130000000000 रुपयांचा ऑनलाईन दरोडा; लोकांना कॉम्प्युटर चालवता येईना त्या देशातला आरोपी

Business News News

130000000000 रुपयांचा ऑनलाईन दरोडा; लोकांना कॉम्प्युटर चालवता येईना त्या देशातला आरोपी
CryptocurrencyCrypto HeistBybit Crypto Hack
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 133 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 113%
  • Publisher: 63%

Crypto Heist Shocking News : सर्वात मोठी फिल्मी चोरी; आकड्यांचा नुसता खेळ... हॅकरनं घातला तब्बल 130000000000 कोटींचा गंडा

Crypto Heist Shocking News : सर्वात मोठी फिल्मी चोरी; आकड्यांचा नुसता खेळ. हॅकर नं घातला तब्बल 130000000000 कोटींचा गंडाडिजिटल स्वरुपातील गुंतवणुकीचा ट्रेंड संपूर्ण जगभरात पाहायला मिळत असून, गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय म्हणजे क्रिप्टो करन्सी .

Crypto Heist Shocking News : सर्वात मोठी फिल्मी चोरी; आकड्यांचा नुसता खेळ... हॅकरनं घातला तब्बल 130000000000 कोटींचा गंडाडिजिटल स्वरुपातील गुंतवणुकीचा ट्रेंड संपूर्ण जगभरात पाहायला मिळत असून, गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय म्हणजे क्रिप्टो करन्सी. जगभरातील अनेक गुंतवणुकदारांनी आतापर्यंत क्रिप्टो करन्सीध्ये गुंतवणूक केली आहे. असं असलं तरीही हा गुंतवणुकीचा सर्वतोपरी सुरक्षित पर्याय नाही हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. एका हादरवणाऱ्या घोटाळ्यामुळं ही बाब समोर आली असून, यामुळं पुन्हा एकदा गुंतवणुकदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार दुबईच्या क्रिप्टोकरेंसी एक्सचेंज बायबिटचा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रिप्टो हॅकचा सामना करावा लागला आहे. 'ब्लूमबर्ग'च्या वृत्तानुसार आर्थिक व्यवहारांदरम्यान सुरक्षिततेतील काही खाचखळग्यांच्या मदतीनं हॅकरनं 400,000 इथेरियम चोरले. ज्यांची किंमत साधारण 1.5 बिलियन डॉलर अर्थात 13000 कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं.ही इतिहासातील आतापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या क्रिप्टो चोऱ्यांपैकी एक मानली जात असून बिटकॉइननंतर इवेरियम हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं महागडं डिजिटल चलन ग्राह्य धरलं जातं. मागच्याच वर्षी जुलै महिन्यात भारतातील क्रिप्टो एक्सचेंज वझिरएक्सवरही मोठा सायबर हल्ला झाला होता. जिथंही 2000 कोटींचं नुकसान झालं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या देशात सामान्यांच्या इंटरनेट वापरावर बंदी असतानाही आणि जिथं घरात साधा संगणक खरेदी करायची असेल तरीही सरकारची परवानगी घ्यावी लागते अशा उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी बी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.हॅकर उत्तर कोरियाच्या सरकारी हॅकिंग ग्रुप लाजरसशी संबंधित असल्याचं निदर्शनास आलं असून, हा ग्रुप क्रिप्टो इंडस्ट्रीमधून अब्जावधी डॉलर्स चोरीसाठी कुप्रसिद्ध असल्याचंही म्हटलं जातं. दरम्यान, या घोटाळ्याचा फटका आपल्याला बसणार का, हाच प्रश्न गुंतवणुकदारांच्या मनात घर करत असताना Bybit चे सीईओ आणि संस्थापक बेन बेन झोउ यांनी मात्र गुंतवणुकदारांना दिलासा देत या पैशांच्या मोबदल्यात Refund देण्यास कंपनीनं सुरुवात केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रेल्वेस्थानक, भाजीमंडई... सारंकाही जवळ असूनही CIDCO च्या वाशीतील घरांना नापसंती; खरी कारणं माहितीयेत? बायबिटकडे गुंतवणुकदारांची 20 बिलियन डॉलर इतकी संपत्ती असून, जगभरात एकूण 60 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. त्यामुळं चोरीला गेलेली मोठी रक्कम परत मिळणार नसली तरीही कंपनीची आर्थिक स्थिती डगमगलेली नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट करत Bybit दिवाळखोरीकच्या दिशेनं जात नसून आपण नुकसानभरपाई देण्यास समर्थ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठी रक्कम, आकडेवारी आणि कोणाला सुगावाही लागू न देता घातलेला गंडा यामुळं सध्या हे प्रकरण प्रचंड गाजत असून जागतिक स्तरावर या उलाढालीचीच चर्चा पाहायला मिळत आहे.बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे खळबळ! मार्च एप्रिल महिन्यात ग्रहांची दिशा भयानक, Google वर का सर्च केली जातेय 'ही' तारीखविरार लोकलमधील गर्दी कमी होणार? भाईंदरच्या खाडीतून धावणार व...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Cryptocurrency Crypto Heist Bybit Crypto Hack Bybit CEO Ben Zhou Bitcoin क्रिप्टोकरेंसी बायबिट बिजनेस न्यूज इथेरियम बिटकॉइन क्रिप्टो करन्सी What Is Bybit Crypto Hack पैसे मराठी बातम्या व्यवसाय हॅकर

