India-Pak War: 'अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका! गरज पडल्यास...'; ऑल इंडिया इमाम असोसिएशनची मागणी

India Pakistan War News

India-Pak War: 'अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका! गरज पडल्यास...'; ऑल इंडिया इमाम असोसिएशनची मागणी
Operation SindoorIndian ArmyPakistan Army
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 141 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 98%
  • Publisher: 63%

All India Imam Association On India Pakistan War: भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले असून दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर ऑल इंडिया इमाम असोसिशनने या कारवाईचं स्वागत केलंय.

India-Pak War: 'अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका! गरज पडल्यास.'; ऑल इंडिया इमाम असोसिएशनची मागणी All India Imam Association On India Pakistan War : भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले असून दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर ऑल इंडिया इमाम असोसिशनने या कारवाईचं स्वागत केलंय.

India-Pak War: 'अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका! गरज पडल्यास...'; ऑल इंडिया इमाम असोसिएशनची मागणी All India Imam Association On India Pakistan War: भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले असून दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर ऑल इंडिया इमाम असोसिशनने या कारवाईचं स्वागत केलंय.महत्त्वाचे मुद्देपाकिस्तान त्या मुलासारखा आहे जो...ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष आणि इस्लाम धर्माचे जाणकार असलेल्या मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी भारत सरकारकडे अखंड भारत निर्माण करण्याची मागणी केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'चं कौतुकही त्यांनी केलं आहे. साजिद रशिदी यांनी, पाकिस्तान हा दहशतवादाचं मोठं वृक्ष असून त्याला कापून काढणं आता आवश्यक झालं आहे, असंही म्हटलं आहे."आम्ही आपल्या सरकारला सांगू इच्छितो की पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन संपवून टाका. पाकिस्तान नावाचा हा वृक्षच कापून टाकला तर सर्व राज्य भारताच्या ताब्यात येतील. आम्हाला अखंड भारत हवा आहे. जसा आधी होता तसाच भारत आम्हाला हवा आहे," असं साजिद रशिदी म्हणाले.पहलगाममध्ये झालेला प्रकार एवढा निंदनीय आणि खेदजनक होता की त्यामुळे देशातील प्रत्येक भारतीय आणि खास करुन मुस्लिम फार त्रासलेला होता. पाकिस्तानच्या या खुरापतींमुळे पाकिस्तानी नाही तर भारतातील मुस्लिम अधिक वैतागलेत.चुकीची कामं पाकिस्तान करतो, जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवतो आणि याचा परिणाम असा होतो की शंकेच्या नजरेने भारतीय मुस्लिमांकडे पाहिलं जातं. त्यामुळेच पाकिस्तानवर असा हल्ला करा की तो त्यांना कायम लक्षात राहील, अशी मागणी आम्ही केली होत असं साजिद रशिदी म्हणाले.ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना साजिद राशिदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. जे काही झालं आहे त्याने आम्हाला फारच आनंद झाला आहे. पाकिस्तान आणि पाकव्यप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले झाले आणि जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचे अनेक तळ नष्ट करण्यात आल्याचं पाहून फार समाधान वाटल्याचंही साजिद रशिदी यांनी नमूद केलं.पाकिस्तान एक दहशतवादाचा वृक्ष आहे. जोपर्यंत हा वृक्ष कापला जाणार नाही तोपर्यंत याला फळं येत राहणार. म्हणून हे वृक्ष मुळासकट नष्ट करावं म्हणजेच पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन काढून टाका. पाकिस्तानचं अस्तित्व नष्ट झाल्यानंतरच दहशतवाद संपुष्टात येईल. पाकिस्तानचा समुळ नायनाट केल्यानंतर भारतातील मुस्लिमांना शांतता मिळेल, असंही साजिद रशिदी यांनी म्हटलं आहे. आम्ही तुमच्यासाठी राखीव संरक्षण दलाच्या तुकड्याप्रमाणे आहोत. आमची गरज पडली तर आम्ही सुद्धा सीमेवर जाऊन पाकिस्तानविरुद्ध लढायला तयार आहोत. मात्र पाकिस्तानच्या नावाने दहशतवाद कायमचा संपवा. दहशतवाद हा अत्यंत वाईट असून इस्लाममध्ये असं म्हटलं आहे की एका व्यक्तीचा जीव घेणं म्हणजे संपूर्ण मानवतेला संपवण्यासारखं आहे. इस्लाममध्ये दहशतवादाला स्थान नाही, असं साजिद रशिदी यांनी ठणकावून सांगितलं.साजिद रशिदी यांनी, पाकिस्तान हा त्या छोट्या मुलासारखा आहे जो कानाखाली मारल्यावर सूड तर घेऊ शकत नाही. मात्र अजून एक मारुन दाखव अशी वल्गना करतो आणि पुन्हा मार खातो. पाकिस्तानकडे काहीच नसून ते केवळ पोकळ धमक्या देत राहणार, असं म्हणत साजिद रशिदी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Operation Sindoor Indian Army Pakistan Army India Pakistan Tension PM Narendra Modi भारत पाकिस्तान युद्ध भारत पाकिस्तान तनाव ऑपरेशन सिंदूर पाक सेना भारतीय सेना India Pakistan War News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

