...यासाठीच दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला; मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं कारण

PM Modi Mann Ki Baat News

...यासाठीच दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला; मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं कारण
ModiMann Ki BaatPahalgam Terror Attack
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 116 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी मन की बात या आपल्या मासिक कार्यक्रमादरम्यान पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला.

PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' या आपल्या मासिक कार्यक्रमादरम्यान पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला.मोदींनी सांगितली भारतीयांची सर्वात मोठी ताकद कोणतीसतेच नावाच्या अॅप्लिकेशनबद्दलही दिली माहितीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या मासिक 'मन की बात' कार्यक्रमाच्या 121 व्या भागामध्ये देशाला संबोधित केलं.

पंतप्रधान मोदींनी यावेळेस पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना, या हल्ल्याने संपूर्ण देश दुखी असल्याचं सांगितलं. दहशतवादी"हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचा संताप आणि रक्त उसळून येत आहे. हा हल्ला दहशतवाद्यांचा दुबळेपणा दाखवतो. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. विकास कामांना गती मिळत होती हे दहशतवाद्यांना पाहवलं नाही", असं पंतप्रधान मोदी म्हणाले."जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. या माध्यमातून स्थानिकांच्या कमाईमध्ये वाढ होत होती. मात्र दहशतवाद्यांना हे सारं सहन झालं नाही", असंही पंतप्रधान मोदी म्हणाले."दहशतवादाविरूद्धच्या या लढाईमध्ये 140 कोटी भारतीयांनी एकत्र राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. ही आपल्यामधील एकताच आपल्या दहशतवादाविरूद्धच्या लढाईमधील सर्वात मोठा आधार आहे", असंही मोदींनी म्हटलं आहे.दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी,"आज जग पाहत आहे की संपूर्ण भारत या दहशतवादी हल्ल्याविरोधात एकाच स्वरात आवाज उठवत आहे. भारतामधील लोकांमध्ये जो संताप आहे तोच संपूर्ण जगात आहे. मला अनेक अंतरराष्ट्रीय नेत्यांचे फोन आले. त्यांनी मला विशेष मेसेजही पाठवले. या हल्ल्याचा सर्वांनीच निषेध खेला आहे. सर्वांनीच मयत व्यक्तींच्या कुटुंबांबद्दल सांत्वना व्यक्त केली. संपूर्ण जग या लढाईमध्ये आपल्यासोबत आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मी विश्वास देऊ इच्छितो की त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल," असं आश्वासन दिलं.दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करण्याचा कट का रचला याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं."या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांना पिडितांच्या दुखाचा अंदाज आहे. दहशतवाद्यांच्या हस्तकांना पुन्हा एकदा काश्मीर उद्धवस्त झालेलं पाहायचं आहे. त्यासाठीच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला ठामपणे उभं राहायला हवं", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये 'सचेत' नावाच्या अॅप्लिकेशनबद्दलही भाष्य केलं."नैसर्गिक आपत्तींमध्ये तुम्ही अडकून पडू नये यासाठी हे अॅप्लिकेशन भारतीयांना फायद्याचं ठरु शकतं," असं पंतप्रधानांनी सांगितलं."हे अॅप्लिकेशन भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनक प्राधिकरणाने विकसित केलं आहे. 'सचेत' अॅप्लिकेशनचा हेतू हा लोकांना मदत करण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हवामानाचे अपडेट्स मिळवता येतील," असं मोदींनी भारतीयांना सांगितलं. तसेच हे अॅप्लिकेशन अनेक स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Modi Mann Ki Baat Pahalgam Terror Attack Pahalgam Terror Attack

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मामीचा भाच्यावर जडला जीव, रचला मामाच्या हत्येचा कट; त्यानेच आणलेल्या सुटकेसमध्ये भरुन फेकून दिला मृतदेह; पण तो एक कागद...मामीचा भाच्यावर जडला जीव, रचला मामाच्या हत्येचा कट; त्यानेच आणलेल्या सुटकेसमध्ये भरुन फेकून दिला मृतदेह; पण तो एक कागद...देवरिया हत्याकांड मेरठमधील हत्येच्या फक्त एक महिन्यानंतर घडले आहे, ज्यामध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला आणि त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये ठेवले.
Read more »

पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार...; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोरपर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार...; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा थरारक व्हिडिओ समोरPahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटलं जात आहे.
Read more »

दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू असताना जखमी मुलाला पाठीवर घेऊन जाणारा सज्जाद; त्यानंच सांगितलं नक्की काय घडलं?दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू असताना जखमी मुलाला पाठीवर घेऊन जाणारा सज्जाद; त्यानंच सांगितलं नक्की काय घडलं?पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सज्जाद भट्टचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
Read more »

‘एक बार में अटैक कर सब खत्म कीजिए मोदी जी’: पहलगाम हमले पर भड़के मुकेश खन्ना, सरकार से की पाकिस्तान के खिला...‘एक बार में अटैक कर सब खत्म कीजिए मोदी जी’: पहलगाम हमले पर भड़के मुकेश खन्ना, सरकार से की पाकिस्तान के खिला...जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले में बॉलीवुड सेलेब्स लगातार न्याय की मांग रहे हैं। एक्टर मुकेश खन्ना ने भी अब इस मामले में खुलकर बात की है।
Read more »

पहलगाम से लौटकर हमले के चश्मदीदों ने क्या-क्या बताया?पहलगाम से लौटकर हमले के चश्मदीदों ने क्या-क्या बताया?जम्मू-कश्मीर के पहलगाम में चरमपंथी हमले के निशाने पर आए कई चश्मदीदों ने अब घर लौटकर बीबीसी से बात की है और बताया है कि उस वक्त वहां क्या हुआ था.
Read more »

'सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार, नाहीतर रक्ताचे पाट...' बिलावल भुट्टोंसह पाकच्या पंतप्रधानांनी ओकली गरळ'सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार, नाहीतर रक्ताचे पाट...' बिलावल भुट्टोंसह पाकच्या पंतप्रधानांनी ओकली गरळPahalgam Terror Attack : पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतानं ताशेरे ओढले. ज्यानंतर या शेजारी राष्ट्रातूनही भारताच्या भूमिकांवर प्रतिक्रिया देण्यात आल्या.
Read more »



Render Time: 2026-04-01 22:36:09