''फुले' चित्रपटातील एकही सीन कट करु नका, आम्ही आजच्या ब्राह्मणांना...'; भुजबळांचा आक्रमक पवित्रा

Chhagan Bhujbal News

''फुले' चित्रपटातील एकही सीन कट करु नका, आम्ही आजच्या ब्राह्मणांना...'; भुजबळांचा आक्रमक पवित्रा
DemandCensorPratik Gandhi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 113 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Chhagan Bhujbal On Pratik Gandhi Phule Movie: महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटातील काही दृष्यांमुळे नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच भुजबळांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या.

Chhagan Bhujbal On Pratik Gandhi Phule Movie : महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटातील काही दृष्यांमुळे नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच भुजबळांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या.छत्रपती संभाजीनगरमध्ये भुजबळांनी केलं हे विधान राज्यातील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटासंदर्भात मोठी मागणी केली आहे.

मागील काही दिवसांपासून अभिनेता प्रतिक गांधीने मुख्य भूमिका साकारलेल्या 'फुले' चित्रपटातील काही दुष्यांवरुन वाद सुरु आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यानंतरही या चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता छगन भुजबळांनी या चित्रपटातील एकही सीन कट न करण्याची मागणी केली आहे. तसेच या चित्रपटामध्ये सत्य आहे तेच दाखवलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.फुले चित्रपटासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना,"एक ही सीन कट करू नका. सत्य आहे तेच दाखवले आहे. महात्मा फुले यांच्या संबंधित लिहिलेल्या ग्रंथ,पुस्तकातले आणि फुले यांनी लिहिलेले दाखवले जात आहे," असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना,"आम्ही आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करीत नाही. आम्ही ब्राम्हणविरोधी नाही," असंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच,"सर्व ब्राम्हण फुले यांच्या विरोधात नव्हते. कर्मठ ब्राम्हणांचा विरोध होता. बहुजन लोक अंधश्रदेत होते त्यावेळी काय परिस्थिती होती? दलितांची परिस्थिती कुणी नाकारू शकत नव्हते," असंही छगन भुजबळांनी म्हटलं आहे."बहुजन समाजाच्या महिला झाल्यास केस कापत नव्हते. विधवांचे कर्मठ ब्राम्हण हे केस कापत होते. पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या मुली या ब्राम्हण होत्या. यापूर्वी देखील आचार्य अत्रे यांच्या जीवनावर सिनेमा आला आहे. त्यात सर्वांच्या भूमिका असून त्यात ही हेच दाखवले आहे. त्याला राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यात नेमके तेच दाखवले. जगातल्या नामवंत लेखकांनी लिहिले आहे," असं भुजबळ म्हणाले.मंत्री नसताना कार्यकर्ते गर्दी करत असल्यासंदर्भात बोलताना भुजबळांनी,"प्रेम मंत्रिपदावर अवलंबून नसते. आपण त्यांच्यासाठी काम करतो प्रेम करतो म्हणून लोक जमतात. मंत्री असल्यावर जास्त लोक येतात ते खुर्चीसाठी येतात माझ्यासाठी नाही," असंही म्हटलं.अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणं अपेक्षित होतं. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या या चित्रपटातील काही दृश्यांवर राज्यातील ब्राह्मण महासंघानेआक्षेप घेतला आहे. ब्राह्मण संघटनांकडून पोलीस आणि सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे ‘फुले’ चित्रपटात दाखवण्यात आलेली ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्ये हटवूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. दरम्यान, 'फुले' चित्रपटाबद्दल बोलताना प्रतिक गांधीने टीका करणाऱ्यांनी आधी चित्रपट तरी पहावा अशी विनंती केली आहे. चित्रपटामधील काही दृष्यांवर आक्षेप घेण्यात आला असून त्यामुळे या चित्रपटचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Demand Censor Pratik Gandhi Phule Movie Phule

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Malhar Certification: आम्ही हलाल मटणच विकणार; नितेश राणे यांना नाशिकच्या खाटीक समाजाचा जबरदस्त झटकाMalhar Certification: आम्ही हलाल मटणच विकणार; नितेश राणे यांना नाशिकच्या खाटीक समाजाचा जबरदस्त झटकामत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंना हिंदू खाटीकांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिंदूंना हिंदुंची मटणाची दुकानं ओळखायला मदत होईल असा दावा नितेश राणेंनी केला. मात्र, आम्हाला कुणाच्याही सर्टीफिकेटची गरज नसल्याची भूमिका नाशिकच्या खाटीक समाजाने घेतली आहे.
Read more »

Horoscope : डोळे झाकून विश्वास करणं बंद करा; आजचा दिवस खूप महत्त्वाचाHoroscope : डोळे झाकून विश्वास करणं बंद करा; आजचा दिवस खूप महत्त्वाचा16 मार्च 2025, रविवार आहे आणि तुम्हाला तुमचे दैनिक राशिभविष्य जाणून घ्यायचे आहे, तुमच्या राशीनुसार तुमचा दिवस कसा जाणार आहे. तर काळजी करू नका.
Read more »

उद्धव ठाकरेंनी खरंच नारायण राणेंना फोन केला? संजय राऊतांनी सांगून टाकलं, म्हणाले 'त्यांच्या कुटुंबातून...'उद्धव ठाकरेंनी खरंच नारायण राणेंना फोन केला? संजय राऊतांनी सांगून टाकलं, म्हणाले 'त्यांच्या कुटुंबातून...'Sanjay Raut on Narayan Rane: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका अशी विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन केला होता असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
Read more »

...म्हणून स्ट्राइक देऊन 97 रनवर खेळणाऱ्या श्रेयसला शतक पूर्ण करु दिलं नाही; शशांकचा खुलासा...म्हणून स्ट्राइक देऊन 97 रनवर खेळणाऱ्या श्रेयसला शतक पूर्ण करु दिलं नाही; शशांकचा खुलासाIPL 2025 Why PBKS Skipper Shreyas Iyer Missed Out Century: श्रेयस अय्यरने 42 बॉलमध्ये नबाद 97 धावा केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला शतक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र तसं काय घडलं नाही जाणून घ्या...
Read more »

सावित्रीबाई फुले का किरदार पर्दे पर निभाना बड़ी जिम्मेदारी थी : पत्रलेखासावित्रीबाई फुले का किरदार पर्दे पर निभाना बड़ी जिम्मेदारी थी : पत्रलेखासावित्रीबाई फुले का किरदार पर्दे पर निभाना बड़ी जिम्मेदारी थी : पत्रलेखा
Read more »

Mahatma Jyotiba Phule Jayanti: स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचे प्रेरणादायी विचारMahatma Jyotiba Phule Jayanti: स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचे प्रेरणादायी विचारआज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198 वी जयंती आहे. पुण्यातील फुले वाड्यात आज मोठ्या उत्साहात महात्मा फुले जयंती साजरी केली जाते. आजच्या दिवशी महात्मा फुलेंचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया.
Read more »



Render Time: 2026-04-02 04:37:46