'जरांगे कारखानदाराचा मुलगा...'; मराठा आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट, 'प्रत्येक आमदाराने 10 ते 15 लाख...'

Laxman Hake News

'जरांगे कारखानदाराचा मुलगा...'; मराठा आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट, 'प्रत्येक आमदाराने 10 ते 15 लाख...'
Sharad PawarUddhav Thackerayलक्ष्मण हाके
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 170 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 88%
  • Publisher: 63%

Laxman Hake Allegations over Pawar Thackeray: मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय आणि उद्धव ठाकरेंचे आमदार रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. एकेका आमदाराने 10 ते 15 लाख रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Laxman Hake Allegations over Pawar Thackeray: मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय रसद पुरवतात आणि त्यांचे आमदारही पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. उद्धव ठाकरे ंचे आमदारही मराठ्यांना रसद पुरवतात.

एकेका आमदाराने 10 ते 15 लाख रुपये दिल्याचा आरोप, लक्ष्मण हाकेंनी केला आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमात ते बोलत होते. तुम्ही कायदेशीर आव्हान का देत नाही? अशी विचारणा केली असता लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिलं की, कायद्याने आम्ही आव्हान देऊच. सामान्य नागरिकही आव्हान देईल. आमची कायदेशीर टीम ते करेल. पण प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागायची का? तुम्ही असे बेजबाबदारपणे वागणार का?अजित पवारांचे आमदार जरांगे पाटलाला रसद, डिझेल, गाड्या, माणसं पुरवतातपुढे ते म्हणाले की, तुम्ही मंत्रिपदाची, मुख्यमंत्रीपदाची, विधानसभेची शपथ घेताना मी या महाराष्ट्रामधील समाज, त्यांच्या हक्कांबद्दल ममत्वभाव, आकस बाळगणार नाही हा शपथेचा अर्थ असतो. अजित पवारांचे आमदार मात्र जरांगे पाटलाला रसद, डिझेल, गाड्या, माणसं पुरवतात. शरद पवार जाऊन त्या बेकायदेशीर मागणीचं समर्थन करतात. रोहित पवारांची आयटी सेल रात्रंदिवस त्यांना मदत करते. तीच सगळी लोक मुंबईत येतात. मुंबईत आल्यानंतर सुप्रिया सुळेंपासून, बंडू जाधवापासून अंबादास दानवेंपर्यंत तिथे जाऊन बसतात. या माणसांना बेकायदा मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या बाबतीत काय घडू शकतं?.अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार हे सर्वजण रसद पुरवतात. मी फिल्डवर असून गावोगावी जातो. मला सांगितलेलं आहे. त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं आहे. बजरंग सोनावणेंची स्टेटमेंट समोर ठेवू शकतो. अजित पवारांचे आमदार विजय सोळंकी आणि विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंसोबत असल्याचं सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.जरांगे काय कारखानदाराचा, आमदार, खासदाराचा मुलगा आहे का?पुढे ते म्हणाले, ते मुंबईपर्यंत कसे येतात? मुंबईपर्यंत गाड्या कशा येतात? त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? त्याला डिझेल कुठून येतं? मनोज जरांगे काय कारखानदाराचा, आमदार, खासदाराचा मुलगा आहे का? या सर्व गोष्टी हालतात कुठून? कार्यकर्ते तर यामागे आहेच पण एका एका आमदाराने 10 ते 15 लाख दिल्याची जनतेत चर्चा आहे.GR काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाहीमराठा आरक्षणाचा GR काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाही, तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तो नसल्याचा घणाघात, लक्ष्मण हाके यांनी केला आहे. हा जीआर घटनाविरोधी असून, हा जीआर ओबीसींचं आरक्षण संपवणारा आहे. मराठ्यांचं कुणबीकरण सुरू आहे त्याला हा जीआर म्हणजे बुस्टर डोस असल्याची टीका, लक्ष्मण हाके यांनी केली आहे. यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये उरलासुरला मराठा ओबीसीमध्ये सामील झालेला असेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. FAQ1) लक्ष्मण हाके कोण आहेत?लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रातील ओबीसी कार्यकर्ते आहेत. ते बहुजन विकास आघाडी सारख्या पक्षांशी संबंधित असून, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आंदोलने करतात. ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले होते. सध्या ते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय आहेत आणि मराठा आरक्षण आंदोलकांशी वादग्रस्त राहिले आहेत.2) त्यांची राजकीय कारकीर्द काय आहे?२०१९ मध्ये, लक्ष्मण हाके यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, हाके लक्ष्मण सोपान यांनी मधा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून भाग घेतला. ते ४६ वर्षांचे असून, पदवीधर शिक्षण असलेले आणि व्यवसायाने व्यावसायिक आहेत. त्यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे.3) त्यांचे आर्थिक स्वरूप काय आहे?२०२४ च्या निवडणूक प्रतर्थनानुसार, हाके यांच्याकडे सुमारे १.१ कोटी रुपयांचे मालमत्ता आहेत, ज्यात २०.१ लाख रुपयांचे चल मालमत्ता आणि ८५ लाख रुपयांचे अचल मालमत्ता यांचा समावेश आहे. त्यांच्यावर ४२ लाख रुपयांचे कर्ज आहे. वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Uddhav Thackeray लक्ष्मण हाके उद्धव ठाकरे शरद पवार

