Ravindra Chavan on Ramdas Kadam: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Ravindra Chavan on Ramdas Kadam : रामदास कदमांच्या आरोपांना आता रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.कोकणात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगले वातावरण नसल्याचे चित्र दिसून आलंयशिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रविंद्र चव्हाण यांची तक्रार करणारे पत्र पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे. यावर आता रविंद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.राष्ट्रीय महामार्ग हे खातं नितीन गडकरी यांचे आहे. कोकणचा सुपुत्र म्हणून यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न मी करतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांच्या मतदार संघात ह सरकारच्या माध्यमातून मी हजारो कोटींचा निधी त्यांच्या मतदारसंघात दिलाय. यासाठी त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत. मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढच सांगेन, मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला तयार आहे. भाजप म्हणून मी सौजन्याने वागतोय.उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री होते. कधी कोणतं काम केलं? 35-40 वर्षात काय काम केलं? त्यांनी एक काम केलेलं दाखवाव. उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या करतात. उद्धव ठाकरे त्यांना उगीच महत्व देत होते. आता ते चालणार नाही, असा पलटवार रवींद्र चव्हाणांनी केला. सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून मी काम केलंय. युतीधर्म पाळण्याचा अधिकार फक्त एकट्या रविंद्र चव्हाणांच नाही. युतीधर्म त्यांनी देखील पाळायला हवे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा थेट हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय.. देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली. तर दापोलीमध्ये भाजप कार्यकर्ते सहकार्य करत नासल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासाठी फडणवीसांकडं तक्रार केल्याचंही त्यांनी म्हटलंय.कोकणातील रस्त्यांवरून रामदास कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय.. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाहीय. चाकरमान्यांचे हाल होतायत. समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. रविंद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. अशी टीका रामदास कदमांनी केली. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून माझी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांना मी हे पत्र देईन. ते काय कार्यवाही करतात ते पाहीन. 2019 मध्ये युती असताना दापोलीच्या भाजपच्या लोकांनी माझ्या मुलाला मतदान केलं नाही. ही बाब मी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिली. पण यात काही फारसा बदल झालेला दिसत नाही. मुंबई-गोवा महामार्गामुळे आमचे हाल होतायत. आम्ही काय पाप केलंय? 14 वर्षे का लागतात? याचं उत्तर आम्हाला कोण देईल? आमच्या व्यथा आम्ही कुठे मांडायच्या? रविंद्र चव्हाण हा माणूस युती कशी तुटेल हे पाहतोय. आमच्या जिल्ह्यात येतात पण शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी माझ्याशी कधीच संपर्क साधला नाही, असे रामदास कदम म्हणाले.महाराष्ट्रकोळी बांधव आणि नारळी पौर्णिमेचं नातं काय? कोळी महिला उधाणल...
Ravindra Chavan Vs Ramdas Kadam Ravindra Chavan M Ravindra Chavan On Konkan Ravindra Chavan On Shivsena Shinde Group Ramdas Kadam Shivsena Vs Bjp
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पूजा खेडकरमुळे आणखी एक IAS महिला अधिकारी वादात; म्हणाली, 'विमान कंपन्या दिव्यांगांना...'Pooja Khedkar Case Lady IAS Officer Comment: मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा असतानाच एका महिला अधिकाऱ्याने यासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.
Read more »
पूजा खेडकरमुळे दिव्यांगांवर शंका घेणं महिला IAS अधिकाऱ्याला महागात पडलं; थेट राष्ट्रीय...Pooja Khedkar Case Police Complaint Against IAS officer: पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच या महिला अधिकाऱ्याने केलेलं विधान आता तिच्या अंगलट येणार असं चित्र पाहायला मिळत आहे.
Read more »
या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
Read more »
'वजन नियंत्रणात ठेवणं हे मेडिकल टीमचं काम नसून...'; विनेश प्रकरणी PT Usha यांचा U-Trun?PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा म्हणून पीटी उषा कार्यरत असून त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.
Read more »
भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया विधानसभा निवडणुक लढवणार? मतदार संघ कोणता? तिकीट कोण देणार?भाजप खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल आहे.
Read more »
पुणे एसटी स्टॅण्डवरुन हायकोर्ट संतापले; गिरगावकरांना पुण्याची ST पकडायला वाशीला पाठवणार का?Shivneri Bus Pune to Mumbai : पुण्याला शिवनेरी पकडायची असेल तर आपण दादर गाठतो. दादर ब्रीजखाली मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड आहे. पण हे स्टॅण्ड बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने एसटी महामंडळाला नोटीस पाठवली आहे. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलंय.
Read more »
