बांगलादेशची वेगवान गोलंदाज जहांआरा आलमने 2022 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकादरम्यान माजी निवडकर्ता मंजुरुल इस्लाम यांच्यावर वारंवार लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
महिला क्रिकेट विश्वचषक संपताच एका स्टार खेळाडूने केलेल्या आरोपांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांच्या त्रासानंतर, बांगलादेशची वेगवान गोलंदाज जहांआरा आलमने लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
माजी निवड समिती सदस्य मंजुरुल इस्लाम यांच्यावर तिने हे आरोप केले आहेत. मानसिक आरोग्यासाठी ब्रेक घेतलेल्या जहांआराने 2022 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकादरम्यान राष्ट्रीय संघ व्यवस्थापनाकडून तिला अश्लील प्रस्ताव कसे मिळाले हे उघड केलं आहे. खरं तर, बांगलादेशची माजी वेगवान गोलंदाज मंजुरुल हिच्यावरही जहांआराच्या कारकिर्दीत अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे कारण जहांआराने त्याचे अश्लील प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला होता. मला एकदा नाही तर अनेक वेळा याला सामोरे जावे लागले. निश्चितच, जेव्हा आपण संघाशी संबंधित असतो तेव्हा आपण इच्छा असूनही अनेक गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. जेव्हा तुमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, काही लोक तुम्हाला ओळखत असतात तेव्हा तुम्ही काही गोष्टींबाबत इच्छा असतानाही विरोध करु शकत नाही किंवा बोलू शकत नाही, असं जहांआराने गुरुवारी रियासत अझीमच्या यूट्यूब चॅनेलला सांगितलं.जहांआरा बांगलादेश बोर्डातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या प्रकरणी मदत मागण्याचा प्रयत्न केला. तिने असा दावा केला की महिला समितीच्या प्रमुख नादेल चौधरी देखील तिच्यावरील अत्याचार थांबवण्यात अपयशी ठरल्या. तसंच बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी अनेकदा तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं.2021 मध्ये, तौहिद भाईंनी बाबू भाईच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. मी हे यापूर्वीही अनेकदा सांगितलं आहे. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन का केलं हे मला माहित नाही. मी शांत राहण्याचा आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न केला. पण जेव्हा मी कुशलतेने प्रस्ताव टाळला तेव्हा दुसऱ्याच दिवसापासून मंजू भाईंनी मला अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली, असं जहांआरा व्हिडिओमध्ये म्हणाली.तौहिद भाई माझ्याशी कधीही थेट बोलले नाहीत. त्यांनी बाबू भाईंना पाठवले. सुमारे दीड वर्षानंतर, मी सीईओंना निरीक्षण पत्र सादर केले. मी त्यात तक्रार केली नाही, तर सर्व सविस्तपणे सांगितलं. बाबू भाईंनी मला तौहिद सरांची काळजी घेण्यास सांगितलं होते. पण मी उत्तर दिले, ते प्रभारी आहेत, माझ्याकडे काळजी घेण्यासारखे काय आहे? मी मुद्दाम प्रस्ताव समजत नसल्याचा आव आणला. मी हे शेअर करत आहे जेणेकरून इतर मुली देखील अशा प्रकारे स्वतःचे संरक्षण करू शकतील. तेव्हाच मंजू भाईंचे गैरवर्तन सुरू झालं, असा खुलासा तिने केला.2022 च्या विश्वचषकादरम्यान मंजू भाईंकडून दुसरा प्रस्ताव आला. मी गेल्या दीड वर्षात घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल बीसीबीला कळवण्याचा निर्णय घेतला. मी नादेल सरांना अनेक वेळा सांगितलं. त्यांना तातुरत्या वेळेसाठी थांबवलं, पण नंतर परिस्थिती पुन्हा तशीच झाली. मी सीईओंनाही कळवलं, असंही तिने सांगितलं. जहांआराने खुलासा केला की मंजुरुलला महिला खेळाडूंशी खूप जवळीक साधण्याची सवय होती. त्याच्या या सवयीमुळे अनेक महिला क्रिकेटपटू त्याला टाळू लागले.