'जगाला मोदी नकोत!' पाकिस्तानचं नाव घेत ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'मोदींची ‘विश्वगुरू’ प्रतिमा ही फक्त...'

Ignoring News

'जगाला मोदी नकोत!' पाकिस्तानचं नाव घेत ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'मोदींची ‘विश्वगुरू’ प्रतिमा ही फक्त...'
PM ModiStrengthening PakistanInternational
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 243 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 114%
  • Publisher: 63%

Shivsena Slams PM Modi: भारताची पत मोदी यांच्या काळात घसरणीला लागली आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणे भारताला कमजोर करण्यासारखे आहे.

'जगाला मोदी नकोत!' पाकिस्तानचं नाव घेत ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'मोदींची ‘विश्वगुरू’ प्रतिमा ही फक्त.' Shivsena Slams PM Modi:"भारताची पत मोदी यांच्या काळात घसरणीला लागली आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणे भारताला कमजोर करण्यासारखे आहे.

'जगाला मोदी नकोत!' पाकिस्तानचं नाव घेत ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'मोदींची ‘विश्वगुरू’ प्रतिमा ही फक्त...' Shivsena Slams PM Modi:"भारताची पत मोदी यांच्या काळात घसरणीला लागली आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणे भारताला कमजोर करण्यासारखे आहे.""नरेंद्र मोदी हे आता विश्वगुरू बनले आहेत असा डंका पिटणाऱ्या अंधभक्तांनी चिंतन करावे अशा वार्ता समोर येत आहेत. जगभरातून भारताविरुद्ध वारे वाहत आहेत आणि पंतप्रधान मोदी मात्र बिहारात निवडणूक प्रचार सभांत गुंतले आहेत. विश्वगुरू मोदींची लंका जळत आहे व संपूर्ण भाजप चूप आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जागतिक वित्तीय संस्था उभ्या राहिल्या आहेत. ‘एडीबी’ म्हणजेच आशियाई विकास बँकेने पाकिस्तानला 80 कोटी डॉलरचे कर्ज मंजूर करून मोदी यांच्या विश्वगुरुत्वाची खिल्ली उडवली आहे," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे."दोन दिवसांपूर्वी एडीबीचे अध्यक्ष मसातो कांडा हे पंतप्रधान मोदींना भेटले. दोघांत चर्चा झाली. ‘‘पाकिस्तानला आर्थिक मदत मिळाली तर तिचा दुरुपयोग होईल. ही रक्कम पुन्हा दहशतवाद पोसण्यासाठी वापरली जाईल,’’ असा विचार मोदींनी मसातो कांडा यांच्याकडे मांडला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मोदींचे बोलणे या कानाने ऐकले व दुसऱ्या कानाने सोडले असेच दिसते. मसातो कांडा यांनी पुढच्या दोन दिवसांत पाकिस्तानसाठी 6,861 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे."पाकिस्तान हा भिकारी, कंगाल, कर्जाखाली बुडालेला देश आहे असे भारताचे मंत्री रोज सांगतात, पण जागतिक स्तरावर पाकिस्तानला ही अशी भरघोस मदत होताना पाहून भारताची चिंता वाढू लागेल. रशियाने पाकिस्तानबरोबर नुकताच 2.6 बिलियन डॉलर्सच्या मेगा प्रोजेक्टवर सह्या केल्या हे तर धक्कादायक आहे. रशियासारखा भारताचा एकेकाळचा मित्र पाकिस्तानात औद्योगिक गुंतवणूक करून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. अझरबैजान, तुर्कस्तान, चीनदेखील तेच करत आहेत. पाकिस्तानला ‘एडीबी’ने दिलेले 6,861 हजार कोटींचे पॅकेज प्रेसिडंट ट्रम्प यांच्या संमतीनेच दिले. हे चित्र भारतासाठी धोकादायक आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीची धुरा पाकिस्तानकडे देण्यात आली आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं अधोरेखित केलं आहे."पाकिस्तान दहशतवाद पोसणारा देश आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा अशी मागणी घेऊन भारत संयुक्त राष्ट्रांत अनेकदा गेला, पण संयुक्त राष्ट्रांनी आता पाकड्यांनाच दहशतवादविरोधी समितीचे उपाध्यक्ष केले. हा पंतप्रधान मोदींच्या विदेश नीतीचा सरळसरळ पराभव आहे. याशिवाय तालिबान प्रतिबंध समितीचे अध्यक्षपदही संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानला देऊ केले आहे. तालिबान प्रतिबंध समिती ही अफगाणिस्तानच्या शांती, स्थिरता आणि सुरक्षेसाठी धोकादायक असलेल्या व्यक्ती, गट व संस्थांची आर्थिक कोंडी करण्याबाबत निर्णय घेणारी अधिकृत समिती आहे. तालिबानच्या निर्मितीचे श्रेय पाकिस्तानकडे जाते. तालिबान, अल कायदा, हिजबुल या दहशतवादी संघटनांचे आश्रयदाते म्हणून पाकिस्तानकडे बोट दाखवले जाते. तरीही भारतीय धोरण आणि भावनांची पर्वा न करता पाकिस्तानला दहशतवादविरोधी लढाईचे नेतृत्व दिले. भारत आता काय करणार व पंतप्रधान मोदी हा धक्का कसा पचवणार?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे."पाकिस्तानला भारताच्या बरोबरीत उभे करून सक्षम करण्याचा हा आंतरराष्ट्रीय डाव आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा वगैरे लोकांची धोरणे जागतिक स्तरावर भारताची मान खाली घालायला लावणारी आहेत. मोदी जागतिक व्यासपीठावर जातात ते स्वतःची ‘टामटुम’ करून घेण्यासाठी. मोदींबरोबर जागतिक नेते फोटो काढतात, मोदी पुढे चालतात व जागतिक नेते मोदींच्या पाठीमागून चालताना दाखवून भारतीय मीडिया जागतिक पातळीवर भारताला अडचणीत आणते. हे सर्व करून ‘विश्वगुरू’ म्हणून मोदींची प्रतिमा ही फक्त त्यांच्या अंध भगतगणांत आहे. जगात हे असे काहीच नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे."मोदींना प्रेसिडंट ट्रम्प यांनी शपथविधीला बोलावले नाही. मोदी ट्रम्प यांना भेटायला गेले तेव्हा भारतीय पंतप्रधानांचे सन्मानाने स्वागत करण्याचा साधा शिष्टाचार प्रेसिडंट ट्रम्प यांनी पाळला नाही व भारत-पाक युद्धात पंतप्रधान मोदींना विश्वासात न घेता प्रेसिडंट ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. हा एक प्रकारे सार्वभौम भारताचा अपमान आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे."मोदी यांचा हा असा अपमान जगात रोज होत आहे. पाकिस्तानबरोबरचे युद्ध थांबवून मोदींनी 56 सभासदांचे एक शिष्टमंडळ जगात पाठवले, पण या शिष्टमंडळास कोणत्याही देशातील महत्त्वाचा नेता भेटला नाही. भारताची पत मोदी यांच्या काळात घसरणीला लागली आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणे भारताला कमजोर करण्यासारखे आहे. आता तर कॅनडातील ‘जी 7’ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले नाही. कॅनडा 15 ते 17 जूनला ‘जी 7’चे यजमानपद निभावीत आहे. त्यात जागतिक विषयांवर चर्चा होईल. रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा होईल. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, इटली, कॅनडा, जर्मनीचे चॅन्सलर या संमेलनात आहेत. ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि युक्रेनचे राष्ट्रपती, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही या संमेलनात आमंत्रित आहेत. या जागतिक शिखर संमेलनापासून भारताच्या पंतप्रधानांना दूर ठेवले. त्यांना आमंत्रण नाही. याचा सरळ संदेश आहे तो म्हणजे जगाला मोदी नको आहेत. भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. मोदी-शहांनी भारताचा लौकिक धुळीस मिळवला आहे. अंधभक्तांना हे कधीच समजणार नाही," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.दिवसाला 20 ते 30 हजार अन् महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवणार...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

