GST Tax Slab Change benefits for women : गणेशोत्सव, दसरा दिवाळी आणि या सणावारांच्या दिवसांमध्ये मोदी सरकारनं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.
GST Tax Slab Change benefits for women : मोदी सरकारच्या नेतृत्त्वाखाली अर्थमंत्रालयाच्या वतीनं जीएसटी परिषदेनं मॅरेथॉन बैठकांनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला. ज्यानंतर देशात जीएसटी करप्रणाली दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आली असून, ही प्रणाली 5% आणि 18 % मध्ये असेल असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं.
महिलांना कसा होणार फायदा? जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळं महिलांना सर्वाधिक फायदा होणार हे आता स्पष्ट होत असून, दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या दरात झालेल्या कपातीमुळं हा फायदा होणार आहे. घरगुती खर्चाचं गणित जुळवताना महिलांच्या हातात असणारी रक्कमसुद्धा समाधानकारक असल्यानं गृहिणींपासून नोकरदार ते अगदी व्यवसाय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या महिलांना केंद्राचा हा निर्णय फळताना दिसणार आहे. कोणत्या वस्तू स्वस्त ? जीएसटी परिषदेनं घेतलेल्या निर्णयानंर शॅम्पू, टॉयलेट साबण, टूथपेस्ट, हेअर ऑईल, अशा दैनंदिन वापरातील वस्तूंसमवेत सौंदर्यप्रसाधनांसह इतरही आवश्यक वस्तूंचे दर 18 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं महिलांच्या वापरातील वस्तूंचं प्रमाण अधिक असून, त्यात सुटकेस, पर्स, हँडबॅग, शॉपिंग बॅग, ज्वेलरी यांच्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. हेसुद्धा वाचा : GST impact on share market sensex nifty : मोदी सरकारच्या GST बूस्टरने शेअर मार्केट सुस्साट; गुंतवणूकदार मालामाल विविध प्रकारचं कापड, छापील आणि भरतकाम केलेली, विणकाम केलेली वस्त्र, साड्यांचे फॉल यांच्या दरात कपात करण्यात आली आहे. तर, टॅल्कम पावडर, फेस पावडर, लोशन, कंगवे, हेअरपिन, क्लिप, कर्लिंग पिन, हेअर कलर यांच्यावरील जीएसटीसुद्धा 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन, जायपर, बाळांचे नॅपकिन लायनर अशा वस्तूंवरी जीएसटीसुद्धा 5 टक्क्यांवर आणण्यात आल्यानं आरोग्याशी संबंधित या गोष्टींच्या दरांमधील कपातीनंही महिलांना दिलासा मिळणार आहे. फक्त महिलाच नव्हे तर, शेव्हिंग क्रीम, आफ्टरशेव्ह अशा वस्तूंवरील दरात कपात केल्यानं पुरुष वर्गालाही दिलासा मिळणार आहे. रोजगार निर्मितीला नव्यानं मिळणार चालना महिलांचे बचतगट, स्वयंसहायता गट यांच्याकडून तयार केली जाणारी उत्पादनं, कापड आणि हस्तकलेच्या वस्तू यांचेही दर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आल्यानं प्रामुख्यानं लघुउद्योजिकांना नव्यानं चालना मिळणार आहे. FAQGST कर स्लॅब बदलांचा महिलांना कसा फायदा होईल?दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्याने खर्चात बचत होईल. स्वयंसहायता गटांना कमी GST मुळे व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.कोणत्या वस्तूंवरील GST कमी झाला आहे?शॅम्पू, साबण, टूथपेस्ट, हेअर ऑइल, सॅनिटरी नॅपकिन, जायपर, सुटकेस, पर्स, हँडबॅग, ज्वेलरी, कापड, साड्या, टॅल्कम पावडर, लोशन, शेव्हिंग क्रीम यांच्यावरील GST 18% किंवा 12% वरून 5% झाला.स्वयंसहायता गटांना कसा फायदा होईल?हस्तकला, कापड आणि इतर उत्पादनांवरील GST 12% वरून 5% झाल्याने उत्पादन खर्च कमी होईल आणि बाजारात स्पर्धात्मक किंमतीत विक्री करता येईल.
GST Tax Slab Change Benefits For Women GST Slab Change GST Tax Slab Change GST Slab Change India Nirmala Sitharaman GST Announcement GST In Maharashtra जीएसटी जीएसटी स्लॅब जीएसटी कौन्सिल जीएसटी परिषद जीएसटी काऊन्सिल निर्मला सीतारमण केंद्र सरकार कर नरेंद्र मोदी जीएसटी मराठी बातम्या जीएसटी ताज्या मराठी बातम्या जीएसटी ब्रेकिंग न्यूज
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
GST काउंसिल की अहम बैठक 3-4 सितंबर को, TV, AC और वॉशिंग मशीन हो सकती हैं सस्तीGST काउंसिल की 3-4 सितंबर की अहम मीटिंग में जीएसटी 2.
Read more »
GST के पचड़े में फंसी राष्ट्रपति मुर्मू की गाड़ी, जीएसटी काउंसिल तक पहुंचा मामला, फैसले का इंतजारराष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के लिए नई BMW बख्तरबंद कार आयात पर GST छूट का प्रस्ताव GST काउंसिल की बैठक में रखा जाएगा, मामला राष्ट्रीय सुरक्षा से जुड़ा है.
Read more »
GST Reforms: পুজোর আগেই স্বস্তি! স্বাস্থ্য ও জীবন বিমায় GST মকুব, বড় সিদ্ধান্ত কেন্দ্রের..Centre decides to withdraw GST from life and health Insurances
Read more »
New GST Reforms: नए जीएसटी रिफॉर्म्स का टैरिफ से कोई लेना-देना नहीं, वित्त मंत्री ने साफ की स्थितिNew GST Reforms: नए जीएसटी रिफॉर्म्स का टैरिफ से कोई लेना-देना नहीं, वित्त मंत्री ने साफ की स्थिति FM Nirmala Sitharaman Says New GST Reforms have no link with Tariff देश
Read more »
GST Reforms: জিএসটির হারে আমূল বদল মোদী সরকারের, দেখে নিন কোন কোন পণ্যের দাম বাড়বে, সস্তা হবে কোন জিনিস...Centre cuts GST rates know which items will be cheaper and costlier
Read more »
मोदी सरकारच्या GST बूस्टरने शेअर मार्केट सुस्साट; गुंतवणूकदार मालामालGST impact on share market sensex nifty : जीएसटी सुधारणांचा बाजारांनी जयजयकार केला. मोदी सरकारच्या GST बूस्टरने शेअर मार्केट सुस्साट
Read more »