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

छत्तीसगढ़ में सुरक्षाबलों को मिली बड़ी सफलता, 1 करोड़ के इनामी बालकृष्ण समेत 10 नक्सली ढेरछत्तीसगढ़ में सुरक्षाबलों को मिली बड़ी सफलता, 1 करोड़ के इनामी बालकृष्ण समेत 10 नक्सली ढेरChhattisgarh : security forces killed 10 Naxalites including Balkrishna with a reward of 1 crore, छत्तीसगढ़ में सुरक्षाबलों को मिली बड़ी सफलता, 1 करोड़ के इनामी बालकृष्ण समेत 10 नक्सली ढेर
Read more »

ஆசிய கோப்பையில் முறியடிக்க முடியாத 10 சாதனைகள்.. விராட் கோலி 183 நியாபகம் இருக்கா?ஆசிய கோப்பையில் முறியடிக்க முடியாத 10 சாதனைகள்.. விராட் கோலி 183 நியாபகம் இருக்கா?Unbreakable records in Asia Cup: ஆசிய கோப்பையில் முறியடிக்க முடியாத 10 சாதனைகள் என்னென்ன?
Read more »

भारत का रियल एस्टेट बाजार 2047 तक 10 ट्रिलियन डॉलर तक पहुंचने का अनुमान : रिपोर्टभारत का रियल एस्टेट बाजार 2047 तक 10 ट्रिलियन डॉलर तक पहुंचने का अनुमान : रिपोर्टभारत का रियल एस्टेट बाजार 2047 तक 10 ट्रिलियन डॉलर तक पहुंचने का अनुमान : रिपोर्ट
Read more »

10 हजार से 15 हजार तक का बिल हर महीने, फिर भी पानी नहीं! किरायेदार की मुसीबत ने खोला सिस्टम का सच10 हजार से 15 हजार तक का बिल हर महीने, फिर भी पानी नहीं! किरायेदार की मुसीबत ने खोला सिस्टम का सचViral Reddit Post: बेंगलुरु के एक शख्स ने सोशल मीडिया पर अपना दुख शेयर किया है. उनका कहना है कि उनके मकान मालिक हर महीने BWSSB का बेहद भारी-भरकम पानी का बिल थमा देते हैं. रेडिट पर उन्होंने एक पोस्ट शेयर की, जिसमें करीब 1,65,000 लीटर पानी का बिल 15,800 रुपये दिखाया गया.
Read more »

बाथरूम में सीक्रेट रास्ता और 10 लाख के बदले 15 लाख के नोट! गाजियाबाद से पकड़ा ऐसा गैंग, जानकर खा जाएंगे गच्चाबाथरूम में सीक्रेट रास्ता और 10 लाख के बदले 15 लाख के नोट! गाजियाबाद से पकड़ा ऐसा गैंग, जानकर खा जाएंगे गच्चाUP News: नोएडा एसटीएफ ने गाजियाबाद के गौर सिद्धार्थम सोसाइटी में छापेमारी कर ऑनलाइन ठगी के एक बड़े गिरोह का पर्दाफाश किया है। इस कार्रवाई में बिहार के 6 आरोपियों को गिरफ्तार किया गया है।
Read more »

Telengana School Boy death case: স্কুলের মাঠে বন্ধুদের সঙ্গে দাঁড়িয়েছিল ক্লাস X-এর জয়ন্ত, ধপ করে পড়েই শেষ! শকিং VDO...Telengana School Boy death case: স্কুলের মাঠে বন্ধুদের সঙ্গে দাঁড়িয়েছিল ক্লাস X-এর জয়ন্ত, ধপ করে পড়েই শেষ! শকিং VDO...Telangana Shocker Class 10 Student Collapses Dies After Ear & Nose Bleeding On School Ground VIDEO Surfaces
Read more »



Render Time: 2026-04-02 15:04:22