...तर भारतीय पुरुषांना सहा महिन्यांची भरपगारी सुट्टी? संसदेत मांडलं 'हे' खास विधेयक

Paternity Leave News

...तर भारतीय पुरुषांना सहा महिन्यांची भरपगारी सुट्टी? संसदेत मांडलं 'हे' खास विधेयक
Indian FathersSupriya SuleLegislation
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 104 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Paternity Leave For Indian Fathers: सध्याच्या नियमांनुसार केवळ महिलांना अशी प्रसूतीसंदर्भातील सुट्टी दिली जाते. मात्र आता अशी सुट्टी पुरुषांनाही पालक झाल्यानंतर देण्याबाबतची चर्चा सुरु आहे.

Paternity Leave For Indian Fathers : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत शनिवारी दोन विधेयके सादर केली. त्यात पितृत्व आणि पितृत्व लाभविधेयक 2025 आणि सामाजिक सुरक्षा संहिता विधेयक 2025 चा समावेश आहे.

मुलाच्या संगोपनाकडे वडिलांनाही लक्ष देता यावे यासाठी त्यांना पितृत्व रजा मिळावी अशी मागणी पितृत्व आणि पितृत्व लाभविधेयकाद्वारे करण्यात आली आहे, तर गिग वर्कर्सच्या कामाचे तास, किमान वेतन निश्चित करण्याचे अधिकार सामाजिक सुरक्षा संहिता विधेयक, 2025 मध्ये प्रस्तावित करण्यात आले आहेत.विधेयकाचा उद्देश काय?पितृत्व रजा विधेयक म्हणजे पॅटर्निटी अँड पॅटर्नल बेनिफिट्स बिल, 2025 हे विधेयक नवजात बालकाच्या सुरुवातीच्या विकासात पित्याला भाग घेण्याचा कायदेशीर अधिकार देण्यासंदर्भात आहे. पगारीसह पितृत्व रजा सुरू करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. यामुळे पारंपरिक पद्धत मोडीत काढून मातृत्व प्राप्त आईच्या आरोग्याची काळजी घेणे आणि लवचिक पालकत्वाला प्रोत्साहन देणे शक्य होईल.या विधेयकाच्या मुख्य तरतुदी:पित्याला बालकाच्या सुरुवातीच्या काळात सक्रिय सहभाग घेण्यासाठी पगारीसह रजा.आई आणि बालकाच्या देखभालीत समान जबाबदारी वाटणे.हे विधेयक अजूनही संसदेत चर्चेसाठी आहे आणि मंजूर झाले नाही.हे खासगी सदस्याचे असल्याने त्याची अंमलबजावणी होण्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक आहे.सध्या भारतात खासगी क्षेत्रात पितृत्व रजा कायद्याने बंधनकारक नाही, तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची रजा मिळते. 2017 मध्ये पितृत्व लाभ विधेयक सादर झाले होते, ज्यात तीन महिन्यांच्या रजेची तरतूद होती, परंतु ते मंजूर झाले नाही. हे नवीन 2025 चे विधेयक पितृत्व रजेच्या अधिकाराला मजबूत करण्यासाठी एक पाऊल आहे.कोणत्या देशात आहे ही रजा? आणि किती दिवस?जगातील बहुतेक देशांमध्ये पितृत्व रजा उपलब्ध आहे, ज्यात नवजात बालकाच्या जन्मानंतर वडिलांना दिली जाणारी पगारीसह किंवा आंशिक पगारासह रजा असते. मात्र, ही रजा उपलब्ध नसलेले काही अपवादात्मक देश आहेत, जसे की अमेरिका, पापुआ न्यू गिनी, मार्शल आयलंड्स, मायक्रोनेशिया, नाउरू, पलाऊ आणि टोंगा. जगातील 63% देशांमध्ये वडिलांसाठी पगारीसह रजा हमी दिली जाते. पितृत्व रजेची लांबी देशानुसार बदलते, काही देशांमध्ये ती 180 दिवसांपर्यंत असते, तर काहींमध्ये फक्त 1 ते 2 दिवस. आइसलँड 180 दिवस, स्पेनमध्ये 112 दिवस, नेदरलँड्समध्ये 42 दिवस आणि पोर्तुगालमध्ये 35 दिवस वडिलांना भरपगारी सुट्टी दिली जाते. भारतात नेमक्या किती सुट्ट्यांची तरतूद विधेयकात आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तरी एका अंदाजानुसार हा कालावधी 15 दिवसांपासून काही महिन्यांपूरता असू शकतो असं सांगितलं जात आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Fathers Supriya Sule Legislation Winter Session Of Parliament 2025

