्रचंड उष्णतेच्या लाटेखाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामना सुरू असताना तापमान 38 डिग्री सेल्सियसपर्यंत जाणार आहे. सोबतच हवेतील आर्द्रता म्हणजेच ह्यूमिडिटीही जवळपास 39 टक्क्यांपर्यंत राहणार आहे. एवढ्या उकाड्यात खेळताना खेळाडूंना मोठ्या प्रमाणात शारीरिक ताण सहन करावा लागणार आहे. विशेषतः गोलंदाज आणि फील्डिंग करणाऱ्या संघाची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे. क्रिकेटमधील स्पर्धात्मकता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची खेळाडूंची फिटनेस देखील असते. या कडक उन्हात फलंदाजांना उभं राहणं, दीर्घ इनिंग्स खेळणं आणि गोलंदाजांना सलग ओव्हर टाकणं ही खरी कसोटी ठरणार आहे. त्यामुळे प्रशिक्षक आणि फिजिओंना खेळाडूंना हायड्रेशन, फिटनेस आणि रीकव्हरीकडे अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.हे ही वाचा: IND vs PAK Super 4: आज पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार का टीम इंडिया? सूर्यकुमार यादवच्या उत्तराने चाहते थक्क! स्पिनर्स ठरवणार खेळाचा रंग?दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची पिच कायमच चर्चेत राहिली आहे. इथे सामान्यतः स्पिन गोलंदाजांना चांगली मदत मिळते. त्यामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा तीन स्पिनर्ससह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भारताचा अनुभवी स्पिनर कुलदीप यादव या स्पर्धेत तुफानी फॉर्ममध्ये आहे. त्याच्या चेंडूंनी विरोधकांचे डोके फिरवले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मागील लढतीत त्याने धोकादायक गोलंदाजी केली होती. त्यामुळे या सामन्यातदेखील कुलदीप पाकिस्तानी फलंदाजांसाठी मोठं आव्हान ठरू शकतो. दुसरीकडे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांसारखे ऑलराउंडर्सदेखील टीम इंडियाला फिरकीतून भक्कम आधार देऊ शकतात. पाकिस्तानी संघाकडेही शादाब खानसारखा अनुभवी स्पिनर आहे. मात्र भारतीय फलंदाजांनी त्याच्यावर चांगलाच वर्चस्व गाजवल्याने तो पुन्हा किती प्रभाव टाकतो, हे पाहणं रंजक ठरेल.हे ही वाचा: Asia Cup 2025: कर्णधार सूर्या फलंदाजीसाठी का नाही आला? विजयानंतर चाहत्यांना स्वतः दिलं उत्तरआकडेवारी कशी? दुबईत या स्टेडियमवरचा सरासरी पहिला डाव 140 धावा इतका आहे. हा आकडा सांगतो की इथे प्रचंड धावा होत नाहीत. विकेट थोडी धीमी असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मोठे शॉट्स खेळणं सोपं नसतं. इथे रनचेस करणाऱ्या संघाचा विजयाचा टक्का 59 टक्के आहे, तर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजयाचा टक्का फक्त 40 टक्के आहे. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराची पहिली पसंती गोलंदाजीच असणार हे नक्की.हे ही वाचा: माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी मरेन... मुलगा ते मुलगी झालेल्या अनया बांगरचा दावा, जाणून घ्या काय झालंसामना ठरणार रोमहर्षकहवामान उकाड्याचं असलं, तरी स्टेडियममध्ये चाहत्यांचा उत्साह तापमानापेक्षा जास्त असेल यात शंका नाही. स्पिनर्सना साथ देणारी पिच, उष्णतेमुळे होणारी दमछाक आणि दोन्ही संघांची भक्कम तयारी या सगळ्यामुळे भारत-पाक सुपर-4 सामना हा प्रेक्षकांसाठी एक भन्नाट अनुभव ठरणार आहे. One sleep away from this clashWatch #INDvPAK tomorrow 7 PM onwards, LIVE on the Sony Sports Network TV channels Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 pic.twitter.com/3qWAdSKKfa— Sony Sports Network September 20, 2025FAQQ1: भारत-पाक सुपर-4 सामना कधी आणि कुठे खेळला जाणार आहे?➡️ एशिया कप 2025 सुपर-4 मधील दुसरा सामना भारत व पाकिस्तान यांच्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल.Q2: मागील सामन्यात भारताने पाकिस्तानवर कशी मात केली होती?➡️ ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या पहिल्या भिडंतीत भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केले होते.Q3: सामन्यादरम्यान दुबईचे हवामान कसं असेल?➡️ सामना सुरू असताना तापमान सुमारे 38 डिग्री सेल्सियस राहील आणि हवेतील आर्द्रता म्हणजेच ह्यूमिडिटी 39 टक्के असेल. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसला मोठं आव्हान असेल.Q4: उष्णतेचा खेळाडूंवर काय परिणाम होऊ शकतो?➡️ खेळाडूंची दमछाक होऊ शकते, विशेषतः गोलंदाज आणि फील्डर्सना उष्णतेचा तडाखा बसू शकतो. त्यामुळे हायड्रेशन आणि फिटनेसकडे अधिक लक्ष द्यावं लागेल.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