India-Pak War Situation: ভারত-পাক সংঘর্ষ? দুই পরমাণুশক্তিধর দেশ যদি পরস্পরের সঙ্গে যুদ্ধে লিপ্ত হয়, কী হবে বাকি বিশ্বের? আশঙ্কা...India-Pak War Situation: ভারত-পাক সংঘর্ষ? দুই পরমাণুশক্তিধর দেশ যদি পরস্পরের সঙ্গে যুদ্ধে লিপ্ত হয়, কী হবে বাকি বিশ্বের? আশঙ্কা...India Pak War Situation India Pak Conflict Kashmir attack sparks fear of fresh conflict between India Pakistan after Pahalgam terror attack
Read more »

India-Pak War: दोन मिनिटांच्या आत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश, काहीतरी मोठं घडण्याचे संकेतIndia-Pak War: दोन मिनिटांच्या आत सज्ज व्हा! वायुदलाला केंद्र सरकारचे आदेश, काहीतरी मोठं घडण्याचे संकेतIndia-Pak War: भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढली असून, आता त्याचदरम्यान केंद्र शासनानं वायुदलाला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले आहेत.
Read more »

Pak PM Shahbaz Sharif: পহেলগাঁওয়ের বদলা, যে কোনও সময় হামলা! ভারতের ভয়ে হাসপাতালে পাক প্রধানমন্ত্রী!Pak PM Shahbaz Sharif: পহেলগাঁওয়ের বদলা, যে কোনও সময় হামলা! ভারতের ভয়ে হাসপাতালে পাক প্রধানমন্ত্রী!Pak PM Shahbaz Sharif hospitalized amid fearing war from India after Pahalgam attack
Read more »

India Pakistan Tension: এই সপ্তাহেই ঘরে ঢুকে মারবে ভারত! সেনাবাহিনীকে ডেকে শেষ বার্তা পাক-প্রতিরক্ষামন্ত্রীর...India Pakistan Tension: এই সপ্তাহেই ঘরে ঢুকে মারবে ভারত! সেনাবাহিনীকে ডেকে শেষ বার্তা পাক-প্রতিরক্ষামন্ত্রীর...Pak defence minister Asif Khaja warns Pak Sena and told to get ready for war as India is likely to attack in Pakistan this week
Read more »

एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का, संरक्षण यंत्रणेने F-16 विमान पाडलंएअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का, संरक्षण यंत्रणेने F-16 विमान पाडलंF16 Shot Down : भारत-पाकिस्तान हल्ल्यादरम्यान, पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारताने पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-१६ पाडल्याचे सांगितले जात आहे.
Read more »

India-Pak: आधी रात में भारत के 15 शहरों पर पाकिस्तान ने लॉन्च की मिसाइल, इंडिया ने सभी को कर दिया ढेरIndia-Pak: आधी रात में भारत के 15 शहरों पर पाकिस्तान ने लॉन्च की मिसाइल, इंडिया ने सभी को कर दिया ढेरIndia Destroys missiles of Pakistan targets 15 Cities India-Pak: आधी रात में भारत के 15 शहरों पर पाकिस्तान ने लॉन्च की मिसाइल, इंडिया ने सारी की सारी कर दी ढेर
Read more »



Render Time: 2026-04-02 01:12:30