'मला नाही वाटत विराट आणि रोहित...'; गावसकरांचं रोठठोक भाकित; प्रत्येक क्रिकेट चाहत्याला बसेल धक्का

Sunil Gavaskar News

'मला नाही वाटत विराट आणि रोहित...'; गावसकरांचं रोठठोक भाकित; प्रत्येक क्रिकेट चाहत्याला बसेल धक्का
Virat KohliRohit SharmaVirat Kohli ODI Future
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 124 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Sunil Gavaskar On Rohit Sharma Virat Kohli: विराट आणि रोहित या दोघांनी दोन आठवड्यांमध्ये एकामागोमाग एक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Sunil Gavaskar On Rohit Sharma Virat Kohli : विराट आणि रोहित या दोघांनी दोन आठवड्यांमध्ये एकामागोमाग एक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मासंदर्भात सूचक विधान केलं आहे.

दोन आठवड्यांमध्ये या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गावसकरांनी या दोघांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील करिअरसंदर्भात भाष्य केलं आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांसाठी जाण्याच्या काही दिवस आधीच विराट आणि रोहितने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी विराट आणि रोहितने कसोटीमधून निवृत्ती घेतली. मागील वर्षी भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोघांनी एकाच दिवशी अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटलाही राम-राम केला होता. आता हे दोघे केवळ 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सक्रीय दिसणार आहेत. दोघांनाही 2027 चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे.भारताने नुकत्याच जिंकलेल्या 50 ओव्हर फॉरमॅटमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये विराट आणि रोहितने म्हत्त्वाचं योगदान दिलेलं. विराटने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केलेली तर रोहितने न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसं काढत भारताला विजय मिळवून दिलेला. त्यामुळे हे दोघे किमान एकदिवसीय क्रिकेटमध्ये तरी 2027 पर्यंत खेळतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे. मात्र या चाहत्यांना निराश करणारं विधान गासकरांनी केलं आहे. रोहित आणि विराट 2027 च्या वर्ल्डकपमध्ये खेळतील का याबद्दल बोलताना गावकरांनी त्यावेळी या दोघांचंही वय हा फार मोठा निर्णय फॅक्टर ठरणार आहे, असं म्हटलंय. निवड समितीही या दोघांच्या वयाचा विचार त्यांची निवड करताना नक्की करेल, असंही गावसकरांनी म्हटलं आहे."विराट आणि रोहित दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधील मोठे खेळाडू आहेत. 2027 वर्ल्ड कपचा विचार करताना निवड समिती यापुढे संघ निवडेल. या दोघांच्या निवडीचा विचार करताना निवड समिती नक्कीच हे दोघे 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये संघात राहू शकतील का? हे नक्की तपासून पाहतील. हे दोघे ज्या पद्धतीचं योगदान आता देत आहेत तसं ते त्यावेळी देऊ शकतील का? याचाही विचार होईल. हा निवड समितीसाठी फार कठीण निर्णय राहणार हे निश्चित. निवड समितीला वाटलं की दोघेही खेळू शकतात तर नक्कीच हे दोघे आपल्याला संघात पाहायला मिळतील," असं गावसकरांनी 'स्पोर्ट्स टुडे'शी संवाद साधताना म्हटलंय.मात्र वैयक्तिक स्तरावर मत व्यक्त करताना गावसकरांनी, मला नाही वाटत रोहित आणि विराट दोघेही 2027 चा वर्ल्ड कप खेळतील, असं विधान केलं आहे."मला नाही वाटत ते 2027 चा वर्ल्ड कप खेळतील. मी फार प्रमाणिकपणे हे सांगतोय. मात्र कोणास ठाऊक ते पुढल्या वर्षी आणि त्यानंतरही उत्तम कामगिरी करत राहिले आणि त्यांनी शतकांमागून शतकं लगावली तर देवही त्यांना संघातून वगळू शकणार नाही," असं गावसकर म्हणाले. विराटने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यापूर्वीच जवळपास आठवडाभर आधी रोहितने या दिर्घ फॉरमॅटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलेलं.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Virat Kohli Rohit Sharma Virat Kohli ODI Future Rohit Sharma ODI Future 2027 World Cup

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'फक्त माझा बळी...', बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासले पोलिसांना शरण जाणार; धनंजय मुंडेंबाबत नवा गौप्यस्फोट, 'लवकरच...''फक्त माझा बळी...', बीडचा निलंबित अधिकारी रणजीत कासले पोलिसांना शरण जाणार; धनंजय मुंडेंबाबत नवा गौप्यस्फोट, 'लवकरच...'निलंबित आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेने मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा केला होता.
Read more »

'अशी दादागिरी चालणार नाही', चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी, बाधित म्हणाले 'तुम्हाला टाहो फोडून''अशी दादागिरी चालणार नाही', चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी, बाधित म्हणाले 'तुम्हाला टाहो फोडून'शक्तीपीठावरून शेतकरी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. संतप्त शेतकऱ्यांनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात आंदोलन केलं.
Read more »

रोहित शर्मा ने क्या वनडे क्रिकेट से भी रिटायरमेंट ले लिया है? उन्होंने रिटायरमेंट स्पीच में खोला राजरोहित शर्मा ने क्या वनडे क्रिकेट से भी रिटायरमेंट ले लिया है? उन्होंने रिटायरमेंट स्पीच में खोला राजरोहित शर्मा ने टेस्ट क्रिकेट से रिटायरमेंट का ऐलान कर दिया है। रोहित शर्मा ने इसी बीच वनडे क्रिकेट को लेकर भी अपनी रिटायरमेंट स्पीच में एक बड़ा ऐलान किया है।
Read more »

India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...Ind-Pak War Indians Refuse to Travel: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस आणि बूकिंग या रद्द केल्या आहेत.
Read more »

Operation Sindoor अतर्गंत DGMO ने दाखवलं पाकिस्तानमधील विध्वंसाचे पुरावे; सरगोधा, नूर खानसह उद्ध्वस्त केले तळ, पाहा Satellite PhotoOperation Sindoor अतर्गंत DGMO ने दाखवलं पाकिस्तानमधील विध्वंसाचे पुरावे; सरगोधा, नूर खानसह उद्ध्वस्त केले तळ, पाहा Satellite PhotoPakistan Airbase Satelite Imgae : गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव थोडा कमी झाला आहे. पण, ते अजून संपलेले नाही.
Read more »

बड़ी खबर LIVE: विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट से लिया संन्यास, 14 साल लंबे करियर को दिया विरामबड़ी खबर LIVE: विराट कोहली ने टेस्ट क्रिकेट से लिया संन्यास, 14 साल लंबे करियर को दिया विरामरोहित शर्मा के बाद अब विराट कोहली ने भी टेस्ट क्रिकेट से संन्यास की घोषणा की है।
Read more »



Render Time: 2026-04-02 04:53:13