Captain accused of slapped player during world cup: महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिच्यावर संघाच्या वेगवान गोलंदाजाने खेळाडूंवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. बोर्डाने या आरोपांना उत्तर दिले आहे.
2Shocking Allegations in Bangladesh Cricket Women Team Captain: बांग्लादेश महिला क्रिकेट टीममध्ये अंतर्गत कलहाचे संकट पुन्हा एकदा समोर आले आहे. महिला वर्ल्ड कप 2025 नंतर संघातून बाहेर असलेल्या अनुभवी फास्ट बॉलर जहांआरा आलम हिने संघाच्या कर्णधार निगार सुल्ताना हिच्यावर गंभीर आरोप केले आहे.
तिचा आरोप सरळ सरळ ज्युनियर खेळाडूंना मारहाण, मानसिक दबाव आणि संघातील राजकारण यावर आधारित आहे. भारताने या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले असताना, बांग्लादेशचा या स्पर्धेतील प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिला. या निराशाजनक खेळाबरोबरच आता संघातील तणावपूर्ण वातावरणाची चर्चा उफाळून आली आहे.जहांआरा आलमचा दावा बांग्लादेशी वृत्तपत्राशी बोलताना 32 वर्षांच्या जहांआराने सांगितले: “निगार सुल्ताना खेळाडूंना मारते, विशेषतः ज्युनियर मुलींना. ही काही आजची गोष्ट नाही. वर्ल्ड कपदरम्यानही असे प्रसंग घडले. काही ज्युनियर प्लेअर्स माझ्याकडे येऊन म्हणाल्या ‘मी पुन्हा चूक करणार नाही दीदी, नाहीतर मला पुन्हा कानाखाली मिळेल.’ कुणीतरी तर म्हणालं, ‘काल मला मार बसला.’”हे ही वाचा: काव्या मारनचा मोठा निर्णय! सनरायझर्स हैदराबादच्या मालकिणीने बदललं टीमचं नाव; जाणून घ्या नवीन ओळख तिने असा दावा केला की दुबई टूरमध्ये निगारने एका तरुण खेळाडूला हॉटेलच्या रूममध्ये बोलावून कानाखाली मारली. तिच्या मते, संघातील काही खेळाडू भीतीच्या वातावरणात खेळतात. “सीनियर खेळाडूंना योजनाबद्ध पद्धतीने बाहेर ढकललं” जहांआराने संघातील राजकारणावर थेट बोट ठेवले. तिच्या म्हणण्यानुसार, “बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटकडून काही विशिष्ट खेळाडूंनाच जास्त पाठबळ मिळते. बाकींच्या क्षमतेची कधीच दखल घेतली जात नाही. 2021 नंतर आम्हा सीनियर प्लेयर्सवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. मला कॅंपमधून बाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर संघात काही खेळाडूंच्या गटबाजीने जोर धरला.”जहांआरा म्हणाली की, तिला आणि इतर सीनियर्सना जाणूनबुजून बाजूला केले गेले, कारण त्यांनी चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवला होता.हे ही वाचा: Harmanpreet Kaur Jersey Number: हरमनप्रीत कौरने ‘7’ सोडून ‘23’ नंबरची जर्सी का घातली? जाणून घ्या क्रमांकाची रहस्यमय स्टोरीBCBची प्रतिक्रिया काय? बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मात्र जहांआराच्या या आरोपांचे तिखट शब्दांत खंडन केले आहे. बोर्डाच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “जहांआरा आलम यांनी केलेले आरोप निराधार, मनगढंत आणि भ्रामक आहेत. त्यामध्ये कोणताही तथ्याधार नाही.” बोर्डाने हेही पुन्हा स्पष्ट केले की 2025 मध्ये जहांआराला संघातून वगळण्यामागे तिच्या मानसिक आरोग्याशी संबंधित कारणे आणि तिच्या स्वतःच्या निर्णयाचा भाग होता. ती सध्या ऑस्ट्रेलियात राहते आणि राष्ट्रीय संघात पुनरागमनाची शक्यता कमी असल्याचेही बोर्डाने सांगितले. हे ही वाचा: World Cup 2025: ट्रॉफी घेण्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरची ही इच्छा पूर्ण करण्यास जय शहांनी दिला नकार, VIDEO व्हायरल!वाद आणखी वाढण्याची शक्यताजहांआराच्या या वक्तव्यांनंतर बांग्लादेश महिला क्रिकेटमधील अंतर्गत वातावरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कर्णधार आणि खेळाडूंमधील तणाव, गटबाजी आणि व्यवस्थापनातील अस्थिरता या सर्व गोष्टी भविष्यात अजून मोठ्या वादाला जन्म देऊ शकतात. सध्या चाहत्यांचे, माजी खेळाडूंचे आणि क्रीडा तज्ज्ञांचे लक्ष निगार सुल्ताना आणि BCB यांच्यावर आहे की ते पुढे या विषयावर काय पावले उचलणार.