India Vs Pakistan Asia Cup Asia Cup 2025 Suryakumar Yadav Team India

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IND vs PAK: महामुकाबला 21 सितंबर को, हाथ न मिलाना...धमकी...मैच में देरी; भारत-PAK मैच से पहले जानें पूरा विवादIND vs PAK: महामुकाबला 21 सितंबर को, हाथ न मिलाना...धमकी...मैच में देरी; भारत-PAK मैच से पहले जानें पूरा विवादभारत और पाकिस्तान के बीच एशिया कप 2025 के मैच के बाद शुरू हुआ हैंडशेक विवाद क्रिकेट से ज्यादा कूटनीतिक मुद्दा बन गया। जहां एक तरफ टीम इंडिया ने पाकिस्तान से हाथ मिलाने से
Read more »

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! कर्णधार सोडून अख्ख्या संघाने केली बॅटिंग, सूर्याला 11 व्या नंबरवर ढकललंभारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! कर्णधार सोडून अख्ख्या संघाने केली बॅटिंग, सूर्याला 11 व्या नंबरवर ढकललंIND VS OMA : भारत विरुद्ध ओमान यांच्यात ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना पार पडला. यात भारताने ओमानला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले.
Read more »

IND vs PAK: बुमराह को मत खिलाओ... गावस्‍कर ने की PAK टीम की जबर्दस्‍त बेइज्‍जती, गंभीर को दी खास सलाहIND vs PAK: बुमराह को मत खिलाओ... गावस्‍कर ने की PAK टीम की जबर्दस्‍त बेइज्‍जती, गंभीर को दी खास सलाहIndia vs Pakistan Asia Cup: सुनील गावस्‍कर ने भारतीय टीम को जसप्रीत बुमराह को ओमान और पाकिस्‍तान के खिलाफ आराम देने की सलाह दी. सन्‍डे को भारत-पाक के बीच मैच होना है.
Read more »

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघात एका नव्या व्यक्तीची एंट्री, पत्रकार परिषदही केली रद्दभारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघात एका नव्या व्यक्तीची एंट्री, पत्रकार परिषदही केली रद्दIND VS PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुपर 4 स्टेजचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी होणारी पत्रकार परिषद पाकिस्तान संघाने रद्द केली.
Read more »

IND vs PAK: पाकिस्तान को एक और 'बायकाट-पायक्राफ्ट' , दर्द देगा भारतIND vs PAK: पाकिस्तान को एक और 'बायकाट-पायक्राफ्ट' , दर्द देगा भारतदुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम में एक बार फिर भारत और पाकिस्तान की टीमें आमने-सामने होंगी। एक बार फिर टीम इंडिया का पलड़ा भारी है और पाकिस्तान अपनी पूरानी हार के साथ-साथ इंटरनेशनल लेवल पर नो हैंडशेक पॉलिसी के बाद हुई बेइज्जती का जवाब देने के मूड में होगा। ऐसे में मुकाबला रोमांचक होने की उम्मीद...
Read more »

IND vs PAK: भारत-पाकिस्तान के बीच रोमांचक मुकाबले की उम्मीद, जानिए संभावित प्लेइंग इलेवनIND vs PAK: भारत-पाकिस्तान के बीच रोमांचक मुकाबले की उम्मीद, जानिए संभावित प्लेइंग इलेवनएशिया कप 2025 में भारत और पाकिस्तान के बीच सुपर-4 का मुकाबला दुबई में खेला जाएगा। मुकाबले में हाई वोल्टेज ड्रामा की उम्मीद है। दोनों टीमों की संभावित प्लेइंग इलेवन में बदलाव हो सकते हैं, जिसमें जसप्रीत बुमराह और वरुण चक्रवर्ती की वापसी की संभावना है। पिछली बार भारत ने पाकिस्तान को हराया था।
Read more »



Render Time: 2026-04-02 14:22:06