2 ओव्हरदरम्यान..., पाकिस्तानी खेळाडूंशी कसं वागायचं? सूर्याचा सल्ला सर्वांनी पाळला; Video

T20 World Cup 2026 News

2 ओव्हरदरम्यान..., पाकिस्तानी खेळाडूंशी कसं वागायचं? सूर्याचा सल्ला सर्वांनी पाळला; Video
Team1 Vs Team 2ICC T20 World Cupटी२० विश्वचषक २०२६
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 113 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2026 SuryaKumar Yadav Strict Instructions Video: भारतीय संघाच्या कर्णधाराने पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरण्याआधी खेळाडूंना मैदानात कसं वागायचं याबद्दलचा इशारा दिलेला. तो नेमकं काय म्हणालेला पाहा

T20 World Cup 2026 SuryaKumar Yadav Strict Instructions Video: भारताने रविवारी कोलंबोच्या मैदानात पाकिस्तानला 61 धावांनी धूळ चारली. भारताच्या विजयामध्ये ईशान किशनने 40 बॉलमध्ये 77 धावा करत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

त्याच्या दमदार आणि तुफानी खेळीमुळे भारताला एकूण 175 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानला फक्त 114 धावाच करता आल्या. भारताच्या विजयानंतर ईशानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामना जिंकवण्यासाठी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीरनं केलेली रणनीती देखील महत्त्वाची ठरली. सामन्यादरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गंभीरच्या अचूक प्लॅनिंगमुळे पाकिस्तानला धक्का बसला. भारताचं प्लॅनिंगच एवढं परफेक्ट होतं की पाकिस्तानी संघ भारताविरुद्धच्या सामन्यात भारताने सर्वच बाजूने टाकलेला दबाव सहन करू शकला नाही. संपूर्ण 20 ओव्हरही पाकिस्तानी संघाला खेळता आल्या नाहीत आणि संघ 114 धावांवर बाद झाला. या सामन्यातही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही. पण याचसोबत मैदानात कसं वागायचं याचंही नियोजन सूर्यकुमार आणि गंभीरने केलेलं असं आता एका व्हिडीओतून समोर आलं आहे. बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केलाभारतीय संघातील खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याशिवाय इतर वेळीही संवाद कला साधायचा याबद्दल एक रणनीती तयार केली होती. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव खेळाडूंना सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी कसे वागावे याबद्दल सूचना देताना दिसतोय. व्हिडिओमध्ये भारताचा डाव संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार खेळाडूंशी बोलताना दिसतोय. टीम हडल टॉक दरम्यान, सूर्याने भारतीय खेळाडूंना मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंशी कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन केलं. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये, सूर्या भारतीय खेळाडूंना खेळ भावनेने क्रिकेट खेळा असं आवाहन केलं.सूर्याचा नेमका संदेश काय होता?हडल टॉकमध्ये, सूर्याने, दोन ओव्हरच्या दरम्यान मैदानावर धावत राहा, कोणालाही काहीही बोलू नका. चांगले क्रिकेट खेळून आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. खेळ भावनेने खेळून आपल्याला हा सामना जिंकायचा आहे, असं म्हटल्यानंतर सूर्याने सर्वांना प्रोत्साहीत करण्यासाठी, आम्ही हा सामना चांगल्या भावनेने जिंकू, असं जोरात म्हटलं. The UnfoldingRaw. Real. Colombo.#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue https://t.co/W7hftULm21— BCCI February 16, 2026भारताचा पुढला सामना कधी?भारताने पाकिस्तानला सहज पराभूत केलं. भारताने आपले तिन्ही सामने जिंकून सुपर 8 मध्ये स्थान मिळवले. भारताचा पुढील सामना 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्ध होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय आणि डच संघविरुद्ध साखळी फेरीतील आपला अंतिम सामना खेळणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Team1 Vs Team 2 ICC T20 World Cup टी२० विश्वचषक २०२६ टी२० वर्ल्ड कप टी20 वर्ल्ड कप बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

कुछ दिन पहले हुआ था उद्घाटन, कुछ नहीं मिला तो स्टील का गेट उखाड़ ले गया चोर, कैमरे में कैद हुए घटनाकुछ दिन पहले हुआ था उद्घाटन, कुछ नहीं मिला तो स्टील का गेट उखाड़ ले गया चोर, कैमरे में कैद हुए घटनाMan Stole Steel Gate Video: सोशल मीडिया पर वायरल हुई हैरान कर देने वाली घटना, जिसमें गाजियाबाद के Watch video on ZeeNews Hindi
Read more »

आगरा ने मेट्रो लाइन पर क्रेन गिरने से हुआ बड़ा हादसा, इलाके में मची अफरा-तफरी, आप भी देखिए ये वीडियो: VIRALआगरा ने मेट्रो लाइन पर क्रेन गिरने से हुआ बड़ा हादसा, इलाके में मची अफरा-तफरी, आप भी देखिए ये वीडियो: VIRALGiant Crane Incident Video: उत्तर प्रदेश के आगरा शहर में हुआ बड़ा हादसा, जहां एक बड़ी क्रेन मेट्रो Watch video on ZeeNews Hindi
Read more »

राजपाल यादव को बेल मिलने का दावा गलत: वायरल वीडियो में सलमान खान को शुक्रिया करते दिखे एक्टर, 16 फरवरी को ह...राजपाल यादव को बेल मिलने का दावा गलत: वायरल वीडियो में सलमान खान को शुक्रिया करते दिखे एक्टर, 16 फरवरी को ह...Rajpal yadav did not get bail, the video which claim the same is 8 years old
Read more »

बंदूक चलेगी तेरी हरियाणवी गाने पर दो लड़कियों ने लगाए जबरदस्त ठुमके, लटके-झटके देख पब्लिक के छूटे पसीने!बंदूक चलेगी तेरी हरियाणवी गाने पर दो लड़कियों ने लगाए जबरदस्त ठुमके, लटके-झटके देख पब्लिक के छूटे पसीने!Two Girls Dance Video: सोशल मीडिया पर वायरल हुआ दो लड़कियों के डांस का वीडियो, जिसमें दोनों Watch video on ZeeNews Hindi
Read more »

नजर हटी दुर्घटना घटी, फोटो खिंचवाने में बिजी था कपल, पीछे से चोर ने उड़ाया दुल्हन का बैग, कीमत जान उड़े होशनजर हटी दुर्घटना घटी, फोटो खिंचवाने में बिजी था कपल, पीछे से चोर ने उड़ाया दुल्हन का बैग, कीमत जान उड़े होशThief Stole Bride Bag Video: इंटरनेट पर वायरल हुई हैरान कर देने वाली वीडियो, जिसमें शादी के बीच Watch video on ZeeNews Hindi
Read more »

7 साल की बच्ची ने हरियाणवी सॉन्ग कॉम्पिटिशन पर किया ताबड़तोड़ डांस, एक्सप्रेशंस देख पब्लिक ने बांधे तारीफों के पुल!7 साल की बच्ची ने हरियाणवी सॉन्ग कॉम्पिटिशन पर किया ताबड़तोड़ डांस, एक्सप्रेशंस देख पब्लिक ने बांधे तारीफों के पुल!Little Girl Dance Video: सोशल मीडिया पर वायरल 7 साल की बच्ची की बच्ची का डांस वीडियो. लड़की Watch video on ZeeNews Hindi
Read more »



Render Time: 2026-04-02 06:13:19