Bangladesh Cricket Women Team Nigar Sultana
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
हरमनप्रीत कौरने आता कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा; WC जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिग्गज खेळाडूची मागणीभारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हरमप्रीत कौरने कर्णधारपद सोडावं अशी मागणी कऱण्यात आली आहे.
Read more »
'ये 7 घंटे ऐसा खेलो... ', WC फाइनल से पहले कोच मजूमदार ने ऐसे भरा था हरमन ब्रिगेड में जोशमहिला विश्व कप फाइनल से पहले अमोल मजूमदार ने टीम इंडिया को ‘चक दे इंडिया’ की तर्ज पर प्रेरणादायक भाषण दिया. उनकी यह बात खिलाड़ियों में जोश भर गई और भारत ने दक्षिण अफ्रीका को हराकर अपना पहला महिला विश्व कप जीता. जीत के बाद मजूमदार ने कहा कि यह भारतीय क्रिकेट के लिए ऐतिहासिक क्षण है.
Read more »
WC विजेता कप्तान का कैसे शुरु हुआ सफर, बिना बैट-बॉल के निकल पड़ी वो दुनिया जीतने, हरमनप्रीत की हैरान करने व...बचपन में अपने पिता का बड़ा बल्ला थामकर क्रिकेट का ककहरा सीखने वाली हरमनप्रीत कौर ने सपने देखना कभी नहीं छोड़ा और भारत को पहला महिला विश्व कप खिताब दिलाने के बाद वह खुद को आभारी मानती है.
Read more »
जेमिमा के साथ गाना गाएंगे सुनील गावस्कर? WC फाइनल से पहले किया था वादा, देखें VIDEOवर्ल्ड कप चैम्पियन जेमिमा रोड्रिग्स ने सुनील गावस्कर को उनके वादे की याद दिलाई है कि अगर भारत महिला वर्ल्ड कप जीतता है, तो दोनों एक साथ गाना गाएंगे. अब जेमिमा गिटार लेकर तैयार हैं और फैंस इंतज़ार कर रहे हैं गावस्कर के माइक उठाने का.
Read more »
पाकिस्तान ने वुमेंस टीम के हेड कोच को हटाया, WC में एक भी मैच नहीं जीत पाई टीमWomen World Cup: पाकिस्तान ने वुमेंस टीम के हेड कोच को निकाला, वर्ल्ड कप में एक भी मैच नहीं जीत पाई थी टीम
Read more »
कोच अमोल के पास था एक 'अनमोल' रत्न, WC में धोनी की तरह करती रहीं धमाका, जीत की गुमशुदा नायिका!विकेटकीपर बल्लेबाज रिचा घोष ने कहा है कि भारत की विश्व कप विजेता टीम विश्वास और अपनी भूमिका को लेकर स्पष्टता की नींव पर बनी है जिसमे कोच अमोल मजूमदार ने उन्हें ‘फिनिशर’ की भूमिका सौंपी है .
Read more »
