...म्हणून बापानं 19 वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं

Father News

...म्हणून बापानं 19 वर्षीय जिवंत मुलीचं घातलं श्राद्ध; जेवणाला गावाला बोलवलं
RitualsDeathGirl
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 126 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 110%
  • Publisher: 63%

Father Shraddha ritual for daughter : नागराळ गावातून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. 19 वर्षीय जिवंत मुलीचं वडिलांनी श्राद्ध घातलं आहे. कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.

Father Shraddha ritual for daughter : कर्नाटकच्या बेळगावात जन्मदात्या बापाने आपल्या जिवंत मुलींचं श्राद्ध घातल्याची घटना घडलीय. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून बापानेही कृत्य केलंय. सोबतच बापाने संपूर्ण गावासह पै पाहुण्यानाही श्राद्ध जेवणासाठी बोलावलं होतं.

जिवंत मुलीच्या श्राद्धाची घटना पाहून गावही आचंबित झालंय. बापाने जिवंतपणीच मुलीचं श्राद्ध घातल्याची घटना कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात घडली आहे. आपली लाडकी लेक प्रियकरासोबत पळून गेल्याचं जिव्हारी लागल्याने संतापलेल्या बापाने हे पिंडदान केलंय. एवढ्यावरच न थांबता एक तिथी काढून त्याने संपूर्ण गावासह पै-पाहुण्यांसाठी जेवणही ठेवलं होतं. मुलीचे वडील शिवगौडा पाटील यांनी गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीच्या फोटोला फुलं वाहून पिंडदान विधी केला. तसेच मृत व्यक्तीला अर्पण करतात तशीच श्रद्धांजली अर्पण केली. सोबतच या विधीत त्यांनी मुलीसोबतचे कुटुंबाचे संपूर्ण नातेसंबधही तुटल्याचं जाहीर करून टाकलंय. रायबाग तालुक्यातील नागराळ गावातील 19 वर्षीय तरुणी सुश्मिता हिचं गावातील विठ्ठल बस्तवाडे नावाच्या 29 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. विठ्ठल बस्तवाडे हा तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण सुश्मिताच्या कुटुंबीयांचा अशा प्रेमसंबंधांना विरोध असल्याने दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र लाडक्या लेकीचं कृत्याने घराण्याच्या संस्काराला धक्का बसला या विचाराने वडील अत्यंत दुःखी झाले. तसेच आपल्यासाठी आता मुलगी जणू मेली आहे, असे समजून त्यांनी मुलीच्या जिवंतपणीचं तिचं श्राद्ध घातलं आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा निषेध केला असून शिवगौड पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. वडिलांकडूनच मुलीचे जिवंतपणे श्राद्ध ही घटना समाजातील मानसिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. स्थानिक प्रशासनाला या प्रकारावर संवेदनशील आणि परिणामकारक उपाययोजना करावी लागणार आहे. तसेच सर्वच पालकांनी मुलाच्या व्यक्ति स्वातंत्र्यांचा आदर करायला हवा. FAQप्रश्न १: ही घटना कुठे आणि कशाबाबत आहे?उत्तर: ही घटना कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली. जन्मदात्या बापाने आपल्या जिवंत १९ वर्षीय मुलीचे श्राद्ध केले. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून हे कृत्य केले गेले.प्रश्न २: मुलीचे नाव आणि तिचा प्रियकर कोण?उत्तर: मुलीचे नाव सुश्मिता आहे. तिचा प्रियकर विठ्ठल बस्तवाडे आहे, जो तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि लग्न करण्याची इच्छा होती.प्रश्न ३: बापाने श्राद्ध कसे केले?उत्तर: बाप शिवगौडा पाटील यांनी गावकरी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीच्या फोटोला फुले वाहून पिंडदान विधी केला. मृत व्यक्तीला अर्पण करतात तशी श्रद्धांजली अर्पण केली. एक तिथी काढून संपूर्ण गाव आणि पै-पाहुण्यांसाठी जेवण ठेवले.प्रश्न ४: बापाने आणखी काय जाहीर केले?उत्तर: श्राद्ध विधीत बापाने मुलीसोबतचे कुटुंबाचे संपूर्ण नाते-संबंध तुटल्याचे जाहीर केले. लाडकी लेक पळून गेल्याने घराण्याच्या संस्कारांना धक्का बसला, म्हणून मुलगी मेली समजून हे पिंडदान केले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rituals Death Girl Love Daughter Belgaum Raibag News Belagavi Shocking News Father Performs Shraddha रायबाग बातमी बेळगाव घटना वडिलांचे श्राद्ध जिवंत मुलीचे श्राद्ध कर्नाटक बातमी अंधश्रद्धा सामाजिक वाद

