ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेच्या मुद्द्यावर काही नियम लागू आहेत आणि काही विचाराधीन आहेत अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे.
'काहीतरी करा, OTT अश्लीलता.', सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले 'काही नियम.' ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेच्या मुद्द्यावर काही नियम लागू आहेत आणि काही विचाराधीन आहेत अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे.
'काहीतरी करा, OTT अश्लीलता...', सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले 'काही नियम...' ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेच्या मुद्द्यावर काही नियम लागू आहेत आणि काही विचाराधीन आहेत अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे.ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेबाबत असणाऱ्या चिंतेशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे. तसंच ही अश्लीलता दूर करण्यासाठी केंद्राने कायद्याच्या चौकटीत काहीतरी करावे असा सल्लाही दिला आहे. पत्रकार आणि माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती बी आर गवई आणि ए जी मसीह यांच्या खंडपीठाने केंद्र आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, अल्ट बालाजी, उल्लू डिजिटल आणि मुबी यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि एक्स कॉर्प, गुगल, मेटा इंक आणि अॅपल यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांकडून बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, हा खटला विरोधी नाही आणि खऱ्या अर्थाने चिंता निर्माण करणारा आहे. जैन यांनी असंही म्हटले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही निर्बंधाशिवाय हा कंटेंट वापरला जात आहे. त्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी केंद्राकडून बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना"काहीतरी करा... काहीतरी कायदेशीर करा" असं सांगितलं. काही नियमित कार्यक्रमांमध्येही आक्षेपार्ह मजकूर दिसून येतो याकडे लक्ष वेधत तुषार मेहता म्हणाले की, काही इतके विकृत आहेत की दोन लोकही एकत्र बसून पाहू शकत नाहीत. मेहता यांनी यादरम्यान सेन्सॉरशिप नसावी हे अधोरेखित करताना"काही नियम आहेत, काही चिंतनात आहेत," अशी माहिती दिली.नोटीस बजावताना खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की,"ही याचिका ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर विविध आक्षेपार्ह, अश्लील सामग्री प्रदर्शित करण्याबाबत एक महत्त्वाची चिंता व्यक्त करते. विद्वान सॉलिसिटर जनरल यांनी ही सामग्री विकृततेच्या मर्यादेपर्यंत जाते असं सांगितलं आहेत त्यांनी असंही म्हटलं आहे की काही अधिक नियम विचाराधीन आहेत." "एकेकाळी वैयक्तिक दुर्गुण असलेली गोष्ट आता एका व्यापक समस्येत रूपांतरित झाली आहे, जी सोशल मीडियापासून ते ओटीटीपर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात घुसली आहे. जर त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर अश्लील सामग्रीचा हा अनियंत्रित प्रसार सामाजिक मूल्यं, मानसिक आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षिततेवर गंभीर परिणाम करू शकतो," असं त्यात सांगितलं आहे. "चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि सॉफ्ट-कोअर अॅडल्ट कंटेंट यांच्या अनियंत्रित प्रसारामुळे महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या वाढत्या प्रवृत्तीला चालना मिळत असून, तरुणांच्या मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम झाला आहे," अशी चिंताही सुप्रीम कोर्टाने मांडली. याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे की"त्यांनी सक्षम अधिकारी, संस्था इत्यादींसमोर निवेदनं, तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यांचे कोणतेही परिणाम झालेले नाहीत. या परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे माहिती असतानाही सरकार या धोक्याचे नियमन करण्यासाठी कोणतंही महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात अपयशी ठरलं आहे".
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जेलमध्येही बीडच्या टोळ्यांचा गुंडाराज, 'सुदर्शन घुलेची जेलमध्येच महादेव गित्तेला धमकी'बीडमधील गुंडांच्या टोळ्या जेलमध्ये कैद असल्या तरी त्यांची गुंडगिरी काही कमी होताना दिसत नाही.
Read more »
''फुले' चित्रपटातील एकही सीन कट करु नका, आम्ही आजच्या ब्राह्मणांना...'; भुजबळांचा आक्रमक पवित्राChhagan Bhujbal On Pratik Gandhi Phule Movie: महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटातील काही दृष्यांमुळे नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच भुजबळांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या.
Read more »
ऐसी टिपप्णी क्यों करते हैं?...रेप पर इलाहाबाद HC जज की बात से सुप्रीम कोर्ट नाराज, तुषार मेहता की सॉलिड दली...Supreme Court News: इलाहाबाद हाईकोर्ट की विवादास्पद टिप्पणियों पर सुप्रीम कोर्ट ने नाराजगी जताई है. जस्टिस बीआर गवई ने कहा कि जजों को संवेदनशील मामलों में अनावश्यक टिप्पणियों से बचना चाहिए.
Read more »
'आप किन बिंदुओं पर बहस करना चाहते हैं', वक्फ कानून पर सुनवाई के दौरान SC ने किन बिंदुओं पर जताई चिंताWaqf Bill: सुप्रीम कोर्ट में दो बजे पूरा कोर्ट रूम भरा हुआ था. केंद्र सरकार का पक्ष रखे के लिए सॉलिसिटर जरनल तुषार मेहता भी कोर्ट पहुंचे.
Read more »
वक्फ कानून पर 'सुप्रीम' बहस डे-2 : CJI के कड़े सवाल, मुस्लिम पक्षकारों की दलीलें ; अब तक क्या-क्या हुआ? जानिए एक-एक अपडेटWaqf Act: सुप्रीम कोर्ट आज भी वक्फ कानून पर पर सुनवाई करेगा. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ने कहा, 'अदालत इस समय उस कानून पर सुनवाई कर रही है, जिसे व्यापक चर्चा और विचार-विमर्श के बाद लाया गया है.
Read more »
Waqf Act In SC: SG तुषार मेहता ने सुप्रीम कोर्ट में यूं ही नहीं मान ली ये दो बात, इसके पीछे है खास प्लानिं...Waqf Amendment Act: वक्फ कानून में संशोधन का मामला सुप्रीम कोर्ट में चला गया है. सीजेआई जस्टिस संजीव खन्ना की अध्यक्षता वाली तीन जजों की पीठ मामले की सुनवाई कर रही है. सराकर की तरफ से सॉलिसिटर जनरल तुषार मेहता पक्ष रख रहे हैं.
Read more »