प्री-कॅम्प दरम्यान मी गोलंदाजी करत असताना, तो आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याला मुलींना जवळ ओढण्याची, आपल्या छातीवर ओढून घेण्याची आणि त्यांच्या कानाजवळ बोलण्याची सवय होती. आम्ही त्याला टाळायचो. सामन्यानंतर हस्तांदोलन करतानाही, तो आम्हाला आत ओढू नये म्हणून आम्ही लांबून हात पुढे करायचो. आम्ही घाबरून आपापसात विनोद करायचो, तो येत आहे, तो पुन्हा आपल्याला मिठी मारेल, असाही खुलासा तिने केला आहे. तिच्या आणि मंजुरुल यांच्यातील एका घटनेबद्दल सांगताना, जहांआरा म्हणाली की माजी निवडकर्ता तिच्या खूप जवळ आला आणि तिच्या मासिक पाळीबद्दल खूप अस्वस्थतेने विचारलं.एकदा तो माझ्या जवळ आला, हात धरला, खांद्यावर हात ठेवला आणि कानाजवळ येऊन विचारलं की, तुझी मासिक पाळी किती दिवसांपासून आहे? त्याला आधीच माहित होतं. कारण आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फिजिओ आरोग्याच्या कारणास्तव खेळाडूंच्या मासिक पाळीचा मागोवा घेतात. मला माहित नाही की मॅनेजर किंवा निवडकर्त्याला ती माहिती का हवी होती. जेव्हा मी म्हणाले, पाच दिवस, तेव्हा त्याने उत्तर दिले, पाच दिवस? ते कालच संपायला हवे होते. जेव्हा मासिक पाळी संपेल तेव्हा मला सांग. मला माझ्या संघाचीही काळजी घ्यावी लागेल. मी फक्त त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, माफ करा, भैया, मला समजलं नाही.Cricbuzz मधील एका वृत्तानुसार, मंजुरुलने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि ते निराधार असल्याचे म्हटले आहे. ते निराधार असल्याचे सांगण्याशिवाय मी काय बोलू शकतो. तुम्ही इतर क्रिकेटपटूंना विचारू शकता की मी चांगला होतो की वाईट, असं मंजुरुल म्हणाले. बाबू यांनी तिने संपूर्ण कथा रचली असल्याचा दावा केला आहे. ती एका मृत माणसाला ओढत आहे हे दुर्दैवी आहे. मला फक्त तिने निराधार आरोप करण्याऐवजी पुरावे द्यावेत असे वाटते, असं ते म्हणाले आहेत.दरम्यान, बांगलादेश बोर्डाने आरोपांची दखल घेतली आहे. आरोप खूप गंभीर आहेत, त्यामुळे आम्हाला बैठक घेऊन आमची पुढील कारवाई काय असावी हे ठरवावे लागेल आणि गरज पडल्यास आम्ही निश्चितच चौकशी करू, असं बीसीबीचे उपाध्यक्ष शाखावत हुसेन म्हणाले आहेत.
Jahanara Alam Sexual Harassment Manjurul Islam Period
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासाT20 WC : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय.
Read more »
पंड्या का कैच तो कुछ भी नहीं... राधा यादव को देखकर हैरान रह जाओगे, VIDEOमहिला T20 WC 2024 में श्रीलंका के खिलाफ मैच में राधा यादव ने श्रीलंकाई बल्लेबाज विशमी गुणरत्ने का शानदार कैच लपका.फैन्स इसका कंपैरिजन हार्दिक पंड्या के कैच से कर रहे हैं.
Read more »
IND vs NZ: 'मैं बस यही चाहता हूं कि...', क्या साल 2027 विश्व कप खेलेंगे रोहित शर्मा? हिटमैन ने बता दी अपनी खवाहिशRohit Sharma on ODI WC 2027: रोहित ने चैंपियंस ट्रॉफी के फाइनल में न्यूजीलैंड के खिलाफ 76 रनों की पारी खेली थी.
Read more »
MDU में महिला स्टाफ से मांगे पीरियड्स के सुबूत, हंगामे के बाद रिपोर्ट तलब‘फोटो खींचकर दो...’, हरियाणा की MDU यूनिवर्सिटी में महिला स्टाफ से मांगे पीरियड्स के सबूत, कपड़े उतरवाए...हंगामे के बाद WC ने मांगी रिपोर्ट
Read more »
'WC सुरु असताना मला खोलीत बोलावून कानाखाली मारली...', 'या' संघाच्या कर्णधारावर गंभीर आरोप, बोर्डाने दिलं स्पष्टीकरणCaptain accused of slapped player during world cup: महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिच्यावर संघाच्या वेगवान गोलंदाजाने खेळाडूंवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. बोर्डाने या आरोपांना उत्तर दिले आहे.
Read more »
'अब तुम्हें हर रोज देखूंगी', WC के बाद कप्तान हरमनप्रीत कौर ने बनवाया खास टैटूहरमनप्रीत कौर ने वर्ल्ड कप जीत के बाद अपनी बाजू पर ट्रॉफी का टैटू बनवाया है. टैटू उनके करियर की सबसे बड़ी उपलब्धि और वर्षों के संघर्ष की याद का प्रतीक है.भारत ने दक्षिण अफ्रीका को फाइनल में 52 रनों से हराया, इससे पहले सेमीफाइनल में ऑस्ट्रेलिया को हराया था.
Read more »
