India in Asia Cup Final 2025: आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि विक्रमी नवव्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ पोहोचला.
Who will face team India in Asia Cup 2025 Final : आशिया कप 2025 मध्ये पहिला फायनलिस्ट निश्चित झाला असून तो म्हणजे टीम इंडिया! सुपर-4 फेरीतील महत्वाच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत दमदार पाऊल ठेवले.
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 168 धावा फलकावर टाकल्या. अभिषेक शर्माने खेचलेल्या आक्रमक 75 धावांच्या खेळीमुळे भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशाचा डाव केवळ 127 धावांत संपवला आणि विजय निश्चित केला. या विजयासह भारताने अंतिम फेरीचे तिकीट कापले आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत त्या 28 सप्टेंबरला होणाऱ्या खिताबी लढतीत भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान असणार की पुन्हा एकदा बांगलादेश?भारताचा अपराजित प्रवासया संपूर्ण स्पर्धेत भारताने अजूनपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. UAE विरुद्धच्या विजयाने मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर गटस्तरात पाकिस्तानला पराभूत करून मोठा आत्मविश्वास मिळवला. ओमानवर मोठा विजय मिळवत भारताने सुपर-4 गाठला. या टप्प्यात पुन्हा पाकिस्तानला 6 विकेट्सनी नामोहरम केले. त्यानंतर बांगलादेशलाही हरवत भारताने आपली विजयी मोहीम कायम ठेवली आणि थेट अंतिम फेरीत धडक दिली.या विजयात अभिषेक शर्माचा खेळ निर्णायक ठरला. त्याने खेळलेल्या 75 धावांच्या तडाखेबाज खेळीमुळे भारताने 20 षटकांत 168 धावा उभारल्या. त्यानंतर गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशाला 127 धावांवर गुंडाळले. The winning run continues for #TeamIndia we seal a place in the summit clash of the #AsiaCup2025, with a game to spare in #Super4! pic.twitter.com/AV40ifvIiv— BCCI September 24, 2025सुपर-4 पॉइंट्स टेबलचे समीकरणभारत फाइनलमध्ये पोहोचल्याने आता दुसऱ्या फायनलिस्टबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या सुपर-4 टेबलमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचे 2-2 गुण आहेत. श्रीलंका मात्र दोन सामन्यांतील पराभवामुळे आधीच स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यामुळे भारताच्या प्रतिस्पर्ध्यासाठी शर्यत केवळ पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आहे.निर्णायक सामना कधी? 25 सप्टेंबरला पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने येतील. त्या सामन्यात जिंकणारा संघ थेट भारताविरुद्धच्या फायनलमध्ये उतरेल. गुण समान असले तरी सध्या पाकिस्तानचा रनरेट बांगलादेशपेक्षा चांगला आहे, त्यामुळे त्यांना थोडा फायदा आहे. पण क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी समीकरणं बदलू शकतात, त्यामुळे कोणता संघ अंतिम फेरी गाठतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.भारताचे लक्ष्य स्पष्टभारताच्या दृष्टीने मात्र चित्र अगदी स्पष्ट आहे. अजिंक्य वाटचाल कायम ठेवत सलग विजय मिळवणे आणि रेकॉर्ड नवव्यांदा एशिया कप ट्रॉफी आपल्या नावे करणे हेच उद्दिष्ट आहे. भारतीय फलंदाजी सध्या चांगल्या लयीत आहे, तर गोलंदाजही सातत्याने प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात यशस्वी होत आहेत. 28 सप्टेंबर रोजी दुबईतील अंतिम सामन्यात भारतासमोर पाकिस्तानसारखा पारंपरिक प्रतिस्पर्धी येतो की बांगलादेशचा आव्हानात्मक संघ, हे ठरणार आहे. परंतु एक गोष्ट निश्चित की, भारतीय क्रिकेटप्रेमींना रोमांचक लढतीचा आनंद घेता येणार आहे.
Team India Team Pakistan Team Bangladesh
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Team India Shocking News: এশিয়া কাপের মাঝেই চমকে দেওয়া আপডেট, অধিনায়কত্বের সঙ্গেই দল ছেড়ে দেশে ফিরলেন মহারথী!Indian Star Criketer quits Captaincy And Back to India Amidst Asia Cup 2025
Read more »
Asia cup 2025: किसकी कप्तानी में आखिरी बार पाकिस्तान एशिया कप फाइनल में पहुंचा था, आज कट सकता है पत्ता- asia cup 2025 pakistan played last asia cup final babar azam was captain and sri lanka wins trophy
Read more »
PAK vs SL LIVE score Asia Cup 2025: दूसरी ही गेंद पर शाहीन को मिला विकेट, कुसल मेंडिस 0 पर आउटPAK vs SL LIVE Asia Cup 2025: श्रीलंका के खिलाफ एशिया कप 2025 में सुपर-फोर राउंड के करो या मरो के मुकाबले में पाकिस्तान टॉस जीतकर पहले गेंदबाजी कर रही है.
Read more »
अबरार-हसरंगा ने सेलिब्रेशन कॉपी करके एक-दूजे को चिढ़ाया: रिव्यू गंवाकर अपने बॉलर पर भड़के पाकिस्तानी कप्तान, ...abrar ahmed Vs wanindu hasaranga; asia cup 2025 pak vs sl match moments records shaheen afridiटॉप मोमेंट्स 1.
Read more »
...तर भारत-पाक Asia Cup 2025 च्या फायनलमध्ये भिडणार! लंकेच्या पराभवाने Points Table मध्ये उलथापालथAsia Cup 2025 Final: भारतीय संघाला फायनल खेळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र भारताविरुद्ध कोण खेळणार हे कसं निश्चित होणार आहे समजून घ्या...
Read more »
ஆசிய கோப்பை 2025: வங்கதேசத்தை வீழ்த்தி இறுதிப்போட்டிக்கு முன்னேறிய இந்தியாAsia Cup 2025: ஆசிய கோப்பை கிரிக்கெட் தொடரில் இந்திய கிரிக்கெட் அணி வங்கதேச அணியை வீழ்த்தி இறுதிப் போட்டிக்கு முன்னேறியது.
Read more »
