Ravindra Chavan Letter to Election Commission: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपली नाराजी जाहीर केली आहे.
Ravindra Chavan Letter to Election Commission: निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरपालिका सदस्यांची निवडणूक लांबणीवर गेल्याने भाजपा चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणूक रद्द केल्याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी बोलून दाखवली आहे. स्थगिती आणलेल्या जागांची निवडणूक रद्द करणे अयोग्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य असल्याचं भाजपचं मत आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, मात्र नुकत्याच काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये राज्यातील जवळपास 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरसेवक पदांची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे याठिकाणी गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक 1966 मधील नियम 17 आणि राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी काढलेले सहपत्र आणि 29 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेले सुधारित निर्देश यामधील समन्वयाचा अभाव राज्य निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावा असं आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, मात्र नुकत्याच काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये राज्यातील जवळपास २४ नगराध्यक्ष आणि २०४ नगरसेवक पदांची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे… pic.twitter.com/oUNFSiKwkl— Ravindra Chavan December 1, 2025ज्या ठिकाणी अपीलाचा निर्णय 26 नोव्हेंबर 2025 च्या नंतर लागला आहे, किंवा उमेदवार स्वतः शपथपत्र देत असेल, त्याठिकाणी सर्व बाबींचा विचार करून निवडणुका स्थगित न करता सुरु ठेवाव्यात, जेणेकरून राज्यातील सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. कुठे संपूर्ण निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार?पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात, किती प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या?जिल्हा व नगरपालिका/पंचायतींचा प्रभागपुणे : दौंड- प्रभाग ९अ , लोणावळा - ५ब, १०अ , तळेगाव : २अ, ७अ, ७ब, ८अ, ८ब, १० सातारा : कराड प्रभाग १५ब , मलकापूर - ४अ, ८अ सांगली : शिराळा - प्रभाग ४सोलापूर : सांगोला : प्रभाग १ अ, ११अ , मोहोळ ३अ यवतमाळ : दिग्रस प्रभाग २ब, ५ब, १०ब , पांढरकवडा ८ अ, ११ ब , वणी - १४ अ वाशिम : रिसोड - ५ब, १०अगडचिरोली : गडचिरोली- १ अ,४ब, ११ ब , आरमोरी प्रभाग १० चंद्रपूर : गडचांदूर - प्रभाग ८ब , मूल- १०ब , बल्लारपूर - ९अ , वरोरा ७ब गोंदिया : गोंदिया-३ब, ११ब, १६अभंडारा : भंडारा १५अ, १२अ नागपूर : कोंढाळी- प्रभाग ८, १६ , कामठी १०अ, ११३, १७ब , रामटेक ६अ , नरखेड २ब, ५ब, ७अ वर्धा : वर्धा - प्रभाग श्व, १९ब , हिंगणघाट ५अ, ५३, ९अ , पुलगाव २अ, ५अ बुलढाणा : खामगाव - प्रभाग ५अ, ७अ, २ब, १६ब , शेगाव -४अ, ४ब , जळगाव जामोद -प्रभाग ६अ, ६ब, ७ब जळगाव अमळनेर १अ , सावदा २ब, ४ब, १०८ , यावल ८ब , वरणगाव १०अ, १०क , पाचोरा ११अ व १२ब , भुसावळ ४ब, ५ब, ११ब नाशिक सिन्नर प्रभाग २अ, ४अ, ५अ, १०ब , ओझर १अ, ८ब , चांदवड प्रभाग ३ अहिल्यानगर जामखेड प्रभाग २ब, ४ब , श्रीगोंदा - ७ब , राहुरी २अ , संगमनेर -१ब, रब, १५ब , श्रीरामपूर ३अ , शेवगाव- १ब, ५अ, १२अ , शिर्डी : ६अ हिंगोली : हिंगोली ५ब, ११बपरभणी : जिंतूर - ११क , पूर्णा : १ब, १०ब नांदेड : भोकर - प्रभाग पब , कुंडलवाडी - ३अ , लोहा ५८ बीड : धारूर प्रभाग १०अ , अंबाजोगाई - पब, ३अ, ६अ, १०ब , परळी ९अ, १४ब, ३अ आणि ब, ११ब धाराशिव : धाराशिव - प्रभाग २अ, ७ब, १४ब छत्रपती संभाजीनगर : वैजापूर -प्रभाग १अ, २ब , गंगापूर ४ब, ६ब , पैठण ३अ, ६ब, ६अ, ११ब ठाणे : बदलापूर प्रभाग ५, ८, १०, १५, १७, १९ , वाडा प्रभाग क्र.१२ पालघर : पालघर पूर्व - प्रभाग १ब
Ravindra Chavan रवींद्र चव्हाण भाजपा Local Body Election स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जम्मू-कश्मीर चुनाव को लेकर इलेक्शन कमीशन की प्रेस कॉन्फ्रेंस आज: कल पॉलिटिकल पार्टी के साथ मीटिंग की थी, दल...Jammu Kashmir Assembly Election 2024; Election Commission Press Conference Update.
Read more »
रामदास कदमांच्या उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या, 40 वर्षात एकतरी काम केलेलं दाखवा- रविंद्र चव्हाण संतापलेRavindra Chavan on Ramdas Kadam: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Read more »
Maharashtra: पूर्व सीएम चव्हाण का दावा- हरियाणा और महाराष्ट्र में होगा सत्ता परिवर्तन, भाजपा पर साधा निशानाMaharashtra: पूर्व सीएम चव्हाण का दावा- हरियाणा और महाराष्ट्र में होगा सत्ता परिवर्तन, भाजपा पर साधा निशाना Prithviraj Chavan says Maharashtra, Haryana election results will impact Modi govt's stability
Read more »
Mamata Banerjee: অবিলম্বে SIR বন্ধ করুন, মুখ্য নির্বাচন কমিশনারকে চিঠি মুখ্যমন্ত্রীরর!CM Mamata Banerjee writes a letter to Chief Election commission to stop SIR Immediately
Read more »
रवींद्र चव्हाणांमुळे युती तुटली, निलेश राणेंचा आरोप, कोकणात महायुतीत नेमकं काय सुरूये?Ravindra Chavan : कणकवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांमुळे युती तुटली असा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलाय.
Read more »
SIR in Bengal: বাবা কথা বলছে না, সাড়া দিচ্ছে না... SIR-এর চাপ! কাজ করতে করতেই ব্রেন স্ট্রোক, আশঙ্কাজনক নামখানার BLO...SIR in Bengal: Namkhana BLO brain stroke SIR controversy Election Commission West Bengal Assembly Election 2026
Read more »
