Important News For Punekar: पुणे रेल्वे स्थानकासंदर्भात लोहमार्ग पोलीस आणि वाहतुक पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय.
Important News For Punekar : पुणे रेल्वे स्थानकासंदर्भात लोहमार्ग पोलीस आणि वाहतुक पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय.पुणे रेल्वे स्थानकासंदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला असून याचा पुणेकरांना फटका बसणार आहे.
अर्थात या नव्या नियमाचं उल्लंघन केल्यास पुणेकरांना खिसाही हलका करावा लागेल अशी दाट शक्यता आहे. लोहमार्ग पोलिसांनी वाहतूक विभागाशी चर्चा केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये नवा नियम लागू केला आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसर हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळेच आता पुणे रेल्वे स्थानक आवारातील अधिकृत वाहनतळ वगळता दोनशे मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्थानकाच्या आवारातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र त्याचवेळेस नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयही सहन करावी लागणार असल्याची चर्चा आहे.पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील दोन्ही प्रवेशद्वारांवर बेशिस्तपणे वाहने लावल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होत होती. प्रवेशद्वाराच्या परिसरात वाहने लावल्याने कोंडी होत असल्याच्या दिसून आलं होतं. रेल्वे स्थानकाच्या आवारातील कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दोन्ही प्रवेशद्वारांपासून 200 मीटर अंतरावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला.>पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आलं आहे.>या घोषणेमुळे पुणे रेल्वे स्थानकातील अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भाग नो पार्किंग झोन झाला आहे.>जनजागृतीनंतर जर कोण कायद्याचा नियम मोडून पार्किंग करत असेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. >पुणे रेल्वे स्थानकाच्या आत जाणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या दोन्ही प्रवेशद्वारावर गेल्या काही दिवसापासून बेकायदा पार्किंग करण्याची संख्या वाढल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.>त्याचबरोबर फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका यांना या नियमातून वगळण्यात आलं आहे. >म्हणूनच आता पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये कार अथवा दुचाकी पार्क केल्यास मोठा आर्थिक दंड भरावा लागू शकतो. एकीकडे वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असली तरी नो पार्किंग झोनचा नियम न पाळल्यास आर्थिक फटकाही बसणार आहे.18 तासांचा प्रवास 7 तासांत, महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यातून ज...
PUNEKAR New Rule Pune Railway Staion No Parking Zone
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी लवकरच नवा रेल्वे मार्ग; नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट होणारKarjat Lonavala Pune Railway: कर्जत ते लोणावळादरम्यान दोन नवीन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दोन सविस्तर प्रकल्पाची आखणी करण्यात येणार आहे.
Read more »
'राज्यातील 132 रेल्वे स्टेशन होणार वर्ल्ड क्लास, मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री', मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!CM Devendra Fadavis: राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. बीकेसीतील जिओ कन्व्हेंशन सेंटरयेथे ही पत्रकार परिषद पार पडली.
Read more »
मध्य रेल्वेवर होतंय आणखी एक स्थानक; बदलापूरकरांचा प्रवास सुस्साट होणार, 30 मिनिटांतच...Mumbai Local Train Update: बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर वांगणी-बदलापूर स्थानकांदरम्यान आणखी एक रेल्वे स्थानक होणार आहे.
Read more »
महाराष्ट्रात मोठा शिक्षक भरती घोटाळा; 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होणार?झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. नागपूर जिल्ह्यात 580 बोगस शिक्षक नियुक्तीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बोगस शिक्षक भरतीप्रकरणी नागपूर पोलिसांचं पथक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात चौकशीसाठी गेलं. तिथे त्यांनी उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्यालयाची झडतीही घेतली.
Read more »
पुण्यात 40000 कोटींचा नवा सुपरफास्ट हायवे; 2 हवाई पट्ट्या, 55 उड्डाणपूल 22 इंटरचेंज आणि...मुंबई ते बंगळुरु हा 18 तासांचा प्रवास फक्त 6 तासात होणार आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेच्या वळणावर सुपरफास्ट हायवे उभारला जाणार आहे.
Read more »
पाकिस्तानातच आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा दुश्मन! 44 टक्के पाकिस्तान यांच्याच ताब्यातभारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानाचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तानातच आहे. कोण आहे पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू जाणून घेऊया.
Read more »
