बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी

Loan News

बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी
Loan CalculatorLoan DemandRBI
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 127 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 96%
  • Publisher: 63%

Loan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.

बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी Loan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.

भारतामध्ये एक मोठा वर्ग आहे, जो बँकांकडून विविध कारणांसाठी कर्ज घेतो. घर, व्यवसाय, वाहन किंवा शिक्षण अशा अनेक कारणांनी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला जातो. पण, आता मात्र हा निर्णय घेताना दोनदा विचार करावा लागणार आहे. रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी असतानाच गेल्या सलगच्या दोन आर्थिक वर्षांमध्ये कर्जाच्या वाढत्या मागणीला पूर्णत्वास नेण्यासाठी बँकांना बराच आटापिटा करावा लागला आहे. सद्यस्थितीला बँकांमध्ये धनराशी जमा नसल्यामुळं ही अडचणीची परिस्थिती उदभवल्याचं प्राथमिक कारण समोर येत आहे. नुकताच एका अहवालाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. क्रेड‍िट असेसमेंटशी संबंधित इंफोमेरिक्स रेटिंग्स रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार शेड्यूल कमर्शिअल बँक अर्थात एसबीसीनं 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 1,64,98,006 कोटी रुपयांचं लोन वितरीत केलं. ही आतापर्यंतच्या सर्वाधिक कर्ज वितरणाची आकडेवारी ठरली, ज्यामुळं कर्ज वितरणाची आकडेवारी 75.8 टक्क्यांवरून 80.3 टक्क्यांवर पोहोचली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल 2024 च्या आकडेवारीनुसार मार्च 2024 मध्ये इंक्रीमेंटल लोन-ड‍िपॉज‍िट रेशिओ जवळपास 95.94 टक्के इतका राहिला. मार्च महिन्यात हीच आकडेवारी 92.95 टक्के इतका होता. अहवालातील ही आकडेवारी पाहता शेड्यूल बँकांमध्ये जमा रकमेच्या तुलनेत कर्जाचा आकडा मोठा असल्याचं स्पष्ट होत आहे. 2018-19 ते 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये कर्जाची ही आकडेवारी झपाट्यानं वाढल्याचं लक्षात आलं. असंघटित क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रांमध्ये होणारी पर्यायी गुंतवणूक आणि इतर काही कारणांनी बँकांमधील जमा धनराशिचा वेग मंदावल्याचं सांगण्यात आलं.सदर अहवालाच्या आधारे BASIC होमलोनच्या सीईओपदी असणाऱ्या अतुल मोंगा यांच्या निरीक्षणानुसार डिपॉझिट रेशिओ वाढवण्यासाठी बँका आणि सरकारनं सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. बल्क कॉर्पोरेट डिपॉझिटऐवजी बँकांनी सामान्यांकडून लहानलहान धनराशी गोळा करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी विविध आर्थिक योजना बरीच मदत करतील असा अंदाज त्यांनी वर्तवला. Mumbai Local Train : रविवारी मुंबई गाठायचीये? मेगाब्लॉकचं वेळापत्र पाहूनच बेत ठरवा, नाहीतर होईल पश्चाताप वरील अहवालानुसार 30 वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या गुंतवणुकदारांचा सरासरी आकडा सातत्यानं वाढला आहे. ही एकंदर वृत्ती तरुण पिढीमध्ये गुंतवणुकीदरम्यानच इक्विटी मार्केटविषयी वाढला कल दर्शवते. दरम्यान, 30 ते 39 या वयोगटाती गुंतवणुकदारांचा आकडा मात्र स्थिर असून, 40 हून अधिक वयाच्या भागीदारांची आकडेवारी मात्र घटल्याचं लक्षात आलं आहे. येत्या काळात बँकांना अशाच पद्धतीनं ठेव रकमेची चणचण भासल्यास कोणत्याही प्रकारचं कर्ज महागणार ही शक्यता नाकारता येत नसल्याचं स्पष्ट मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. इतकंच नव्हे, तर आता भविष्यात कर्ज घेणाऱ्यांपुढं एक ना अनेक अडचणी उभ्या असतील हे चित्र स्पष्ट असून त्याचा परिणाम खात्यावर येणारा ताण आणि तत्सम आर्थिक अडचणींच्या रुपात दिसू शकतो हे दाहक वास्तव.Full Scorecard →

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Loan Calculator Loan Demand RBI Loan Demand Hike Loan EMI Loan News लोन कर्ज मराठी बातम्या बातम्या आरबीआय रिझर्व्ह बँक

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
Read more »

....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढा....तर याचा अर्थ तुमचं Gmail दुसरं कोणीतरी वापरतंय; ही ट्रिक वापरा आणि तो कोण आहे शोधून काढाआज एका खास ट्रिकबद्दल जाणून घ्या जिचा वापर करुन तुम्ही तुमचं Gmail खातं अजून कोणी वापरत आहे का याची माहिती मिळवू शकता.
Read more »

SmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रियाSmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रियाWhat is SmilePay: एखाद्याशी व्यवहार करायचा असेल तर तुम्ही कॅश पाठवता, यूपीआयचा वापर करता किंवा डेबिट-क्रेडीट कार्ड वापरता. पण तुमच्या एका स्माईलने पेमेंट होत असेल असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसत नाहीय ना. पण हे खरं आहे. आपली स्माईल किती मौल्यवान आहे, हे तुमच्या आता लक्षात येणार आहे.
Read more »

'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तरMaharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं.
Read more »

12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.
Read more »

स्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यूस्वप्नातही वाटलं नसेल असं काही तरी होईल; गणपती मिरवणुकीत नाचत असताना तरुणाचा मृत्यूगणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 14:21:49