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

தந்தையர் தின ஸ்பெஷல்: மனதை உருக வைத்த அப்பா பாடல்கள்தந்தையர் தின ஸ்பெஷல்: மனதை உருக வைத்த அப்பா பாடல்கள்Fathers Day Special Tamil Songs: தமிழ் சினிமாவில் என்றென்றும் கொண்டப்படும் அப்பா பிள்ளைகளின் பாடல்களின் பட்டியலை இந்த பதிவில் காண்போம்.
Read more »

Fathers Day को बनाएं स्पेशल और घूम आएं दिल्ली की ये 5 जगहेंFathers Day को बनाएं स्पेशल और घूम आएं दिल्ली की ये 5 जगहेंFathers Day को बनाएं स्पेशल और घूम आएं दिल्ली की ये 5 जगहें
Read more »

Syria Crisis: MEA Issues Advisory, Urges Indian Nationals To Leave At EarliestSyria Crisis: MEA Issues Advisory, Urges Indian Nationals To Leave At EarliestIn the wake of the violent escalation in Syria, India has cautioned its nationals against travelling to the country. The Ministry of External Affairs also issued a helpline number for those seeking assistance.
Read more »

Survey: भारत का हर पांचवा अमीर इंसान विदेश में बसना चाहता है, लेकिन ऐसा क्यों जानें वजहSurvey: भारत का हर पांचवा अमीर इंसान विदेश में बसना चाहता है, लेकिन ऐसा क्यों जानें वजहSurvey: भारत का हर पांचवा अमीर इंसान छोड़ना चाहता है भारत, लेकिन ऐसा क्यों जानें वजह देश Kotak Mahindra Bank Survey every fifth Indian Rich person wants to leave India
Read more »

IIM JOKA Incident: পুলিস জোর করছে ধ*র্ষ*ণের অভিযোগ করতে! গোটা ঘটনা সাজানো... ভয়ংকর অভিযোগ IIM কাণ্ডে নির্যাতিতার বাবার...IIM JOKA Incident: পুলিস জোর করছে ধ*র্ষ*ণের অভিযোগ করতে! গোটা ঘটনা সাজানো... ভয়ংকর অভিযোগ IIM কাণ্ডে নির্যাতিতার বাবার...IIM calcutta incident student accused for physical harassment now victim fathers shocking claim no crime happened
Read more »

ಕ್ರಿಕೆಟ್ ಕನಸು ಬಿಟ್ಟು ಮಗಳ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯಾದ ತಂದೆ! ಗೆಲುವಿನ ಹಿಂದಿದೆ ಸ್ಪೂರ್ತಿದಾಯಕ ಯಶೋಗಾಥೆಕ್ರಿಕೆಟ್ ಕನಸು ಬಿಟ್ಟು ಮಗಳ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯಾದ ತಂದೆ! ಗೆಲುವಿನ ಹಿಂದಿದೆ ಸ್ಪೂರ್ತಿದಾಯಕ ಯಶೋಗಾಥೆFathers of Indian women cricketers: ವಿಶ್ವಕಪ್‌ ಗೆದ್ದ ವನಿತೆಯರ ಗೆಲುವಿನ ಹಿಂದೆ ತಂದೆಯಂದಿರ ತ್ಯಾಗದ ಕಥೆ ಇದೆ.
Read more »



Render Time: 2026-04-02 05:59:37