Sunny Deol Angry On Media Video: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून सदर व्हिडीओ धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घराच्या प्रवेशद्वारावर शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...
Sunny Deol Angry On Media Video: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने रुग्णालयात दाखल होते. मुंबईतील महालक्ष्मी परिसरात असलेल्या ब्रिच कॅण्डी येथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर बुधवारी धर्मेंद्र यांना घरी सोडण्यात आलं आहे.
त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसंदर्भात अफवा उठवल्या जात असून काही प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाच्या बातम्याही चालवल्या. यावरुन सोशल मीडियावर असंवेदनशीलतेवरुन निशाणा साधण्यात आलेला असतानाच आता या खोट्या बातम्यांवरुन सनी देओल थेट पत्रकारांवर संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. अफवांमुळे कुटुंब वैतागलंधर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या मुंबईतील घरी उपचार सुरु असतानाच त्यांच्या घराबाहेर पापराझींनी गर्दी केली आहे. येणाऱ्या, जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर या पापाराझींची नजर असून सेलिब्रिटी दिसताच ते फोटो क्लिक करताना दिसतात. देओल कुटुंबातील सदस्य असो किंवा धर्मेंद्र यांना भेटायला येणारं इतर कोणी असो धर्मेंद्र यांच्या घराबाहेर जवळपास 24 तास पापाराझींची हजेरी दिसत आहे. एकीकडे खोट्या बातम्या पेरल्या जात असतानाच दुसरीकडे अशाप्रकारे घरावर 24 तास लक्ष असल्याने देओल कुटुंबही संतापलं आहे. स्वत: हेमामालिनी यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन धर्मेंद्र यांच्यासंदर्भातील मृत्यूच्या खोट्या बातम्यांवरुन संताप व्यक्त केला. ईशा देओलनेही वडिलांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.सीन देओलने दिली शिवीअसं असतानाच आता सनी देओल पापराझींवर संतापल्याचं दिसत आहे. घराच्या बाहेर उभ्या असलेल्या पाराराझींना पाहून घरात प्रवेश करण्याआधी सनी काही क्षण थांबला. त्याने पापाराझींकडे पाहून हात जोडले आणि नंतर मोठ्याने अगदी काही अंतरावर उभ्या असलेल्या पापराझींनी ऐकू जाईल एवढ्या आवाजात त्याने सुनावलं. संपालेल्या सनीने पापाराझींना एक शिवीही हासडल्याचं दिसून आलं. तुमच्या घरात पण आई-वडील आहेत. तुमच्या घरातही मुलं आहेत. तो पाहा *** व्हिडीओ काढतोय. लाज नाही का वाटत? अशा शब्दांमध्ये सनी देओलने संताप व्यक्त केला. हात जोडून काही क्षण उभा राहिल्यानंतर तो तिथून निघून गेला. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. विलर बियानीच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी पापाराझींना असं सुनावण्याची गरज आहेच असं म्हणत सनीचं समर्थन केलं आहे. View this post on Instagram A post shared by Viral Bhayani अमिताभ स्वत: कार चालवत पोहोचलेदरम्यान, अमिताभ बच्चन हे स्वत: कार चालवत धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. सामान्यपणे अमिताभ या वयामध्ये स्वत: कार चालवताना दिसत नाहीत. असं असलं तरी जिगरी दोस्ताच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते मंगळवारी रात्री अचानक धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचले होते.
Angry Media Dharmendra Death Hoax News Abuse Paparazzi Video Viral
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जयमाला के समय टूटा स्टेज, पंडित के साथ दूल्हा-दुल्हन भी जमीन पर गिरे, रिश्तेदारों में मच गई चीख पुकारWedding Funny AI Video: डेली सोशल मीडिया पर कितनी सारी AI वीडियो वायरल होती रहती हैं, ऐसी ही एक Watch video on ZeeNews Hindi
Read more »
दिल्ली: कार विस्फोट का नया फुटेज, जोरदार धमाके से हिली दुकान और इमारतें, जान बचाने के लिए मची अफरा-तफरीDelhi Blast CCTV Video: दिल्ली के लाल किले के पास हाल ही में हुए कार विस्फोट का एक नया फुटेज सोशल Watch video on ZeeNews Hindi
Read more »
China: पहाड़ खिसकने से हुआ भयानक हादसा, कुछ ही समय में खुला होंगकी पुल ताश के पत्तों की तरह बिखरा, वीडियो देखेंChina Bridge Collapsed Video: चीन के सिचुआन में हाल ही में खुला हुआ होंगची ब्रिज लैंडस्लाइड की वजह Watch video on ZeeNews Hindi
Read more »
67 साल की दादी ने तेरे हवाले सॉन्ग पर अनारकली सूट पहन किया शानदार डांस, स्टेप्स देख जनता ने बांध दिए तारीफों के पुल!Dadi dance Video: इंटरनेट पर वायरल हुआ 67 साल की दादी का जबरदस्त डांस वीडियो, जिसमें वो अनारकली सूट Watch video on ZeeNews Hindi
Read more »
भोजपुरी एक्ट्रेस Monalisa ने पल्लू लहराते हुए बॉलीवुड गाने पर किया कमाल का डांस, अदाओं ने बढ़ाई फैंस की क्रेजीनेस!Monalisa Dance Video: भोजपुरी एक्ट्रेस मोनालिसा अक्सर अपने डांस के वीडियो को सोशल मीडिया पर फैंस के Watch video on ZeeNews Hindi
Read more »
पुराने गाने दिलबर पर 6 साल की बच्ची ने किया जोरदार डांस, क्यूट से एक्सप्रेशंस देख यूजर्स हुए फैन, छाया वीडियोLittle Girl Dance Video: डेली सोशल मीडिया पर कितनी सारी बच्चों के डांस की वीडियो वायरल होती हैं. Watch video on ZeeNews Hindi
Read more »
