100000000 रुपयांची 'झकास' ऑफर तरी अनिल कपूरने नाकारली जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

Anil Kapoor Pan Masala News

100000000 रुपयांची 'झकास' ऑफर तरी अनिल कपूरने नाकारली जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!
Anil Kapoor AgeAnil Kapoor NewsAnil Kapoor Advertuse
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Anil kapoor Pan Masala: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 67 व्या वर्षीदेखील चिरतरुण दिसतो. प्रत्येकाला त्याच्या एव्हरग्रीन तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. सिनेमांमध्ये त्याने उत्तम काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Anil Kapoor Pan Masala : अनिल कपूर ला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती.बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 67 व्या वर्षीदेखील चिरतरुण दिसतो. प्रत्येकाला त्याच्या एव्हरग्रीन तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते.

सिनेमांमध्ये त्याने उत्तम काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण खऱ्या आयुष्यातदेखील त्याने असं काही केलंय, ज्यामुळे तुम्हीदेखील त्याचे कौतुक कराल. कारण त्याने उचललेल्या एका पावलामुळे त्याची सगळेजण वाहवा करत आहेत. असं त्याने नेमके काय केलंय? जाणून घेऊया. पान मसाल्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असते. यासंदर्भात त्यावर सूचना जाहीर केलेली असते. तरी तुम्ही शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना पान मसालाची जाहिरात करताना पाहिले असेल. या कारणावरुन त्यांना सर्वत्र ट्रोल केले जाते. इन्फ्लूएन्सर जर पैशांसाठी अशा जाहिराती करु लागले आणि तरुण पिढी पान मसाल्याच्या आहारी गेली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो. हीच चूक अनिल कपूरने करणे टाळले.अनिल कपूरला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती. पण अनिल कपूरने पान मसाल्याची जाहिरात करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. या जाहिरातीसाठी त्याला तब्बल 10 कोटी रुपये मिळू शकले असते. पण त्याने सत्सत विवेक बुद्धीने ही जाहिरात नाकारली. यामुळे अनिल कपूर सध्याचा कौतुकाचा मानकरी ठरलाय.'फायटर' अभिनेता अनिल कपूर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य जगण्यावर भर देतो. वयाच्या 67 व्या वर्षीही तो कार्डिओ करतो. घरच्या व्यायामशाळेत घाम गाळतो. समुद्रकिनार्यावर चालायला जातो. तीन मुलांचा बाप आणि एकाचा आजोबा बनलेल्या अनिलने चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी पान मसाल्याची ऑफर नाकारली असावी, असे म्हटले जाते.अनिल कपूरने ही जाहिरात स्वीकारली असतील तर त्याला चांगले पैसेही मिळाले असते. माझ्या चाहत्यांसाठी आणि दर्शकांप्रती आपली जबाबदारी आहे. कितीही मोबदला मिळाला तरी आरोग्यास हानी पोहोचेल अशा उत्पादनाचे समर्थन करू इच्छित नाही, असे अनिल कपूरने म्हटले आहे. पिंकविलाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.अंबानींच्या दुकानात विकला जाणार सरकारचा स्वस्त किराणा माल, रिलायन्स रिटेलमध्ये मिळणार पीठ, तांदूळ आणि डाळी

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Anil Kapoor Age Anil Kapoor News Anil Kapoor Advertuse Kartik Aryan Pan Masala Pan Masala Brand अनिल कपूर Pan Masala Advertisement अनिल कपूर पान मसाला

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रात पाऊस किंवा सूर्यकिरण? जाणून घ्या हवामान स्थितीमहाराष्ट्रात पाऊस किंवा सूर्यकिरण? जाणून घ्या हवामान स्थितीउत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरवेल. शनिवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Read more »

बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीबँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीLoan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
Read more »

मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटमंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटझी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ मध्ये राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची खबर केली. त्यांनी व्ही.पी.सिंग यांना दिला होता शब्द आणि त्यामुळे ही ऑफर नाकारली.
Read more »

₹ 700000000000 रुपयांची मालकीण, कोट्यावधींची उलाढाल... या महिलेचं रतन टाटांसोबत जवळचं नातं, त्या आहेत तरी कोण?₹ 700000000000 रुपयांची मालकीण, कोट्यावधींची उलाढाल... या महिलेचं रतन टाटांसोबत जवळचं नातं, त्या आहेत तरी कोण?देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या टाटांचे यश रतन टाटांशिवाय अपूर्ण आहे. टाटासन्सला रतन टाटा यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. रतन टाटा यांच्या व्यावसायिक संबंधांबद्दल अनेकांना माहिती आहे, परंतु त्यांचे खासगी आयुष्य मात्र सगळ्यांपासून दूर आहे.
Read more »

ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेलना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेलसर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या स्थानी असलेल्या कंपनीचे नाव ऐकून धक्का बसेल.
Read more »

पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानपावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
Read more »



Render Time: 2026-04-02 17:00:36