गुलामीतील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य? पंकजा मुंडेंचा झी २४ तासच्या मुलाखतीत थेट सवाल उपस्थित केला. एका समाजासाठी गॅझेट मान्य तर दुस-याकरता नकार चालणार का? असा सवाल त्यांनी विचारला.
Pankaja Mudey on Hyderabad Gazette : मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याच हैदराबाद गॅझेटवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे.
हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली असून यासाठी आंदोलने देखील होत आहेत. हैदराबाद गॅझेटबाबत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या विषयवार आपले मत मांडले. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळू शकते. तर, दुसरीकडे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. याच हैदराबाद गॅझेटविषयी पंकजा मुंडे यांनी आपले मत मांडले. भारत स्वतंत्र झाला, भारतानं लोकशाही स्वीकारली. अशावेळी देश गुलाम असताना आणलेलं गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली. तसंच गॅझेटमधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या. मात्र दुस-या समाजाकरता त्या नाकारणं योग्य नाही असंही त्या म्हणाल्या. आरक्षणासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी वाद वाढवण्यावरच भर दिला जात असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. मुलगी राजकीय वारसा होऊ शकते का? मुलगी राजकीय वारसा होऊ शकते का? या प्रश्नाला आपल्याला अनेक वेळा सामोरं जावं लागलं अशी खंत, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी झी २४ तासच्या विशेष मुलाखतीत दिली. सामान्य जनता पुढारलेल्या विचारांची आहे. त्यांनी मुलीच्या रुपात राजकीय वारस स्वीकारलाय. मात्र फेक ट्रोलिंग करणा-यांच्या ते पचनी पडायला कठीण जातं. त्याचा सामना आपल्यालाही करावा लागला. मात्र आता आपण त्यापलिकडे गेलो असल्याचं पकंजा मुंडेंनी सांगितलं. FAQ1 हैदराबाद गॅझेटचा वाद काय आहे?मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी केली असून, त्यासाठी आंदोलने होत आहेत.2 हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास कोणत्या समाजांना आरक्षण मिळू शकते?हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळू शकते. दुसरीकडे, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे.3 पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटबाबत काय वक्तव्य केले? झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हैदराबाद गॅझेटबाबत आपले मत मांडले. त्यांनी विचारले की, भारत स्वतंत्र झाला आणि लोकशाही स्वीकारली, तरी देश गुलाम असताना आणलेल्या गॅझेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे? तसेच, गॅझेटमधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या आणि दुसऱ्या समाजासाठी नाकारायच्या हे योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या.
Pankaja Munde Interview To The Point With Kamlesh Sutar पंकजा मुंडे पंकजा मुंडे मुलाखत पंकजा मुंडे हैदराबाद गॅझेट
