महाराष्ट्रात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मदत म्हणून सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात मुसळधार पावसामुळे 11500 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या भागातील धाराशिव जिल्ह्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल मंडळात 24 तासांत सर्वाधिक 196 मिमी पाऊस पडला, तर वैजापूर तालुक्यातील शिवूर आणि बोरसर मंडळात 189.
25 मिमी पाऊस पडला. मराठवाड्यात पूरस्थिती अतिशय भयानक आहे. अशावेळी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मंदिरांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. न्यासा करणार मदत सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून राज्यातील पुरग्रस्तांसाठी दहा कोटींच्या मदतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. सिद्धिविनायक न्यासाचे खजिनदार पवन त्रिपाठींकडून मदतीची घोषणा जाहीर केली आहे. काय म्हणाले खजिनदार?#WATCH | Mumbai | Acharya Pawan Tripathi, Treasurer of Sri Siddhivinayak Temple Trust, says, Seeing the loss being faced by farmers due to floods, and the havoc wreaked by floods throughout the state, we pray before Sri Siddhivinayak that Maharashtra comes out of this tragedy… pic.twitter.com/n3KT1674pb— ANI September 29, 2025सिद्धिविनायकसह शिर्डी आणि शेगांव संस्थांकडून देखील मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देणगी जाहीर केली आहे. तसेच राज्यभरातील पूरपरस्थितीचा विचार करून साताऱ्यातील छत्रपती राजघराणे दसरा उत्सव साधेपणाने साजरा करणार आहेत. सीमोलंघन सोहळा साध्या पद्धतीने साजरा करून यावर्षीचा खर्च पूरग्रस्तांसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्र्यांची आढावा बैठकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पूर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आणि मराठवाडा भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसात नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली. छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित होते.जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीरअधिकाऱ्यांनी सांगितले की, जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने, विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या वरच्या भागात असलेल्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.हवामान खात्याकडून रेड अलर्टहवामान खात्याने रविवार आणि सोमवारी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत रेड अलर्ट जारी केला आहे. बीड जिल्ह्यात पुराची शक्यता वर्तवण्यासाठी अधिकाऱ्यांनी दवंडी जारी केली आहे. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे.20 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मराठवाडा प्रदेशाला पुराचा तडाखा बसला आहे, ज्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके, घरे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आणि सखल रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. सोलापूरमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे.
Marathwada Rain Heavy Rainfall India Flood Evacuation Maharashtra Disaster Climate Change Impacts NDRF Response Weather Red Alert Godavari River Floods Crop Damage Maharashtra Siddhivinayk Help Siddhivinayak Flood Situation
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
100000000 रुपयांची 'झकास' ऑफर तरी अनिल कपूरने नाकारली जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!Anil kapoor Pan Masala: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 67 व्या वर्षीदेखील चिरतरुण दिसतो. प्रत्येकाला त्याच्या एव्हरग्रीन तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. सिनेमांमध्ये त्याने उत्तम काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Read more »
Maha Kumbh Mela LIVE: ऐतिहासिक होगा महाकुंभ, पार करेगा 40 करोड़ का आंकड़ा, अब तक 100000000 लोग पहुंचेमहाकुंभ मेला 2025 में प्रयागराज के संगम तट पर 12वें दिन तक 10 करोड़ से अधिक लोग स्नान कर चुके हैं। महाकुंभ 13 जनवरी से शुरू होकर 26 फरवरी को समाप्त होगा।
Read more »
भारतातील सर्वात कमी वयाचा करोडपती? अवघ्या 17 महिन्यांच्या मुलाने कमावले 100000000 रुपये; जगभरात चर्चा!Infosys Dividend 2025: 10 कोटी रुपये कमावयला तुम्हाला किती वर्षे लागतील? 50, 60 वर्षे? बहुतांशजणांना संपूर्ण आयुष्यातही रक्कम कमावता येत नाही. पण दीड वर्षाचा मुलगा करोडो कमवू शकतो? असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? हो. असं इतर कुठे नव्हे तर आपल्या देशातच घडलंय.
Read more »
100000000 कीमत वाली, ये है दुनिया की सबसे महंगी चाय; खासियत उड़ा देगी होश!International Tea Day 2025: हर साल 21 मई को इंटरनेशनल टी डे मनाया जाता है. आइए जाते हैं दुनिया की सबसे महंगी चाय कौन-कौन सी है.
Read more »
25000 की सैलरी से बनाइए 100000000 का रिटायरमेंट फंड! 70:15:15 फॉर्मूला, छोटे निवेश से बनेगी बड़ी दौलतसिर्फ 25 हजार रुपये की सैलरी से भी 10 करोड़ रुपये का रिटायरमेंट फंड बनाया जा सकता है. 70:15:15 फॉर्मूला और स्टेप-अप एसआईपी का जादू इस सपने को हकीकत में बदल देता है.
Read more »
बिहार चुनाव से पहले सनसनीखेज खुलासा, इस MLA को राजद की ओर से मिला था 100000000 से अधिक का ऑफरजमुई के सिकंदरा विधायक प्रफुल्ल कुमार मांझी ने खुलासा किया कि उन्हें पाला बदलने के लिए करोड़ों का प्रस्ताव मिला था। उन्होंने बताया कि विपक्ष ने उन्हें विधानसभा अध्यक्ष के पक्ष में वोट करने के लिए 10 करोड़ से अधिक का प्रलोभन दिया था। मांझी ने इस प्रस्ताव को ठुकरा दिया और अपने नेता जीतन राम मांझी को इसकी जानकारी...
Read more »