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'राऊतांचा पुन्हा कंगनावर निशाणा! म्हणाले, 'मणिपूरच्या हिंसाचाराला सामोरे न जाणाऱ्या पंतप्रधानांचे...'Sanjay Raut Salams Kangana Ranaut: कंगना राणावत या भाजपच्या गोटात आहेत व मोदींच्या अंधभक्त महामेळाव्यात त्या ब्रॅण्ड अँम्बेसेडर आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
Read more »

गाजाच्या लोकांना इतर ठिकाणी राहण्यास प्रोत्साहित करण्याचा ट्रंपचा प्रस्तावगाजाच्या लोकांना इतर ठिकाणी राहण्यास प्रोत्साहित करण्याचा ट्रंपचा प्रस्तावअमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गाजाच्या लोकांना मिस्र आणि जॉर्डनमध्ये स्थानांतरित करण्याचा विचार व्यक्त केला आहे. या प्रस्तावांना फिलिस्तीनी राष्ट्राध्यक्ष आणि गाजातील लोक यांनी नकार दिला आहे.
Read more »

मुंबई बँकेत १२२ कोटी रुपयांचा गबन, आरबीआयने प्रतिबंध आणलेमुंबई बँकेत १२२ कोटी रुपयांचा गबन, आरबीआयने प्रतिबंध आणलेमुंबईच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव बँकेत १२२ कोटी रुपयांचा गबन झाल्याची घटना समोर आली आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या आणि लेखा प्रमुख यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आरबीआयने बँकेवर अनेक प्रतिबंध आणले आहेत.
Read more »

जीबीएसच्या धोक्यावर अजीत पवारांची सल्ला,जीबीएसच्या धोक्यावर अजीत पवारांची सल्ला,गुळियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) वाढत्या धोक्यात असल्याची चिंता व्यक्त करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना अधपके चिकन खायला टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Read more »

'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?'त्या' मुलीचा मृत्यू लोकल ट्रेनमधून पडून नव्हे तर..., वाशिंद-आसनगाव रेल्वे मार्गावर काय घडलं?Dombivali News Today: वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान वेहलोली फाटकाजवळ लोकल ट्रेन मधून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Read more »

'त्यांनी स्वतःचं चांगभल...' निलम गोऱ्हेंच्या गंभीर आरोपांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!'त्यांनी स्वतःचं चांगभल...' निलम गोऱ्हेंच्या गंभीर आरोपांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!Uddhav Thackeray On Neelam Gorhe Allegiance: शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. 2 मर्सिडिज दिल्या की एक पद मिळायचं असे त्या म्हणाल्या. दिल्लीत सुरु असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:32:25