महाराष्ट्रात एक मोठा जमीन व्यवहार झाला आहे. यामुळे भारतातील सर्वात मोठी IT कंपनी विकत घेणारी एक फ्रेंच कंपनी चर्चेत आली आहे. कारण यां कपनीने 283470000 रुपयांची कॅश देऊन ही भारतीय IT कंपनी विकत घेतली होती.
Capgemini Acquisition WNS Global Services : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारताच्या IT कंपन्यांना जबरदस्त फटका बसला. IT कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो IT कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे. अशातच चर्चेत आली आहे ती यावर्षी IT क्षेत्रात झालेला सर्वात मोठा सौदा.
जगातील सर्वात मोठ्या कंपनीने भारतातील सर्वात मोठी IT कंपनी विकत घेतली होती. या कंपनीने 283,470,000 रुपयांची कॅश देऊन ही कंपनी विकत घेतली. हा व्यवहार नेमका काय होता. जुलै 2025 मध्ये भारतात एक मोछा सौदा झाला. फ्रेंचमधील दिग्गज आयटी कंपनी कॅपजेमिनीने भारतातील आघाडीची आउटसोर्सिंग फर्म, डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी विकत घेतली. सुमारे 3.3 अब्ज डॉलर म्हणजे अंदाजे 28,347 कोटी रुपयांना हा व्यवहार झाला. हा करार पूर्णपणे रोख स्वरूपात करण्यात आला होता असे समजते.एआय-संचालित डिजिटल व्यवसाय सेवा मजबूत करण्यासाठी कॅपजेमिनी कंपनीने भारतीय IT कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. कंपनी विशेषतः एजंटिक एआयवर लक्ष केंद्रित करत आहे. WNS ही एक बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि डेटा अॅनालिटिक्स कंपनी आहे. या कंपनीचे 13 देशांमध्ये 600 हून अधिक क्लायंट आहेत. कोका-कोला, टी-मोबाइल आणि युनायटेड एअरलाइन्स सारख्या दिग्गज कंपन्यांना WNS कंपनीने सेवा दिली आहे.कॅपजेमिनीने भारतात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर स्थापन करण्यासाठी जपानच्या दाई-इची लाइफ होल्डिंग्जसोबत बहु-वर्षीय भागीदारी केली. हे GCC भारतातील कॅपजेमिनीच्या टेक टीमद्वारे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधा अपग्रेड, एआय सोल्यूशन्स आणि सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रात दाई-इचीला मदत करत आहे. ठाण्यातील भूखंड पुण्याच्या कंपनीला 550 कोटींना विकला दरम्यान, कॅपजेमिनीने ठाण्यातील एक मालमत्ता पुण्यातील पंचशील रिअॅल्टीला 550 कोटी रुपयांना विकली आहे. कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडियाने ठाण्यातील कॅपजेमिनी नॉलेज पार्कमधील पंचशील रिअल्टीची उपकंपनी असलेल्या प्राइम लोहेगाव इन्फ्रास्पेसेसला 15.35 एकर भूखंड विकला आहे. या भूखंडावर एकण पाच इमारती आहे. महाराष्ट्रात केलेल्या या सर्वात मोठ्या जमीन व्यवहारामुळे कॅपजेमिनी कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. FAQ1 अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारतीय IT क्षेत्रावर काय परिणाम झाला?अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारताच्या IT कंपन्यांना जबरदस्त फटका बसला. IT कंपन्यांचे मोठे नुकसान झाले असून, हजारो IT कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे. अशा पार्श्वभूमीवर IT क्षेत्रातील मोठे सौदे चर्चेत आले आहेत.2 कॅपजेमिनीने WNS ग्लोबल सर्व्हिसेसचा अधिग्रहण कधी आणि कशा रकमेला केला?जुलै २०२५ मध्ये फ्रेंच आयटी दिग्गज कॅपजेमिनीने भारतातील आघाडीची आउटसोर्सिंग फर्म WNS ग्लोबल सर्व्हिसेसचा अधिग्रहण केला. हा सौदा सुमारे ३.३ अब्ज डॉलर रकमेला पूर्णपणे रोख स्वरूपात झाला. हा यावर्षी IT क्षेत्रातील सर्वात मोठा सौदा मानला जातो.3. WNS ग्लोबल सर्व्हिसेस ही कंपनी काय करते आणि तिचे क्लायंट कोणत्या आहेत?WNS ही एक बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि डेटा अॅनालिटिक्स कंपनी आहे. तिच्याकडे १३ देशांमध्ये ६०० हून अधिक क्लायंट आहेत. कोका-कोला, टी-मोबाइल आणि युनायटेड एअरलाइन्स सारख्या दिग्गज कंपन्यांना WNS ने सेवा पुरवल्या आहेत.
283470000 Rd Cash Deal Frech Capgemini Company Acquired India Largest IT Big Deal Of Land Done In Maharashtra कॅपजेमिनी डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस पंचशील रिअॅल्टी