PM Modi Strengthening Pakistan International Uddhav Thackeray Shivsena

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ऑपरेशन सिंदूरच्या PC मधे विराट कोहलीचा उल्लेख; DGMO पाकिस्तानचं नाव घेत म्हणाले 'त्यांनी कितीही प्रयत्न...'ऑपरेशन सिंदूरच्या PC मधे विराट कोहलीचा उल्लेख; DGMO पाकिस्तानचं नाव घेत म्हणाले 'त्यांनी कितीही प्रयत्न...'MoD Press Conference Virat Kohli: सैन्य दलांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा चेहरा उघड पाडला असून, भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली. यादरम्यान डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी विराट कोहलीचाही उल्लेख केला.
Read more »

पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानला म्हणाले 'ऑपरेशन सिंदूर फक्त..'पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानला म्हणाले 'ऑपरेशन सिंदूर फक्त..'ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशाला संबोधित केलं. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून, यानंतर दोन्ही देशात तणाव आहे.
Read more »

'...हाच प्रश्न सावरकरांचा आत्माही विचारत असेल', UBT चा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'गोडसेच्या अस्थीही...''...हाच प्रश्न सावरकरांचा आत्माही विचारत असेल', UBT चा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'गोडसेच्या अस्थीही...'Veer Savarkar s Idea of India Insulted: वीर सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार मोदी, मिंधे वगैरेंनी गमावला आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Read more »

'फडणवीस सरकारची मानसिकता व लायकी...', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'रेड्यांचे बळी देऊन...''फडणवीस सरकारची मानसिकता व लायकी...', ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'रेड्यांचे बळी देऊन...'CJI Gavai Protocol Remark: ‘कश्मीर फाईल्स’, ‘केरला स्टोरी’, ‘छावा’ अशा चित्रपटांचे उदात्तीकरण व खास शो आयोजित करणारे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस महात्मा फुले यांच्या जीवन संघर्षावरील ‘फुले’ चित्रपटाकडे पाठ फिरवतात.
Read more »

'भुजबळांच्या मांडीचे काय करणार?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस, शिंदेंना सवाल; म्हणाले, 'काळाने या दोघांवर भयंकर..''भुजबळांच्या मांडीचे काय करणार?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस, शिंदेंना सवाल; म्हणाले, 'काळाने या दोघांवर भयंकर..'Chhagan Bhujbal Sworn In As Minister: छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्यासंदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवला होता. अजित पवार यांनादेखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू अशी फडणवीस यांची ललकारी होती.
Read more »

'या' खेळाडूमुळेच आम्ही IPL Final हारलो; थेट नाव घेत श्रेयसने फोडलं पराभवाचं खापर'या' खेळाडूमुळेच आम्ही IPL Final हारलो; थेट नाव घेत श्रेयसने फोडलं पराभवाचं खापरPunjab Captain Shreyas Iyer On IPL 2025 Final RCB vs PBKS: दोन्ही संघाना पहिल्यांदाच आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोण्याची संधी होती. यात आरसीबीला यश आल्यानंतर श्रेयसने काय म्हटलंय पाहा...
Read more »



Render Time: 2026-04-02 22:42:09