South Africa Beat India Captain KL Rahul Reacts: भारताविरुद्ध कोणत्याही संघाने धावांचा पाठलाग करताना केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
South Africa Beat India Captain KL Rahul Reacts: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना गमावल्यानंतर कर्णधार केएल राहुलने संताप व्यक्त केला आहे. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असल्याचं म्हटलं आहे.
राहुलने रायपूरमध्ये संघाच्या चुकांमुळे पराभव झाल्याचं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 6 गड्यांच्या मोबदल्यात 359 धावांचे लक्ष्य गाठले. तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. शेवटचा एकदिवसीय सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल, अशी स्थिती आता आहे. दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा मानस होता. मात्र धावांचा डोंगर उभारुनही भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार राहुल म्हणाला की, दुसऱ्या डावात दव जास्त पडत होतं. त्यामुळे आमच्या गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण झाले. राहुलने टॉस हरल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की तो टॉस जिंकू शकला नाही याबद्दल निराश झालो होतो. ...मी स्वतःला शाप देत होतोसामन्यानंतर केएल राहुलने पराभवाच्या कारणांबद्दल भाष्य केलं. हा पराभव पचवणे कठीण आहे. जोरदार दव पाहता दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होते. पंच चेंडू बदलण्याबद्दल खूप सकारात्मक होते. टॉस खूप मोठी भूमिका बजावतो आणि टॉस गमावल्याबद्दल मी स्वतःला शाप देत होतो, असं राहुल म्हणाला.क्षेत्ररक्षणसंदर्भात नाराजीकाही प्रसंगी भारताचे क्षेत्ररक्षण चांगले असू शकले असते. यशस्वी जयस्वालने एडेन मार्करामचा ड्रॉप केलेला झेल महागडा ठरला. क्षेत्ररक्षणाबद्दल सूचकपणे राहुलने, काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण अधिक चांगल्या प्रकारे करू शकलो असतो. 350 धावा दिसायला चांगल्या वाटल्या. ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाली की आपण गोलंदाजांसाठी 20-25 अतिरिक्त धावा कशा तयार करू शकतो. पण आम्ही विरोधी संघाला काही अतिरिक्त धावाही दिल्या, अशी प्रतिक्रिया नोंदवली. म्हणजेच के. एल. राहुलने गोलंदाजांना चेंडूवर ग्रीप पकडता न येणं आणि ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पराभव झाल्याचं सांगत या दोन गोष्टींवरच खापर फोडलं आहे.सामन्यात घडलं काय?भारताच्या 358 धावांच्या उत्तरात, दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्स अन् 4 चेंडू शिल्लक असताना 6 बाद 362 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडने शानदार शतके झळकावली, तर केएल राहुलने अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर एडेन मार्करामने शतक झळकावले. केएलने कोहली आणि गायकवाडच्या फलंदाजीचे कौतुक केले.विराट, ऋतुराजचं कौतुककेएल राहुलने ऋतू आणि विराटला फलंदाजी करताना पाहणे खूप छान होते. विराट त्याचे काम करत राहतो. ऋतू फिरकीपटूंना कसे तोंड देतो हे पाहण्यासारखे असते. त्याने ज्या वेगाने फलंदाजी केली त्यामुळे आम्हाला 20 अतिरिक्त धावा मिळाल्या. खालच्या फळीने अधिक योगदान द्यायला हवं होतं, असं मत व्यक्त केलं.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाईल.
India Vs South Africa Ind Vs Sa Live Ind Vs Sa Score Ind Vs SA Match Ind Vs Sa Highlights Ind Vs Sa Playing 11 IND Vs SA Live Streaming IND Vs SA Squads Ind Vs Sa Schedule IND Vs SA Prediction Ind Vs Sa Odi Ind Vs SA T20 Ind Vs Sa Test India Vs South Africa Cricket IND Vs SA Head To Head Ind Vs Sa News IND Vs SA Commentary
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
வாரத்தில் 6 நாளும் தோசை! கே.எல்.ராகுலின் பிட்னஸ் ரகசியம் இதுதான்!KL Rahul Diet Secrets : வெறும் தோசை சாப்பிட்டு உடலை Fit-ஆக வைத்திருக்கும் கே.எல்.ராகுல்! அதெப்படி சாத்தியம்?
Read more »
IND vs SA: 358 रन बनाकर भी नहीं जीता भारत.. अफ्रीका की उम्मीद जिंदा, मारक्रम ने दिया कोहली का जवाबIND vs SA: टेस्ट के बाद साउथ अफ्रीका की टीम ने वनडे सीरीज में भी भारत को जोर का झटका दे दिया है. पहला मुकाबला भारत ने जीतकर 1-0 से बढ़त बनाई थी, लेकिन रायपुर में दूसरे मुकाबले में प्रोटियाज दहाड़े. अफ्रीका ने भारत को विकेट से मात देकर सीरीज बराबरी पर अटका दी है.
Read more »
किसी ने छोड़ा कैच, किसी ने जमकर लुटाए रन... 358 रन बनाकर भी इन 5 खिलाड़ियों की वजह से हारी टीम इंडियाभारतीय क्रिकेट टीम को साउथ अफ्रीका के खिलाफ दूसरे वनडे मैच में हार का सामना करना पड़ा है। इस मैच में टीम इंडिया में की हार के लिए 5 खिलाड़ी जिम्मेदार रहे।
Read more »
दक्षिण अफ्रीका ने भारत को दूसरे वनडे में हराया, सीरीज 1-1 से बराबररायपुर में खेले गए दूसरे वनडे में दक्षिण अफ्रीका ने भारत को चार विकेट से हराया। विराट कोहली और ऋतुराज गायकवाड़ के शतकों के बावजूद भारत 358 रन ही बना सका, जबकि दक्षिण अफ्रीका ने एडेन मार्करम के शतक की बदौलत लक्ष्य हासिल कर लिया और सीरीज 1-1 से बराबर कर ली।
Read more »
दक्षिण अफ्रीका ने भारत को दूसरे वनडे में हराया, 362 रन बनाकर ऐतिहासिक जीत दर्ज कीदक्षिण अफ्रीका ने भारत के खिलाफ दूसरे वनडे में 358 रनों के विशाल लक्ष्य का पीछा करते हुए 362 रन बनाकर एक ऐतिहासिक जीत दर्ज की। यह दक्षिण अफ्रीका की वनडे क्रिकेट के इतिहास में तीसरी सबसे बड़ी रन चेज है। मैच में कई रिकॉर्ड बने, जिसमें दोनों टीमों के बल्लेबाजों ने शानदार प्रदर्शन किया।
Read more »
IND vs SA: 'बल्लेबाज अपनी पोजिशन के लिए लड़ रहे,' जीत के बाद टेंबा बावुमा बड़ा बयान, फाइनल मैच का बताया प्लानभारत ने पहले बल्लेबाजी करते हुए 5 विकेट के नुकसान पर 358 रन बनाए, जिसमें विराट कोहली और ऋतुराज गायकवाड़ के शतक शामिल रहे। केएल राहुल ने अंत में अर्धशतकीय पारी खेली। लक्ष्य का पीछा करते हुए साउथ अफ्रीका ने एडेन मार्करम के शानदार शतक और ब्रीट्जके, ब्रेविस के अर्धशतक की बदौलत लक्ष्य का आसानी से हासिल कर लिया। बावुमा ने 46 रन की उपयोगी पारी...
Read more »
