सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका; मध्य रेल्वेवर कुर्ला उन्नत हार्बर मार्ग

Central Railway Kurla-CSMT 5Th And 6Th Line News

सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका; मध्य रेल्वेवर कुर्ला उन्नत हार्बर मार्ग
Project Big Updateसीएसएमटी ते कुर्ला अतिरिक्त रेल्वे मार्गिका
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 110 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

सीएसएमटी ते कुर्ला अतिरिक्त रेल्वे मार्गिकेचे काम झपाट्याने सुरु आहे. लवकरच हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

सीएसएमटी ते कुर्ला अतिरिक्त रेल्वे मार्गिकेचे काम झपाट्याने सुरु आहे. लवकरच हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या प्रकल्पाचा अविभाज्य घटक असलेल्या कुर्ला उड्डाणपुलाच्या बांधकामात जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान प्रगती झाली आहे.

कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे नवीन रेल्वे मार्ग टाकणे आणि कुर्ल्यापुढील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांच्याद्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प हाती घेतले आहेत. एमयूटीपी-२ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका, सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका आणि ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका हे येतात. या तिन्ही प्रकल्पांना २००८ साली मंजुरी मिळाली. त्यातील ठाणे ते दिवा मार्गिकेचे काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत ही मार्गिका दाखल झाली. मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम टप्याटप्याने पूर्ण केले जात आहे. परंतु, गेल्या अनेक कालावधीपासून सीएसएमटी ते कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका हा प्रकल्प प्रलंबित होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास लवकर व्हावा गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेल्वे मार्गाना सामावून घेण्यासाठी हार्बर मार्गाचे फलाट ७ आणि ८ तोडले जात आहेत आणि रेल्वे वाहतूक नव्याने बांधलेल्या उन्नत डेक तयार केला जात आहे. उड्डाणपुलाचा विस्तार १,३३९ मीटर असून ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने ४१३ मीटर रॅम्प, पनवेलच्या दिशेने ४२२ मीटर रॅम्प आणि ५०४ मीटर सपाट भाग आहे. कामाच्या व्याप्तीमध्ये एक नवीन स्थानक इमारत देखील समाविष्ट आहे.पूर्व-पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांची रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी, टिळकनगर टोकापर्यंत स्थानकाच्या सर्व पादचारी पुलांना जोडणारा एक स्कायवॉक बांधण्यात येत आहे. कुर्ला स्थानकावरील फलाट १ ते ६ वरून सीएसएमटी ते कसारा, खोपोली अप आणि डाऊन लोकल चालविण्यात येतात. तर, फलाट क्रमांक ७, ८ मार्गावरून सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल धावतात. मात्र मेल, एक्स्प्रेस आणि मालगाड्यामुळे लोकल फेऱ्यावर आणि गतीवर मर्यादा येते. त्यामुळे कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ७, ८ जवळ उन्नत मार्ग बनविण्यात येत आहे. उन्नत मार्गाचे कसाईवाडा ते सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोड म्हणजे एलटीटी येथे शेवट असणार आहे. कसाईवाडा येथे तीन फलाट बांधण्यात येणार आहेत. पादचारी पूल, स्कॉयवॉक बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा प्रदान करण्यात येईल.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Project Big Update सीएसएमटी ते कुर्ला अतिरिक्त रेल्वे मार्गिका

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

तिजोरीत 800 kg सोनं,15000 कोटींची रोकड आणि... भारतातील सर्वात महागडा राजवाडा; एका रात्रीचे भाडं 10 लाखापासून स्टार्ट होतेतिजोरीत 800 kg सोनं,15000 कोटींची रोकड आणि... भारतातील सर्वात महागडा राजवाडा; एका रात्रीचे भाडं 10 लाखापासून स्टार्ट होतेमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारत दौऱ्यावर जिथे राहमार आहेत ते भारतातील सर्वात महागडे हॉटेल आहे.
Read more »

लार्ज और मिडकैप फंड एक आदर्श मध्य मार्ग प्रदान करते हैंलार्ज और मिडकैप फंड एक आदर्श मध्य मार्ग प्रदान करते हैंलार्ज और मिडकैप फंड एक आदर्श मध्य मार्ग प्रदान करते हैं। वे निवेशकों को अस्थिरता के अत्यधिक जोखिम Watch video on ZeeNews Hindi
Read more »

...म्हणून अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या! 'अजित पवार मुर्दाबाद'ची घोषणाबाजी...म्हणून अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या! 'अजित पवार मुर्दाबाद'ची घोषणाबाजीAjit Pawar Convoy: अजित पवार परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाच ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना हा प्रकार घडला.
Read more »

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉकची घोषणा; 4 मेपर्यंत शेवटची CSMT-Karjat लोकल बदलापूरपर्यंतच, पाहा लोकलचे वेळापत्रकमध्य रेल्वेवर मेगाब्लॉकची घोषणा; 4 मेपर्यंत शेवटची CSMT-Karjat लोकल बदलापूरपर्यंतच, पाहा लोकलचे वेळापत्रकMumbai Local Megablock Update: मुंबईकरांनो लक्ष द्या. मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला असून त्यामुळं लोकलचं वेळापत्रक बदललं जाणार आहे.
Read more »

समुद्राच्या पोटातून धावणार बुलेट ट्रेन, BKC तील स्थानकाची पहिली झलक, पाहा Videoसमुद्राच्या पोटातून धावणार बुलेट ट्रेन, BKC तील स्थानकाची पहिली झलक, पाहा VideoBullet Train Mumbai: मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे बीकेसीतील स्थानक कसे असेल, जाणून घेऊया.
Read more »

पुणे रेल्वे स्टेशनसंदर्भात मोठा निर्णय! ...तर पुणेकरांचा खिसा होणार खालीपुणे रेल्वे स्टेशनसंदर्भात मोठा निर्णय! ...तर पुणेकरांचा खिसा होणार खालीImportant News For Punekar: पुणे रेल्वे स्थानकासंदर्भात लोहमार्ग पोलीस आणि वाहतुक पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय.
Read more »



Render Time: 2026-04-02 13:58:21