'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी....', संजय राऊतांनी पुस्तकातून जाहीरपणे सांगून टाकलं, 'आमच्यात...'

Shivsena News

'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी....', संजय राऊतांनी पुस्तकातून जाहीरपणे सांगून टाकलं, 'आमच्यात...'
Sanjay RautMnsRaj Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 115 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 59%
  • Publisher: 63%

Sanjay Raut on Raj Thackeray: शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) नरकातला स्वर्ग या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut on Raj Thackeray : शिवसेना खासदार संजय राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत.

: शिवसेना खासदार संजय राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंबद्दल आपल्या मनातील एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत. संजय राऊतांच्या या विधानावर आता राज ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे. - राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांचे अनेक शिवसेना नेत्यांशी मैत्रीचे संबंध राहिले होते. परंतु त्यांनी बाळासाहेबांची साथ सोडून मनसेची स्थापना केल्यावर अनेकांसोबतचे मैत्रीचे संबंध दुरावले. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबाबतीतही तेच घडले. एकाच पक्षात असताना मैत्री होती,परंतु नंतर राजकारणात दोघांनीही एकमेकांवर टिकेचे प्रहार केले. तरीही त्यांच्यातील जिव्हाळा कायम होता. त्यामुळंच संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून ती सल बोलून दाखवली आहे."माझ्यावर आणि कुटुंबीयावर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, 'संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी!' खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नात कायम राहिलं आहे. आम्ही अनेक वर्ष जवळून काम केले. सुख-दुःख वाटलं. उलट या वेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती. मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा तरी ते फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही," असं संजय राऊत म्हणला आहेत.तुरूंगात जाण्याइतके माझ्यात बळ नाही. मला अटॅक येवून मी मरेन किंवा मला आत्महत्या तरी करावी लागेल असं हतबल होऊन रविंद्र वायकर बोलल्याचं संजय राऊतांनी आपल्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकात म्हटलं आहे. शिंदे गटाने दबाव टाकल्याने आणि भीतीने वायकर यांनी शिवसेना सोडल्याचा दावा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केला आगे. "वायकर शिंदे गटात गेले त्या क्षणीच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले गेले. याचा अर्थ वायकरांवरील गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता. वायकर शिवसेनेच्या निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदारांपैकी एक होते," असं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अचानक वायकर यांना टार्गेट करायला सुरुवात केली. रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवताच वायकर आणि त्यांच्या कुटुंबाची गाळण उडाली आणि त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडल्याचे पुस्तकात म्हटलं गेलं. या पुस्तकात ईडीचा गैरवापर करून वायकर यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले गेल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjay Raut Mns Raj Thackeray

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलंIPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलंMohammed Azharuddin : आयपीएल 2025 सुरु असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद अजहरुद्दीनला दणका देत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका स्टॅन्डवरून त्याचं नावं काढलं आहे.
Read more »

ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार? चर्चा सुरु असताना राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'अशी' सूचना!ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार? चर्चा सुरु असताना राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिली 'अशी' सूचना!Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणे शक्य असल्याचे विधान महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत केले. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंनीदेखील आपल्या भाषणातून याला प्रतिसाद दिला. यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले.
Read more »

विमान 30 हजार फूट उंचीवर असतानाच प्रवाशांचा मोठा गोंधळ, विमानाचे छत...; काळजाचा ठोका चुकवणारा Videoविमान 30 हजार फूट उंचीवर असतानाच प्रवाशांचा मोठा गोंधळ, विमानाचे छत...; काळजाचा ठोका चुकवणारा VideoAtlanta Airlines Latest News: विमान 30 फूट उंचीववर असताना अचानक प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read more »

'तू ज्याचं कौतुक करत आहेस ना तोच मला संघातून...,' चेतेश्वर पुजाराच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा 'त्याने फोनवर...''तू ज्याचं कौतुक करत आहेस ना तोच मला संघातून...,' चेतेश्वर पुजाराच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा 'त्याने फोनवर...'आपल्याला भारतीय संघातून वगळणार असल्याची चर्चा फोनवर सुरु असताना चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) ते ऐकलं होतं असा खुलासा त्याच्या पत्नीने केला आहे.
Read more »

Operation Sindoor: 'सिंदूर' नावावरुन राज ठाकरेंचा थेट PM मोदींवर निशाणा! म्हणाले, 'नावंबिवं देऊन...'Operation Sindoor: 'सिंदूर' नावावरुन राज ठाकरेंचा थेट PM मोदींवर निशाणा! म्हणाले, 'नावंबिवं देऊन...'MNS Chief Raj Thackeray Slams PM Modi: मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरच केली टीका
Read more »

'जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरेन... म्हणत वायकर मातोश्रीवर रडले' राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात मोठा दावा'जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरेन... म्हणत वायकर मातोश्रीवर रडले' राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात मोठा दावाSanjay Raut : खासदार रविंद्र वायकर याच्याबाबत संजय राऊतांनी केले मोठे गौप्यस्फोट. राजकीय वर्तुळात राऊतांच्या पुस्तकाचीच सर्वदूर चर्चा...
Read more »



Render Time: 2026-04-02 17:55:47