Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटलं जात आहे.
Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. गेल्या सहा वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटलं जात आहे.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं संपूर्ण देश हादरला आहे.
या हल्ल्यानंतर पहलगाम येथील हल्ल्यानंतरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच दरम्यान हल्ल्याचा एक लाइव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बंदूकधारी व्यक्ती पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळावरुन बचावलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ समोर येत होते. यात एक महिला रडत रडत बोलताना दिसत आहे. तर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक दहशतवाद्याच्या हातात ऑटोमॅटिक गन आहे आणि पहलगाम येथील मैदानात पर्यटकांवर गोळीबार करताना दिसत आहे. या दहशतवाद्याने बॉडिकॅम परिधान केले होते. हल्लेखोराने या संपूर्ण हल्ल्याची व्हिडिओग्राफी केली होती. दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुषांना वेगवेगळे केले आणि त्यानंतर फक्त पुरुषांवर गोळ्या चालवल्या. काही लोकांना जवळून गोळ्या मारण्यात आल्या तर काहींना लांबून गोळ्या झाडण्यात आल्या. आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं की, दहशतवाद्यांनी जाणूनबूजून पहलगाम हे ठिकाण हल्ल्यासाठी निवडलं. तेथे कोणीही सुरक्षारक्षक तैनात नव्हते आणि हल्ल्याच्यावेळी नागरिकांना मदत मिळणे कठिण जाईल. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी घनदाट जंगलाचा आधार घेतला होता.पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. पहलगामच्या बैसारन घाटीमध्ये करण्यात आला होता. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.पहलगाम येथील हल्ल्यानंतर किमान 15 हजार लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द करीत बुधवारी विमानांचे तिकीट रद्द केले आहे. इंडिगोकडे 7,500 एअर इंडियाकडे 5,000 तर स्पाइसजेटकडे 5,5०० विनंती अर्ज आले आहेत. ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचे आहे त्यांना 100% परतावा तर ज्यांना तिकिटाचे पुनर्नियोजन करायचे आहे त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ते करून देण्याची घोषणा विमान कंपन्यांनी केली आहे. हल्ल्यानंतर तिकीट रद्दचे प्रमाण सातपट अधिक वाढले आहे.
Pahalgam Attack Pahalgam Terror Attack पहलगाम दहशतवादी हल्ला Pahalgam Terror Attack Today News Pahalgam Terror Attack Today News In Marathi
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पुण्यात खळबळ! दोन महिन्यांच्या जुळ्या मुलांची हत्या, आईनेच पाण्याच्या टाकीत...Pune Crime News: पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. जुळ्या मुलांची वाढ नीट होत नसल्याने आईनेच त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
Read more »
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्याआधीचा जोडप्याचा शेवटचा व्हिडीओ आला समोर, ठरला अखेरचा क्षणPahalgam Terror Attack: कर्नाटकातील शिवमोगा येथील मंजुनाथ यांचा काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची पत्नी पल्लवी यांच्यासमोर त्यांना ठार करण्यात आलं.
Read more »
पहलगाम दहशतवादी हल्ला: पुण्यातील 5 जणांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार, महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू, 2 जखमीपहलगाम दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack News in Marathi): जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा जवान सतर्क झाले असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानाने घटनास्थळी रवाना झाले आहे.
Read more »
Pahalgam Attack: महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू; डोंबिवलीतील तिघांचा, पुण्यातील दोघांचा समावेशPahalgam Terrorist Attack 6 Died From Maharashtra: पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Read more »
उरी, पुलवामा आणि आता पहलगाम...; जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षातील दहशतवादी हल्ले, मृतांचा आकडा पाहून थरकाप उडेलPahalgam Terror Attack: जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
Read more »
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरची दोन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाला...Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जवळपास 28 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. 2019 पुलवामानंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
Read more »