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

टेनेसी में सैन्य फैक्ट्री में भीषण धमाका, 19 लोग लापताटेनेसी में सैन्य फैक्ट्री में भीषण धमाका, 19 लोग लापताअमेरिका के टेनेसी राज्य में एक सैन्य म्यूनिशन फैक्ट्री में हुए भीषण धमाके के बाद 19 लोग लापता हैं और उनके मृत होने की आशंका है। धमाके के कारणों का अभी तक पता नहीं चला है। बचाव कार्य जारी है और आसपास के इलाकों को खाली करा लिया गया है।
Read more »

अमेरिका में सैन्य उत्पादन प्लांट में भीषण विस्फोट, 19 लापताअमेरिका में सैन्य उत्पादन प्लांट में भीषण विस्फोट, 19 लापतावॉशिंगटन: अमेरिका के टेनेसी में एक सैन्य उत्पादन प्लांट में हुए भीषण विस्फोट में 19 लोग लापता हैं। अधिकारियों ने बताया कि विस्फोट इतना भयंकर था कि पूरी फैक्ट्री मलबे में बदल गई। आसपास के इलाकों में भी विस्फोट का असर महसूस किया गया।
Read more »

Cancer Weekly Horoscope 13 to 19 October 2025: रिश्तों में मिठास बढ़ेगी, पढ़ें कर्क का राशिफलCancer Weekly Horoscope 13 to 19 October 2025: रिश्तों में मिठास बढ़ेगी, पढ़ें कर्क का राशिफलसप्ताह की शुरुआत में चंद्रमा मिथुन राशि में रहेंगे, जिससे आत्मचिंतन और मानसिक स्पष्टता बढ़ेगी। 14-15 अक्टूबर को चंद्रमा आपके राशि में प्रवेश करेंगे, जिससे भावनाएं गहरेंगी और आप अपने परिवार और आत्मिक जुड़ाव पर ध्यान देंगे। एस्ट्रोपत्री डॉटकॉम के श्री आनंद सागर पाठक प्रस्तुत कर रहे हैं। इस सप्ताह Saptahik Rashifal 2025 का राशि अनुसार नक्षत्रीय...
Read more »

सिंह साप्ताहिक राशिफल: 13 से 19 अक्टूबर 2025सिंह साप्ताहिक राशिफल: 13 से 19 अक्टूबर 2025यह सप्ताह सिंह राशि के जातकों के लिए अवसरों से भरा रहेगा। चंद्रमा मिथुन, कर्क, सिंह और कन्या राशियों से गुजरेंगे, जिससे 16 से 18 अक्टूबर तक आत्मविश्वास और आकर्षण चरम पर रहेगा। स्वास्थ्य और रिश्तों में सुधार होगा, संतुलन बनाए रखना आवश्यक है। सूर्य का तुला राशि में प्रवेश संतुलन लाएगा और बृहस्पति का कर्क राशि में प्रवेश भावनात्मक उपचार देगा।
Read more »

Bigg Boss 19: सलमान खान ने तान्या और नीलम को जमकर लगाई फटकार, वीकेंड का वार में दिया रियलिटी चेकBigg Boss 19: सलमान खान ने तान्या और नीलम को जमकर लगाई फटकार, वीकेंड का वार में दिया रियलिटी चेकBigg Boss 19: इस बार वीकेंड का वार में सलमान खान ने तान्या मित्तल और नीलम गिरी की जमकर क्लास लगाई है। उन्होंने यहां तक कहा कि नीलम का गेम वीक है।
Read more »

गयाजी में विधानसभा चुनाव से पहले 19 लाख जब्त, हिरासत में लिए गए दो लोगगयाजी में विधानसभा चुनाव से पहले 19 लाख जब्त, हिरासत में लिए गए दो लोगगयाजी में पुलिस ने विधानसभा चुनाव के मद्देनजर जांच के दौरान दो व्यक्तियों से 19.
Read more »



Render Time: 2026-04-02 12:13:33